लिम्फॅटीर फायलेरीयासिस (एलएफ). यालाच हत्तीरोग या सामान्य नांवाने ओळखले जाते. हा एक शरीर विद्रूप करणारा, अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो.
प्रौढ व्यक्तीमधे लक्षावधी अत्यंत लहान, अपक्व अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरीई असे म्हणतात त्या तयार होतात. त्या शरीराच्या बाह्य स्तरावर फिरत राहतात आणि त्यांची पैदास ही रात्री होते. अळ्या 4-6 वर्षे जगतात आणि आणखी अळ्या निर्माण करतात.
हत्तीरोग हा डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात सूक्ष्म अळ्या असतात त्या व्यक्तीला डास चावल्यानंतर त्याच्या शरीरात शिरतात (एमएफ वाहक). त्या डासाच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होण्यासाठी 7-21 दिवस लागतात.
हत्तीरोग होण्यासाठी अनेक महिने ते वर्षांपर्यंत अनेकवेळा डास चावणे आवश्यक असते. ज्या भागामधे या रोगाचे प्राबल्य आहे अशा ठिकाणी राहणा-या लोकांना संक्रमणाचा अधिक धोका असतो. हे संक्रमण रात्रीच्या वेळी रक्ताचा नमुना घेऊन तपासता येते.
प्रौढ अळ्या मरेतोवर ब-याच लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. सामान्यतः हा रोग जीवघेणा नाही परंतु तो लसिका यंत्रणा आणि मूत्रपिंडांना कायमचे नुकसान पोचवू शकतो. लसिका यंत्रणा नीटपणे कार्य करत नसल्याने हात, स्तन आणि पाय यांच्यात द्राव साठून राहतो. अशी सूज येण्याला लिम्फोडीमा म्हणतात. पुरुषांमधे गुप्तांगाजवळ देखील सूज येते, या स्थितीला हायड्रोसिल असे म्हणतात. त्याशिवाय, ही सूज आणि लसिका यंत्रणेचे कार्य कमी झाल्याने शरीर विषाणू आणि संक्रमणांचा सामना करण्यास सक्षम राहात नाही. या लोकांना त्वचा आणि लसिका यंत्रणेत अधिक प्रमाणात विषाणूंचे संक्रमण होते. यामुळे त्वचा घट्ट आणि जाड होते, यालाच हत्तीरोग असे म्हणतात.
प्रतिबंधात्मक उपायांमधे, संपूर्ण समुदायाला अशी औषधे देणे ज्यामुळे सूक्ष्म अळ्या मरतील आणि डासांचे नियंत्रण करण्याचा समावेश आहे. डासांचे चावे टाळणे हा प्रतिबंधाचा आणखी एक प्रकार आहे. ह्त्तीरोगाचे जंतु पसरवणारे डास हे सामान्यतः संध्याकाळी आणि पहाटे चावतात. ह्त्तीरोगाचे प्राबल्य असलेल्या भागात आपण राहात असाल तर पुढील खबरदारी घ्याः
ज्या लोकांना प्रौढ अळ्यांचा संसर्ग झाला आहे त्यांनी रक्तात फिरणा-या सूक्ष्म जंतूंना मारण्यासाठी औषधाचा (डीईसी) एक वार्षिक डोस घ्यावा. हा डोस प्रौढ अळ्यांना मारत नसला तरी त्यामुळे संसर्गग्रस्त लोकांकडून इतरांना रोगाचा प्रसार होणे टाळले जाते. प्रौढ अळ्या मेल्या तरीही लिम्फोडीमा होऊ शकतो. लिम्फोडीमा आणखी बळावू नये म्हणून अनेक मूलभूत तत्वे पाळता येतील, ती अशी -
स्त्रोत :पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/6/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...