हा एक विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) आजार आहे. या आजारात जननसंस्थेच्या त्वचेवर कोंब येतात. लागण झाल्यावर 1ते 9 महिन्यांत हे कोंब येतात. हे कोंब लालसर,मऊ, लांबट असतात. बटाटयावर येणा-या कोंबासारखेच पण लालसर रंगाचे हे कोंब लगेच ओळखू येतात. पुरुषांना हे कोंब शिश्नावर कोठेही येतात.
हे समलिंगी संबंध असल्यास हे कोंब गुदद्वाराच्या सभोवताली येतात. स्त्रियांच्या बाबतीत हे योनीद्वारावर व आतपण असतात. यासाठी रक्ततपासणीही उपलब्ध आहे. कोंब आपोआप जिरत नाहीत. यासाठी उपचार करावे लागतात. पोडोफायलिन मलम यासाठी दर आठवडयात 1-2 वेळा लावल्यास हे कोंब हळूहळू जिरून जातात. गरोदरपणात हे मलम वापरू नये कारण त्यामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतात.
या कोंबाच्या विषाणूंचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा दाट संबंध सिध्द झालेला आहे. याबद्दल संबंधित प्रकरणात माहिती आलेली आहेच.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/6/2020
हा अर्बोव्हायरस या विषाणूंच्या (व्हायरसांच्या) एका...
निसर्गात विषाणु आणि बक्टोरिया जे आहेत ते पिकावरील ...
करपा : वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे ...
प्रयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शरी...