किडणीच्या रोगांपैकी क्रॉनिक किडणी फेल्युअर हा एक गंभीर रोग आहे. कारण सध्याच्या औषधोपचारात हा रोग पूर्णपणे नष्ट करण्याचे कोणतेही औषध उपलब्ध नाही. गेल्या अनेक वर्षात ह्या रोगाच्या रुग्णांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढच होत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, मुतखडा आदी रोगांची वाढती संख्या यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे.
ह्या प्रकारच्या किडनी फ़ेल्युअरमध्ये, किडणी खराब होण्याची प्रक्रिया खूप धीम्या गतीने होते; जी अनेक महिने व वर्षे चालू शकते. दीर्घकाळानंतर रोग्याच्या दोन्ही किडण्याआकुंचन पावून एकदम छोट्या होतात आणि काम बंद करतात. कोणतेही औषध, ऑपरेशन किंवा डायलिसीस करूनही त्या ठीक होत नाहीत.
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यावर सुरुवातीच्या काळात योग्य औषधे देऊन आणि खाण्यात पाठ्य बाळगून उपचार करता येऊ शकतात. एन्ड स्टेज किडणी (रिनल) डिसीज (ESKD/ ESRD/ CKD) काय आहे?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोगात दोन्ही किडण्या हळूहळू खराब होऊ लागतात. जेव्हा किडणी ९०% हून अधिक खराब होते किंवा पूर्णपणे काम करणे बंद करते, तेव्हा त्याला एन्ड स्टेज किडणी रिनल डिसीज किंवा संपूर्ण किडणी फेल्युअर म्हटले जाते.
या अवस्थेत योग्य औषधे आणि पथ्य पाळूनही रोग्याची तब्बेत बिघडतच जाते आणि त्याला वाचवण्यासाठी नेहमी – नियमितपणे डायलिसीस करण्याची किंवा किडणी प्रत्यारोपण करण्याची गरज भासते.
वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारानंतरही दोन्ही किडण्या ठीक न होऊ शकणाऱ्या या प्रकारच्या किडणी फेल्युअरची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे
स्त्रोत : Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 9/19/2019
सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो...
या विभागात किडणी फेल्युअर म्हणजे काय, त्याचे प्रका...