हुलगा उसळ
साहित्य : मोड आलेला हुलगा २ वाटया, कांदा कापलेला १ छोटा, सुके खोबरे वाटून २ मोठे चमचे, लाल तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे, नेहमी भाज्यांसाठी वापरतो तो मसाला दीड चमचा, तेल २ छोटे चमचे, फोडणीचे साहित्य. कृती : मोड आलेला हुलगा थोडेसे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. कढईत फोडणी तयार करून त्यात कांदा, वाटलेले खोबरे हे सर्व परतून घ्या. नंतर उकडलेला हुलगा घालून परत. मसाला तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे घालून चांगली उकळी आल्यानंतर गास बंद करा.
एक मध्यम आकाराचा वाटी भरून हुलगा उसळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य
|
प्रमाण
|
ऊर्जा
|
१६४.०० कॅलरी
|
कर्बोदके
|
२४.३५ ग्राम
|
प्रथिने
|
०९.२० ग्राम
|
स्निग्ध पदार्थ
|
०३.३१ ग्राम
|
कॅल्शियम
|
१३७.१४ मि. ग्राम
|
लोह
|
०३.१२ ग्राम
|
‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व
|
२९.२६ मि.ग्राम
|
टीप : ही उसळ न्याहरीसाठी चांगली आहे. आपण मूग, मटकी जशी नुसती उसळ खातो तशीच ही पण उसळ खाऊ शकतो. लहान मुलांना देताना त्यात तिखट कमी घालावे आणि उसळीवर उकडलेला बटाटा, टोमाटो घालून सजवून दयावा म्हणजे मुलं खातील. वरील साहित्य वापरून मेथी दाण्याला मोड आणून ज्वारीचा हुरडा ताजा असतांना ज्वारीच्या हुरडयाची उसळ करण्यापूर्वी तो थोडा सडून त्याची साले काढावीत, नाहीतर हुरडा चांगला शिजत नाही. हुरडा वाळवून त्याचे पीठ करून त्याचे थालीपीठ चांगले होते. मूग, मटकी, चवळी, वाटाणा ही सर्व कडधान्ये वापरून उसळी करू शकतो.
पपईची भाजी
साहित्य : कच्ची पपई २ वाटया, हरभरा डाळ अर्धी वाटी भिजवलेली, हिरवी मिरची, तेल २ छोटे चमचे, फोडणीचे साहित्य, मीठ साखर चवीप्रमाणे. कृती : पपईची साल काढून बारीक फोडी करून घ्या. कढईत तेल घालून फोडणी करून घ्या. त्यात मिरच्या आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून थोडे परता. नंतर पपईच्या फोडी घालून चवीप्रमाणे मीठ साखर घालून शिजवून घ्या. शिजवल्यावर कोथिंबीर घालून पोळी बरोबर खायला दया. एक मध्यम आकाराची वाटी भरून पपईची भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य
|
प्रमाण
|
ऊर्जा
|
२१.३० कॅलरी
|
कर्बोदके
|
०३.५६ ग्राम
|
प्रथिने
|
०१.११ ग्राम
|
स्निग्ध पदार्थ
|
००.३० ग्राम
|
कॅल्शियम
|
३८.४० मि. ग्राम
|
लोह
|
००.३५ ग्राम
|
‘अ’ आणि ‘क ’ जीवनसत्त्व
|
०७.६५ मि.ग्राम
|
स्त्रोत :
चिमणचारा, संपदा ट्रस्ट