ट्रॉमा). शरीरातील ऊतकांना (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांना) हानिकारक अशा बाह्य शक्तींचा संबंध शरीराशी आल्याने होणाऱ्या परिणामास‘अभिघात’ म्हणतात.
कारणे : ही विविध प्रकारची असतात. त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :
- भौतिक : बाह्य पदार्थांच्या जोरामुळे किंवा कठीणपणामुळे, तसेच पडल्यामुळे लागणारा मार, पाण्यात बुडणे इ.; पहिल्यामुळेजखमा, अस्थिभंग इ. व बुडण्यामुळे श्वसनस्थगिती वगैरे परिणाम होतात.
- रासायनिक : तीव्र अम्ले, तीव्र क्षार (अल्कली), मद्य, अफू यांसारखे पदार्थ व शिशासारखी खनिज व इतर विषे शरीरास अपायकारक होतात.
- औष्णिक : भाजणे, पोळणे वगैरे.
- अतिशीतत्व : अतिशय थंडीमुळे हात-पाय-नाक वगैरे ठिकाणी रक्तप्रवाह बंद पडण्याने होणारे अपाय.
- प्रकाशजन्य : अतितीव्र प्रकाशामुळे येणारे अंधत्व.
- किरणोत्सर्गजन्य : क्ष–किरण, रेडियमासारख्या किरणोत्सर्गी पदार्थांतून निघणाऱ्या किरण यांना होणारे अपाय.
- जंबुपार : (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील भागातील) किरणांमुळे होणारे विपरीत परिणाम.
- विद्युत्जन्य : वीज अंगावर पडणे, विद्युत् मंडल-संक्षेपामुळे बसणारा झटका व भाजणे, हृदय बंद पडणे वगैरे.
- जंतुजन्य : जंतुसंसर्गामुळे होणारे रोग.
- वायुभारजन्य : खोल पाण्यात अधिक दाबामुळे, अतिशय उंचीवर हवेचा दाब फार कमी असल्यामुळे, तसेच अतिशय दाबातून सत्वर कमी दाबात आल्याने होणारे अपाय.
- मानसिक : मनाला धक्का देण्याऱ्या घटनांमुळे होणारे मनोविकार, स्मृतिभ्रंश, बेशुद्धी इत्यादी.
या सर्व प्रकारांच्या अभिघांतामुळे होणारे विकार, त्यांची लक्षणे, उपद्रव व चिकित्सा ही त्यांच्या मूळ कारणावर अवलंबून असतात.अवसादðरक्तस्त्रावश्वसनस्थगिती हृद्स्तंभन वगैरे तीव्र लक्षणांसाठी त्वरित उपचार होणे अवश्य असते.
लेखक : श. ज. अभ्यंकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/19/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.