आपल्याला स्निग्ध पदार्थ म्हणजे निरनिराळी तेले, तूप, लोणी, चरबी,इत्यादी. स्निग्ध पदार्थ तसेच निरनिराळया अन्नपदार्थात लपलेले स्निग्धांश (उदा. मक्याच्या दाण्यांतले तेल, गव्हाच्या दाण्यांतले तेल, इ.)असतात. स्निग्ध पदार्थाची कामे दोन प्रकारची असतात. एक म्हणजे ऊर्जा पुरवणे, दुसरे काम म्हणजे शरीरातल्या काही कामांत आवश्यक घटक म्हणून भाग घेणे. उदा. सांध्यांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून तेलकट द्राव असतो. मेंदूत व चेतासंस्थेत स्निग्धांशाचे प्रमाण पुष्कळ असते. काही अवयवांना गादी म्हणून चरबीचा थर असतो. उदाहरणार्थ, मूत्रपिंडे आणि पाठीचे स्नायू यांमधली चरबीची गादी, स्तनांमधल्या दुग्धग्रंथींना आधार म्हणून चरबीचा थर, थंडीपासून संरक्षण म्हणून त्त्वचेखालचा चरबीचा थर हे संरक्षण पुरवतात. आरोग्य टिकवण्यासाठी विशिष्ट प्रमाणात स्निग्धांशांची गरज असते. पण शरीरातील चरबीचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यास शरीरावर त्याचे निश्चितपणे प्रतिकूल परिणाम होतात हे आपण नंतर पाहणार आहोत.
शरीरात ग्लुकोजप्रमाणेच स्निग्ध पदार्थापासून स्निग्ध-आम्ले तयार केली जातात. ही सिग्ध आम्ले सरळ ऊर्जा निर्मितीसाठी वापरता येतात किंवा ग्लुकोजमध्ये रूपांतरीत करून मग वापरता येतात. आदर्श आहाराच्या तत्त्वानुसार शरीराच्या एकूण उष्मांक गरजेपैकी 60 टक्के ऊर्जा पिठूळ पदार्थांपासून आणि 20 टक्के स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळावी. कारण या स्निग्ध पदार्थातून ऊर्जेबरोबरच आणखी काही आवश्यक घटक मिळतात. उरलेली 20 टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळावी अशी अपेक्षा आहे. (प्रथिने वापरूनही ऊर्जा मिळू शकते)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
शरीरातील अतिरिक्त पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घ...
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण...
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...
वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी,...