हा एक प्रकारचा ताप असून दूषित अन्न आणि पाणी यापासून पसरतो. हा फक्त माणसाच्या विष्ठा पाण्यात मिसळून पसरणारा आजार आहे.
लक्षणे
- हळूहळू ताप वाढत जातो.
- भूक कमी लागते
- अन्न पचत नाही
- जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी
- काम करण्याची इच्छा होत नाही
- पोटदुखी काही माणसांना छाती भरणे अशी लक्षणे दिसतात.
उपचार
- विषमज्वरा सारखी लक्षणे दिसल्यावर लगेच दवाखान्यात जावे.
- त्वरीत डॉक्टर सांगतील तशी औषधे घ्यावीत.
- या आजारासाठी लस उपलब्ध आहे पण ही लसीकरण कार्यक्रमात ही लस विकत घ्यावी लागते.
विषमज्वर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी –
- परिसर स्वच्छ ठेवावा.
- पिण्याचे पाणी शुद्ध व स्वच्छ असावे.
- पिण्याच्या पाण्याजवळ धुणे-भांडी करणे, गुरांना धुणे, शौचाला लहान मुलांना बसवणे तसेच सांडपाणी वाहू देणे अशा गोष्टी टाळाव्यात.
- शौचाहून आल्यावर तसेच काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने धुवावेत.
- अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.
- उघड्यावरचे अन्न खाऊ नये.
- फळे व भाज्या खाण्याआधी धुवून घ्याव्यात.
स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/15/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.