शरीरात रक्त शुद्ध करणे हे किडनीचे मुख्य काम असते. जेव्हा आजारामुळे दोन्ही किडन्या सामान्य रीतीने कार्य करू शकत नाहीत तेव्हा ,,किडनीची कार्यक्षमता कमी होते. त्यालाच किडनी फेल्युअर असे म्हणतात.
रक्तात क्रिअॅटिनीन आणि युरियाच्या प्रमाणाची तपासणी करून किडणीच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती मिळते.किडनीची कार्क्षमता शरीराच्या आवश्यकतेपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे किडनी खराब झाल्यामुळे जर थोडेसे नुकसान झाले असेल तर रक्ताच्या तपासणीत कोणतीही तृती दिसून येत नाही. परत जेव्हा रोगामुळे दोन्ही किडन्या ५०%हून अधिक खराब होतात,तेव्हा मात्र रक्तात क्रिअॅटिनीन आणि युरियाचे प्रमाण वाढलेले दिसते.
नाही. एखाद्या व्यक्तीतील दोन्ही निरोगी कीडन्यांपैकी एक किडणी खराब झाली किंवा काही कारणाने ती शरीरात काढून टाकली असली, तरीही दुसरी किडनी आपली कार्यक्षमता वाढवून ,शरीरातील कार्य पूर्ण क्षमतेने करू शकते.
‘अक्युट किडणी फेल्युअर ‘ आणि क्रॉनिक किडनी फेल्युअर ‘ या दोन प्रकारच्या रोगांमधील फरक स्पष्ट झाला पाहिजे.
क्रॉनिक किडणी फेल्युअर(क्रॉनिक किडनी डिसीज ( CKD) मध्ये अनेक प्रकारच्या रोगांमुळे किडनीची कार्यक्षमता क्रमशः महिन्यात किंवा वर्षामध्ये कमी होऊ लागते आणि दोन्ही किडन्या हळूहळू काम बंद करू लागतात. आधुनिक औषधोपचारामध्ये क्रॉनिक किडणी फेल्युर ठीक करणे व संपूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही . क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या सर्व रोग्यांवर औषधे,पथ्य आणि नियमित तपासणीद्वारे उपचार केले जातात. कमजोर किडनीची कार्यक्षमता वाचवणे , किडनी फेल्युअरच्या लक्षणांना काबूत ठेवणे आणि संभाव्य धोके टाळणे हा सुरुवातीच्या उपचारांचा प्रमुख हेतू असतो. ह्या उपचारांचा उद्देश रोग्याचे आरोग्य नित ठेवणे आणि डायलिसीस शक्यतोवर टाळणे हा असतो. किडणी अधिक खराब झाली तर योग्य उपचार करूनही रोग्याची लक्षणे वाढत जातात आणि रक्ताच्या तपासणीत क्रिअॅटीनीन आणि किडणी प्रत्यारोपण हेच पर्याय उरतात.
स्रोत - Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 8/24/2020
सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो...
किडणीच्या रोगांपैकी क्रॉनिक किडणी फेल्युअर हा एक ग...