अमेरिकी कृषी विभागाने राष्ट्रीय पोषक घटकांचा प्रमाणित संदर्भासाठी माहिती साठा 2014 मध्ये नुकताच अद्ययावत केला आहे. बेल्ट्सव्हिले येथील मानवी अन्नद्रव्य संशोधन संस्थेने या माहिती साठ्याचे संकलन केले असून, त्यामध्ये 8600 अन्नघटकांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आहारविषयक जागरुकता वाढत आहे. अलीकडे आहारतज्ज्ञांचा सल्लाही लोक विविध आजारांसाठी घेत असतात. अशा वेळी त्यांना प्रत्येक पदार्थामध्ये नेमके कोणते घटक आहेत, हे कळत नाही. त्याचप्रमाणे प्रक्रिया उद्योजकांनाही आपल्या पदार्थातील पोषक घटकांचे प्रमाण ठरविण्यासाठी या माहिती साठ्याची मदत होते. दर वर्षी अमेरिकी कृषी विभागातर्फे पोषक अन्नघटकांविषयीची यादी अद्ययावत केली जाते. त्यात नवीन अन्नद्रव्ये, नवीन पदार्थ यांची माहिती वाढवली जाते. तसेच उपलब्ध असलेल्या पोषक घटकांविषयी काही बदल असल्यास ते अद्ययावत केले जातात.
प्रत्येक अन्नपदार्थाच्या गटानुसार संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या माहितीचा फायदा सामान्य ग्राहकापासून प्रक्रिया उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी होऊ शकतो.
ग्राहकानुसार अन्नघटकांतील पोषक घटकांची माहितीही वेगळी उपलब्ध आहे. उदा.- एखाद्याला आहारतज्ज्ञाने अधिक फायबर घ्यायला सांगितले, तर त्याला प्रत्येक अन्नघटकामध्ये फायबरचे नेमके प्रमाण कळू शकेल. तसेच त्याची उतरत्या क्रमाने यादीही मिळू शकते किंवा कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ नेमके कोणते, हेही कळू शकते.
संदर्भ : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात विविध प्रकारचे जाडेभरडे धान्य जसे ज्वार...
शेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक...
या विभागात छोट्या बालकांसाठी वेगवेगळ्या पाक कृतीं...
नवजात आणि लहान मुले फार चळवळी असतात आणि जास्त प्रम...