मुरुमे हा एक त्वचारोग आहे.
लक्षणे
- ब-याचदा वयात येण्याच्या काळात होतो, तसा तो वयाच्या २० व्या किंवा ३० व्या दशकात होऊ शकतो.
- खुले किंवा बंद फोड, पूयुक्त फुगीर भाग, त्वचेचा वर आलेला लालसर भाग, सर्वसाधारणतः चेहरा, पाठ आणि छातीवर व्रण.
- व्रण पडण्याची प्रक्रिया ठराविक कालावधीत होते.
- वेदना, जखमा होणे, आणि खाज येऊ शकते.
- पाळी येण्यापूर्वी अधिक तीव्र होऊ शकते
पुरुषांमधे मुरुमे येण्याचे प्रमाण तीव्र राहते, आणि स्त्रियांपेक्षा उशीरा सुरुवात होते.
कारणे
- याचे खरे कारण ब-याचदा माहिती नसते. काही प्रकरणी अँड्रोजेन्स (संप्रेरक) हे घडवून आणतात.
- केराटीन नांवाच्या प्रथिनामुळं केसांची मुळं बंद झाल्यानं तथाकथित पांढरे ठिपके आणि काळे ठिपके निर्माण होतात. केसांच्या मुळात स्थित बंदीस्त सेबॅशियस ग्रंथी सीबमचे (एक तेलकट द्राव) स्त्रवण चालूच ठेवतात. हे सीबम आणि त्वचेच्या पेशी बाहेर पडू शकत नाहीत, त्यामुळं केसाचं मूळ फुगीर बनतं. हा फुगीरपणा चालूच राहिल्यास ते फुटते, परिणामी पृष्ठभागावरील विषाणू (हे सामान्यतः त्वचेवर आढळतात) आंत शिरतात आणि स्थानीक संक्रमण करवतात (पिटीका), मग ते मोठे होतात आणि पुटी तयार होते.
- त्वचेला त्रासदायक क्रीम्स् आणि तेले
- ठराविक औषधे घेणे
- सातत्यानं त्वचेचं घर्षण (उदा., दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे, टेलीफोनचा वापर)
साधे उपाय
- मुरुमांच्या व्रणांना हात लावून संक्रमण होऊ देऊ नका
- आपला चेहरा स्वच्छ ठेवा
- सौंदर्य प्रसाधनं वापरताना काळजी घ्या
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्
अंतिम सुधारित : 5/2/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.