हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने,इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे हा आजार रक्तसांसर्गिकही आहे. या रोगाचे आपल्या देशातील प्रमाण वाढत आहे. पुरेशा सार्वजनिक आरोग्यसेवा नसल्याने तसेच डॉक्टरांच्या व जनतेच्या योग्य आरोग्यशिक्षणाअभावी त्याचा प्रसार आटोक्यात आणणे आपल्या देशात कठीण जात आहे. सर्वांनाच या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे.
या आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्ण दगावतो.
दुषित रक्तातूनद एडस पसरू शकतो
एचायव्ही विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून, भिन्नलिंगी वा समलिंगी संबंधातून,तसेच रक्तामार्फत हा आजार पसरतो.
चुंबन, स्पर्शातून,एकत्र खाण्यातून, डासांमार्फत, अन्न-पाणी,कपडयांतून, >बाळाला अंगावर पाजण्यातून हा आजार पसरत नाही.
पुरुषाच्या बाहेरख्यालीपणामुळे कुटुंबातील स्त्रीला हा आजार होण्याचा धोका वाढत आहे. यामुळे असंख्य कुटुंबामध्ये हा आजार येऊन पोचलेला आहे. लग्नाआधीचे लैंगिक संबंध सहसा गुप्त ठेवले जातात;मात्र एड्स प्रकट व्हायला वेळ लागत असल्याने लग्नाच्या वेळी सगळेच अंधारात राहतात. इथून पुढे कुंडली पाहाण्याऐवजी भावी जोडीदाराची एड्सबद्दल खात्री करणे गरजेचे होणार आहे. विवाहाबरोबर एड्सचा धोका पत्कारायचा का हा प्रश्न असेल.