मूल शांत रहात नसल्यास पदार्थ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. नाही तर नाहक इजा होईल.
अशी उपकरणे नसतील तर साध्या सेफ्टी पिनचा टोक नसलेला वाटोळा भाग वाकवून घ्या. टोकदार भाग हातात धरून याचा वापर करून आत गेलेल्या पदार्थाच्या मागे नेऊन हळूहळू बाहेर ओढा. याने बहुधा तो पदार्थ बाहेर येतो. मात्र इजा न करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कानातील वस्तू काढण्याची आणखी एक निर्धोक घरगुती पध्दत म्हणजे नळीच्या साहायाने खेचून घेणे. यासाठी साधी रबरी नळी वापरावी. कानाच्या आत जाईल इतकी ती लहान तोंडाची असावी. नळीची एक बाजू आपल्या तोंडात धरून दुसरे टोक त्या वस्तूवर लावावे; पण दाबू नये. मुलाचे डोके कोणालातरी पक्के धरून ठेवायला सांगावे. आता आपल्या तोंडातून हवा ओढण्याची क्रिया करावी. यामुळे हवेची पोकळी निर्माण होऊन कानातील वस्तू नळीने बाहेर खेचता येईल. बी असेल तर ती गुळगुळीत असल्याने सहज निघू शकते. या कामासाठी सलाईन सेटच्या नळीचा तुकडा वापरावा.शक्यतो अशा कामासाठी तज्ज्ञाकडे पाठवणे बरे. पदार्थ निघाल्यानंतर कान तपासून आत इजा झाली की काय हे पाहावे.
कानापेक्षा नाकातले पदार्थ काढणे जास्त अवघड व धोक्याचे असते. हा पदार्थ बी असेल तर ती नाकातल्या पाण्याने हळूहळू फुगत जाते. शेंगदाणा, वाटाणा, हरबरा, चिंचोके,इत्यादी पदार्थ भिजल्यावर तुकडयातुकडयाने निघण्याची शक्यता असते. तसेच नाकात मागे खूप जागा असल्याने आणि शेंबूड असल्याने सहसा हा पदार्थ मागे घशात जातो. याचवेळी तो तोंडात येतो व मग थुंकता येतो.
पण अशा प्रसंगात तो पदार्थ श्वासनलिकेत जाण्याचा सदैव धोका असतो. श्वासनलिकेत असे पदार्थ जाणे अत्यंत धोकादायक व घातक ठरते. त्यामुळे श्वासनलिका किंवा एखादी उपनलिका (फांदी) बंद होण्याचा धोका असतो. मुख्य श्वासनलिका बंद झाल्यास श्वासोच्छवास थांबून मृत्यू संभवतो. पण उपनलिका बंद झाल्यास फक्त फुप्फुसाचा तेवढा भाग निकामी होतो. एकंदरीत नाकातला पदार्थ सहज दिसत असला तरच प्रयत्न करावा;अन्यथा कानाघ तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे. (ब-याच वेळा हा पदार्थ भूल देऊन काढणे भाग पडते.)
कानाच्या पाळीला अनेक प्रसंगात जखमा होतात. कापलेली जखम असेल तर ताबडतोब शिवणे आवश्यक असते. मात्र कान चेंगरणे, चावणे, इत्यादी जखमा ब-या व्हायला वेळ लागतो. अशावेळी जंतुदोष नसल्यास कानाच्या जखमा लवकर भरून येतात. कारण या भागातला रक्तपुरवठा चांगला असतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/30/2020
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी ...
इथे आजाराच्या अवस्था व त्यासाठी सर्वसाधारणपणे उपयो...
दोन-तीन मुलांनंतर पाळणा कायम थांबवण्याची गरज भासते...