फ्लू किंवा सर्दी ओळखण्यासाठी एक खुण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरुपाची असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
लक्षणे |
सर्दी |
फ्लू |
ताप |
क्वचित |
१००-१०२ अंश फ.तीन ते चार दिवस |
डोकेदुखी |
क्वचित |
नेहमी |
अंग दुखणे |
हलका प्रभाव |
सहसा |
थकवा, अशक्तपणा |
सौम्य |
दोन ते तीन आठवडे |
अति थकवा |
कधीच नाही |
लवकर प्रामुख्याने |
नाक चोंदणे |
सर्वसाधारण |
कधी कधी |
छातीत दुखणे |
कोरडा खोकला |
सर्वसाधारण , कधी कधी तीव्र |
आपण केवळ आपल्या लक्षणांच्या सहाय्याने स्वाईन फ्लूचे निदान करू शकत नाही.
प्रतिबंधक औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून दिली जातात. टामी फ्लू किंवा रिलेंझा ही औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून दिल्या जातात. ही प्रतिबंधक औषधे विषाणूंचे पुनरुत्पादन थांबवतात. लक्षणे दिसण्याच्या ४८ तासांच्या आत ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे योग्य वेळेवर घेतल्यास फ्लूचा कालावधी १ ते २ दिवसांनी कमी करता येतो. ही औषधे ५ ते ७ दिवसांसाठी दिल्या जातात. ही औषधे फ्लूपासून पूर्णतः बचाव करू शकतात जी नाही हे अद्यापही अस्पष्ट असेच आहे. टामी फ्लू फक्त १ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना दक्षता म्हणूनही दिले जाऊ शकते. परंतु ही औषधे आरोग्य खात्याच्या व्यावसायिकांद्वारे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच दिली जातात.
या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासिनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकग्रता कमी होणे व उलटया होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात. ज्यांना श्वसनाचा आधी पासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही. कारण यामुळे श्वसनाचे अधिक समस्या उद्भवू शकतात. या प्रादुर्भावाविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
जर आपण गेल्या दहा दिवसात प्रादुर्भाव असलेल्या भागातून किंवा देशातून प्रवास केला असेल व जर स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसत असतील तर सरकारी दावाखान्यांशी संपर्क साधावा.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजारमाहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिकावॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...