साहित्य : मोड आलेले मूग १ वाटी, कोबी चिरलेला १ वाटी, उकडलेला मोठा बटाटा १ वाटी, डाळिंबाचे दाणे १ वाटी, लिंबाचा रस २ छोटे चमचे, कोथिंबीर १ छोटा चमचा, चवीप्रमाणे मीठ.
कृती : एका मोठया भांडयात सर्व साहित्य एक्त्र्ण करून मीठ, लिंबाचा रस घालून कालवा आणि खायला दया.
साहित्य : ताजा पालक बारीक चिरलेला २ वाटया, काकडी बारीक चिरलेला १ वाटी, लाल सुकलेली मिरची २, दाण्याचा जाडसर कूट २ छोटे चमचे, साखर १ छोटा चमचा, लिंबाचा रस अर्धा छोटा चमचा, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. छोटया कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद व लाल मिरचीचे तुकडे घालून ती फोडणी वरील मिश्रणावर घाला आणि सगळे एकत्र करा. ही पचडी पोळी, थालीपीठ बरोबर चांगली लागते.
टीप : करडईच्या पानांची पण याच पद्धतीने पचडी करता येते.
साहित्य : मोड आलेल्या मेथीची दाणे १ वाटी, सुके खोबरे १ वाटी, बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे.
कृती : मेथीचे दाणे भरपूर पाणी घालून भिजत ठेवा. २ ते ३ वेळा ते पाणी बदला म्हणजे दाण्याचा वास येत नाही आणि गुळगुळीतपणा निघून जातो. पाण्यातून काढून ते दानी मोड येण्यासाठी साधारण ३६ तसं ठेवा. मोड आल्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि १० मिनिटे बाजूला ठेवा. त्यात गूळ चांगला मिसळल्यानंतर खायला दया.
टीप : मोड आलेली मेथी कडू लागत नाही. ही कोशिंबीर एका वेळेला जास्त जात नाही पण नियमित खाल्ल्यावर सवय होते.
साहित्य : मुगाची डाळ १ वाटी, किसलेला गाजर २ वाट्या, कोथिंबीर १ मोठा चमचा, लिंबाचा रस १ छोटा चमचा, तेल १ छोटा चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : मुगाची डाळ १ तास आधी पाण्यात भिजवून ठेवावी. डाळ फुगून आल्यावर ती स्वच्छ धुऊन घ्या आणि निथळत ठेवा. डाळ,किसलेले गाजर, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून कालवून घ्या. कढईत तेल घालून त्यात फोडणीचे साहित्य घाला आणि ही फोडणी कोशिंबिरीवर घालून हलवा.
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
चिमणचारा-पोषाहार-उसळ/भाजी
पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून आपण विचार केला तर कुठल...
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्या...
२ वाटया तांदूळ रात्री भिजवून ठेवलेला, पोहे, मिरची ...