मारामारी, अपघात,इ. प्रसंगात एखादा दात जबडयातून सुटून येतो. हा दात पूर्ण (न मोडलेला) असेल तर आपल्याला परत बसवता येतो. मात्र हे काम लगेच (12 तासांच्या आत) व्हायला पाहिजे. तोपर्यंत दात स्वच्छ करून सांभाळून ठेवावा. यासाठी दात लगेच कोमट पाण्यात घालून ठेवावा. किंवा असा दात रुग्णाने स्वत:च्या तोंडात जिभेखाली धरून ठेवावा. यामुळे तो जिवंत राहतो. त्याला थोडे मांस, अंतस्त्वचा वगैरे चिकटली असेल तर ती तशीच ठेवावी. यामुळे दात परत बसवायला-जुळवायला बरे पडते. दाताची मुळे पूर्वीच्या जागी दाबून बसवून ठेवली की काम झाले. मात्र कधी कधी एवढे करूनही दात आत पक्का होत नाही व तो गळून पडतो. हेच काम दंतवैद्याने केल्यास जास्त चांगले कारण तो मुळे त्यांच्या जागी नीट बसवू शकतो.
एखादा दात अर्धवट तुटला असेल तर त्यावर कृत्रिम टोप चढवणे चांगले. यामुळे त्याची झीज टळते. याला 'क्राऊनिंग'/(मुगुट) असे नाव आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/19/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...