सहा महिन्यांपासून चार वर्षे वयाच्या मुलांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. फार दिवस अंगावर पिणाऱ्या अथवा नुकतेच अंगावरून तोडलेल्या मुलात या रोगाचे प्रमाण अधिक असते. क्वचित प्रौढांतही हा रोग होऊ शकतो.
आहारात निकस आणि कमी प्रमाणात प्रथिने असून कार्बोहायड्रेटांचे प्रमाण फार असेल, तर हा रोग प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्येही होतो, असे सिद्ध झाले आहे.
मूल अंगावरून तोडल्यावर त्याची वाढ खुंटते, स्नायू कृश आणि शोफयुक्त (त्वचेच्या दोन पेशींच्यामध्ये द्रव साठल्यामुळे येणाऱ्या सुजेने युक्त) होतात, केसांचा रंग व घडण यांमध्ये फरक पडतो. पोट मोठे दिसते. अतिसार (हगवण), भूक मंदावणे वगैरे लक्षणेही दिसतात. अ आणि ब जीवनसत्त्वे कमी पडल्याने तोंड येणे, त्वचा खरखरीत होणे अशी लक्षणे दिसून मूल उदासीन, चिडचिडे आणि रडके होते. ते एकाच जागी बसून राहते. डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही.
आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढविणे हा त्वरित गुण देणारा उपाय आहे. दूध, साय काढलेले दूध, ताजे ताक वा दुधाची भुकटी, मांसरस, अंडी वगैरे पदार्थ वारंवार थोड्या प्रमाणात दिले असता रोग-लक्षणे कमी होत जातात. अतितीव्र प्रकारांत नीलेच्या मार्गाने रक्तद्रव काही दिवस दिल्यास त्वरीत गुण येतो. पूर्वपाचित (प्रक्रिया करून पचनास सोपी केलेली ) प्रथिने आणि जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात द्यावी लागतात.
आपटे, ना. रा.
स्त्रोत: स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/27/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...