অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरक्षित मातृत्व

सुरक्षित मातृत्व

  1. सुरक्षित मातृत्वाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे?
  2. सुरक्षित मातृत्वाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.
  3. सहाय्यक माहिती - सुरक्षित मातृत्व
    1. महत्वाचा संदेश : सर्व कुटुंबांना गर्भधारणा व अपत्यजन्माच्याअ दरम्यान उद्भवणार्या समस्यांबाबत संकेत देणारी लक्षणे ओळखता येणे अत्यावश्यक आहे.
    2. महत्वपूर्ण संदेश : प्रत्येक गरोदरपणात किमान चार वेळा डॉक्टर, नर्स किंवा सुईणीकडून स्त्रीतची आरोग्य-तपासणी केली जाणे व बाळंतपणाचे वेळी ते मदतीसाठी हजर असणे आवश्य्क आहे.
    3. महत्वपूर्ण संदेश : गर्भधारणेच्या काळात प्रत्येक स्त्रीस विशेषत: पोषक आहार व नेहमीपेक्षा जास्तीची विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
    4. महत्वपूर्ण संदेश : विषारी तसेच प्रदूषक पदार्थ, धूम्रपान, मादक द्रव्ये, दारू इ. चे सेवन विशेषत: गर्भवतींना व बालकांना अतिशय हानिकारक असते.
    5. महत्वपूर्ण संदेश : अनेक समुदायांमध्ये स्त्रिया व बालकांचा होत असलेला शारीरिक छळ सार्वजनिक गंभीर आरोग्य- संमस्यां आहे. गर्भधारणेच्या काळात असा छळ झाल्यास ते स्त्रीबरोबरच गर्भास ही हानिकारक असते.
    6. महत्वपूर्ण संदेश : शिकलेल्या, निरोगी तसेच लहानपणी व कैशोर्यावस्थेात व्यवस्थित आहार मिळालेल्या मुलींना गर्भधारणा व अपत्यजन्माच्याल दरम्यान कमी त्रास होतो.
    7. महत्वपूर्ण संदेश : आरोग्यसेवा, विशेषतः गर्भधारणा व अपत्यजन्माच्या  वेळी, मिळणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.

सुरक्षित मातृत्वाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे?

गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दररोज सुमारे 1400 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर हजारो इतर स्त्रियांना व त्यांच्या् मुलांना जिवावरच्या गंभीर समस्या किंवा  अपंगत्वास तोंड द्यावे लागते.

स्त्रीची तब्येत मुळातच चांगली असल्यास गर्भधारणा व अपत्यजन्मामधील धोके टाळता येतात. प्रत्येक गर्भधारणेदरम्यान किमान 4 वेळा प्रशिक्षित आरोग्यसेवकाने तिची आरोग्य-तपासणी करणे व बाळंतपणाचे वेळी डॉक्टर, नर्स किंवा सुईण हजर असणे आवश्ययक आहे. तसेच प्रसूतीनंतरच्या 12 तासांमध्ये व त्यानंतर 6 आठवड्यांनी स्त्रीची शारीरिक तपासणी करावी.
प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतरच्या सेवा पुरवण्याची, प्रसूतीदरम्यान मदतनीस म्हणून काम करण्यासाठी आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तसेच गर्भधारणा व अपत्यजन्माच्याव दरम्यान होवू शकणार्या समस्यांनी ग्रस्तत असलेल्याह स्त्रियांना शासनाकडून विशेष सहाय्य मिळणेदेखील अपेक्षित आहे.

महिलांना दुजाभावाची वागणूक देण्याविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय विधेयकास बहुसंख्य सरकारांनी मान्यता दिली असून त्यामध्ये गर्भवतींना आवश्यक त्या सेवा पुरवण्याच्या कायदेशीर वचनबद्धतेचा समावेश आहे.

सुरक्षित मातृत्वाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.

  1. सर्व कुटुंबांना गर्भधारणा व अपत्यजन्माच्या  दरम्यान उद्भवणार्या समस्यांबाबत संकेत देणारी लक्षणे ओळखता येणे अत्यावश्यक आहे. तसेच ह्या समस्यांवर मात करण्यासाठी तातडीने कुशल व्यक्तींची मदत मिळवण्याची योजना व संसाधने देखील त्यांच्याकडे तयार असायला हवी.
  2. प्रत्येक गर्भधारणेच्या  दरम्यान किमान 4 वेळा डॉक्टर, नर्स किंवा सुईणीकडून स्त्रीणची आरोग्य-तपासणी केली जाणे व बाळंतपणाचे वेळी ते मदतीसाठी हजर असणे आवश्युक आहे.
  3. गर्भधारणेच्या काळात प्रत्येक स्त्रीस खास पोषक आहार व जास्तीची विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
  4. विषारी तसेच प्रदूषक पदार्थ, धूम्रपान, मादक द्रव्ये, दारू इ. चे सेवन गर्भवतींना व बालकांना अतिशय हानिकारक असते.
  5. अनेक समुदायांमध्ये स्त्रिया व बालकांचे शारीरिक उत्पी डन एकंदर समाजाच्या दृष्टीने एक गंभीर आरोग्यक समस्याय आहे. गर्भधारणेच्या काळात असा छळ झाल्यास ते स्त्रीबरोबरच गर्भास ही धोक्यांचे असते.
  6. शिकलेल्या, निरोगी तसेच लहानपणी व तरूण वयामध्ये उत्तम आहार मिळालेल्या मुलींना गर्भधारणा व अपत्यजन्मादरम्यान कमी त्रास होईल.
  7. आरोग्यसेवा, विशेषतः गर्भधारणा व अपत्यजन्मादरम्यान, मिळणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. अशी आरोग्यसेवा देणार्या व्यक्तींनी तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व स्त्रियांना आदराने वागणूक देणारे असायला हवे.

सहाय्यक माहिती - सुरक्षित मातृत्व

महत्वाचा संदेश : सर्व कुटुंबांना गर्भधारणा व अपत्यजन्माच्याअ दरम्यान उद्भवणार्या समस्यांबाबत संकेत देणारी लक्षणे ओळखता येणे अत्यावश्यक आहे.

तसेच ह्या समस्यांवर मात करण्यासाठी तातडीने कुशल व्यक्तींची मदत मिळवण्याची योजना व संसाधने देखील त्यांच्याकडे तयार असायला हवीत.

गर्भधारणा ही एकंदरीतच गुंतागुंतीची प्रक्रिया असल्यामुळे काहीतरी अनपेक्षित घोटाळे होऊ शकतात. पहिले बाळंतपण आई व मुलाच्या दृष्टीने सर्वात धोकादायक असते.

प्रत्येक गर्भधारणेच्यात दरम्यान किमान 4 वेळा प्रशिक्षित आरोग्यसेवकाने गरोदर स्त्रीची आरोग्यकेंद्रामध्ये तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच कुशल  बथ्र अटेंडंटच्याआ ( जसे डॉक्टर, नर्स किंवा सुईणीच्या) सल्ल्याने बाळंतपणाचे ठिकाण ठरवणे गरजेचे असते.

एखादी अनपेक्षित गडबड होऊन गंभीर धोका उद्भवण्याची चाहूल लागताच परिस्थिती योग्य रीतीने हाताळण्यासाठी कुटुंबातील सर्वांना जवळच्या दवाखान्याचे किंवा आरोग्यकेंद्राचे ठिकाण माहीत असायला हवे तसेच संबंधित कुटुंबाकडे पैशाची तजवीज असणे गरजेचे आहे म्हणजे कोणत्या ही क्षणी त्या संभावित मातेस दवाखान्यात हलवता येईल किंवा वैद्यकीय मदत पुरवता येईल.

एखाद्या कुटुंबाला प्रसूती अवघड किंवा जोखमीची असण्याची शक्यता वाटत असल्यास, हे बाळंतपण प्रसूतीगृहात किंवा इस्पितळात होणे आवश्यक आहे. अर्थात कोणते ही बाळंतपण, विशेषतः पहिले, प्रसूतीगृहात किंवा इस्पितळात झाल्याेस सुरक्षित असते.
सर्व कुटुंबांना गर्भधारणा व अपत्यजन्माच्याइ दरम्यान उद्भवणार्या संभावित समस्या व जोखमींची माहिती असणे व त्या बाबत संकेत देणारी लक्षणे ओळखता येणे अत्यावश्यक आहे.

गर्भधारणेपूर्वीच्या जोखमीच्या बाबी

  • ह्या व ह्याआधीच्या प्रसूतीमध्ये दोन वर्षांपेक्षा कमी अंतर असणे
  • गर्भवती होणार्या स्त्रीीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा  35 वर्षांपेक्षा अधिक असणे
  • ह्या स्त्रीणस आधीच 4 किंवा अधिक मुले असणे
  • ह्या स्त्रीणचे ह्या आधीचे मूल अपुर्या दिवसांचे किंवा 2 किलोपेक्षा कमी वजनाचे जन्मलेले असणे.
  • ह्या स्त्रीणची आधीची प्रसूती गुंतागुंतीची असणे किंवा सिझेरियन पद्धतीने झालेली असणे
  • ह्या स्त्रीणचा आधी गर्भपात झालेला असणे किंवा ह्या आधीचे मूल मृतावस्थेतच जन्मलेले असणे
  • स्त्रीीचे वजन 38 किलोपेक्षा कमी असणे
  • स्त्रीीच्याच जननेंद्रियास जखम असणे किंवा  ते शिवलेले असणे (इनफिब्युलेशन)

गर्भधारणेच्यात दरम्यानचे धोक्यायचे संकेत

  • वजन न वाढणे (गरोदरपणाच्याा दरम्यातन  निदान 6 किलो वजन वाढले पाहिजे)
  • ऍनिमिया, किंवा पापण्या आतून पांढर्या होणे (निरोगी पापण्या आतून लाल किंवा गुलाबी असतात), लवकर थकणे किंवा  धाप लागणे
  • हातापायांवर किंवा  चेहर्यावर अनपेक्षितपणे सूज येणे
  • पोटातील गर्भाची हालचाल बिलकुल नसणे किंवा अगदी कमी असणे

त्वारित मदतीची गरज असल्याकचे सांगणारे संकेत

  • गर्भधारणेच्याग दरम्यान किंवा प्रसूतीनंतर योनीमधून खूप किंवा  सतत रक्तस्त्राव
  • जबरदस्तत डोकेदुखी किंवा पोटदुखी
  • गंभीर किंवा सातत्याने वांत्याव होणे
  • खूप ताप येणे
  • प्रसूतीची वेळ भरण्याआधीच पाणपिशवी फुटणे
  • आकडी येणे
  • जोरदार वेदना
  • कळा येण्याचा लांबलेला कालावधी

महत्वपूर्ण संदेश : प्रत्येक गरोदरपणात किमान चार वेळा डॉक्टर, नर्स किंवा सुईणीकडून स्त्रीतची आरोग्य-तपासणी केली जाणे व बाळंतपणाचे वेळी ते मदतीसाठी हजर असणे आवश्य्क आहे.


प्रत्येक गर्भारपणाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे, कारण काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते. एखाद्या स्त्रीस आपण गर्भवती असल्याचे जाणवताच तिने आरोग्यकेंद्रास भेट दिल्यास किंवा कुशल सुइणीचा सल्ला घेतल्यास बरेचसे संभाव्य धोके टाळता येतात. गर्भधारणेच्याय दरम्यान किमान चार वेळा प्रशिक्षित आरोग्यसेवकाने तिची आरोग्य-तपासणी करणे तसेच प्रसूतीनंतरच्या 12 तासांमध्ये व त्यानंतर 6 आठवड्यांनी तिची शारीरिक तपासणी केली जाणे आवश्यक आहे.
गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव किंवा ओटीपोटामध्ये वेदना झाल्यास किंवा वर सांगितलेली कोणती ही धोक्याची लक्षणे आढळल्यास आरोग्यसेवकाचा वा कुशल सुइणीचा सल्ला तातडीने घ्यावा.
प्रसूतीच्या वेळी आरोग्यकेंद्रामध्ये कुशल सुइणीची मदत मिळाल्याने तसेच प्रसूतीनंतर 12 तासांमध्ये बाळंतिणीची तपासणी केल्याने बाळ किंवा बाळंतीण आजारी पडण्याची किंवा दगावण्याची शक्यता खूपच कमी होते.
डॉक्टर, नर्स किंवा सुईणीसारख्या तज्ञ व्यक्तीच्या मदतीमुळे सुरक्षित गर्भारपण पार पडून चांगल्या तब्येतीचे बाळ जन्माला येते कारण:

  • एकंदर प्रसूतीवर तिची नजर राहते व काही समस्या उद्भवल्यास त्या स्त्रींला तातडीने दवाखान्यात हलविता येते.
  • उच्चर रक्तदाबाची तपासणी होते, उच्च रक्तदाब असणे बाळ व बाळंतिणीस धोकादायक ठरू शकते.
  • पंडुरोगासाठी तपासणी करून लोह किंवा फॉलेटच्या गोळ्या नियमितपणे दिल्या जाऊ शकतात.
  • आई व नवजात अपत्यातचे संसर्गापासून संरक्षण करण्या.साठी (व्हिटॅमिन ए ची कमतरता असलेल्याअ स्त्रियांना) व्हिटॅमिन ए चा योग्यय डोस घेण्याटस सांगणे.
  • गरोदापणाच्या‍ काळात एखाद्या संसर्गाबाबत तपासणी करणे, विशेषत: मूत्रमार्ग संसर्ग आणि लैंगिक रीत्यात होणारे संसर्ग, आणि एंटिबायोटिक्स्स देवून त्यांमचा उपचार करणे.
  • बाळंतिणीचे व जन्माला येणार्या बाळाचे संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी तिला दोन इंजेक्शने देता येतात.
  • गरोदर स्त्रियांना अन्न शिजवताना केवळ आयोडिनयुक्त मिठाचाच वापर करण्यास सांगण्यायत येते ज्यायोगे त्या स्त्रीूचा गॉइटरसारख्या रोगापासून बचाव होतो व होणार्या बाळांचे भविष्यातील शारीरिक व मानसिक पंगुत्वापासून रक्षण होते.
  • गर्भाची वाढ योग्य रीतीने होत आहे किंवा नाही हे तपासले जाते.
  • गरज असल्याढस, मलेरियाविरोधी औषधे देणे.
  • प्रसूतीसाठी त्या स्त्रीची मानसिक तयारी करणे, स्तनपानाबद्दल तसेच स्वतःची व नवजात बालकाची काळजी घेण्याबद्दल सल्ला देणे शक्य होते.
  • गर्भवतीस व तिच्या कुटुंबियांना प्रसूतीच्या ठिकाणाबाबत तसेच प्रसूतीच्याः दरम्यान व प्रसूतीनंतर उद्भवणार्या संभाव्य अडचणींमध्ये मदत मिळविण्यासबाबत सल्ला देणे शक्य असते.
  • लैंगिक संबंधांमधून पसरणार्या रोगांबाबत सल्ला देणे.
  • गर्भवतीस एचआयव्हीची चाचणी स्वैयच्छिकरीत्यां करण्याबाबतचे समुपदेशन देणे. एचआयव्ही ची स्वै.च्छिक चाचणी व समुपदेशन हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. ह्या रोगाची लागण झालेल्या किंवा झाल्याची शंका असलेल्या गर्भवती किंवा  माता तज्ञ आरोग्यसेवकाचा सल्ला घेऊ शकतात ज्यायोगे त्या स्वतःची काळजी घेऊ शकतात तसेच आपल्या मुलांना रोगग्रस्त होण्यापासून वाचवू शकतात.

प्रसूतीच्या  दरम्यान तज्ञ आरोग्यसेवकास माहित असते की

  • कळा येण्याचा कालावधी केव्हा लांबतो (12 तास वा अधिक) व त्या स्त्रीतस दवाखान्यात केव्हाह हलवावे
  • वैद्यकीय मदतीची गरज केव्हांे भासते व ती कशी मिळवावी
  • जंतुसंसर्गाची शक्यता कशी टाळावी (हात, उपकरणे व प्रसूतीची जागा स्वच्छ ठेवणे)
  • पोटामध्ये बाळाची स्थिती बरोबर नसल्या,स काय करावे
  • आईला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याकस काय करावे
  • नाळ केव्हांा कापावी व तिची योग्य व्यवस्था कशी ठेवावी
  • जन्मानंतर बाळाचा श्वास लगेचच सुरू न झाल्यास काय करावे
  • जन्मानंतर बाळाचे अंग कोरडे करून उबेत कसे ठेवावे
  • जन्मानंतर लगेचच बाळाला आईचे दूध पाजण्याबद्दल मार्गदर्शन कसे करावे
  • सुरक्षितरीत्याव उत्तर-प्रसूती सेवा कशा पुरवाव्याबत आणि प्रसूती नंतर आईची काळजी कशी घ्या्वी
  • बाळास आंधळेपणा येऊ नये म्हणून शिफारस केलेले औषध (ड्रॉप्स) बाळाच्या डोळ्यांत कसे घालावे.

प्रसूतीनंतर, कुशल आरोग्यसेवकाने

  • प्रसूती नंतर 12 तासांत तसेच सहा आठवड्यांनी आईची तब्येत तपासावी.
  • पुढील गर्भधारणा लांबवण्याबाबत किंवा  टाळण्याबाबत स्त्रियांचे मार्गदर्शन करावे.
  • लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे एचआयव्हीसारखे रोग टाळण्याबाबत व अपत्यांना संसर्ग होऊ नये ह्यासाठी स्त्रियांचे मार्गदर्शन करावे.

महत्वपूर्ण संदेश : गर्भधारणेच्या काळात प्रत्येक स्त्रीस विशेषत: पोषक आहार व नेहमीपेक्षा जास्तीची विश्रांती मिळणे आवश्यक आहे.


कुटुंबास उपलब्ध् असलेल्याह उत्तम अन्नपदार्थांची गर्भवतीस गरज असते:
दूध, फळे, भाज्या, मटण, मासे, अंडी, धान्ये, मटार व शेंगा हे सर्व पदार्थ गरोदरपणात  खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
गरोदरपणात स्त्रियांनी लोह, अ जीवनसत्व (व्हिटॅमिन ए) आणि फॉलिक ऍसिड भरपूर असलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते व अशा खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, केशरी किंवा पिवळ्या रंगाची सर्व फळे, भाज्या, मटण, मासे, अंडी ह्यांचा समावेश होतो. पंडुरोग टाळण्यासाठी किंवा त्यारचा उपचार करण्याासाठी आरोग्यसेवक गर्भवतींना लोहाच्या गोळ्या देऊ शकतात. अ जीवनसत्वाची कमतरता असल्यास जंतुसंसर्ग टाळण्यासाठी अ जीवनसत्वाचे योग्ये ते डोस देऊ शकतात. मात्र गर्भवतींनी दर रोज 10,000 इंटरनॅशनल युनिट्स (IU) पेक्षा जास्त किंवा दर आठवड्यास 25,000 इंटरनॅशनल युनिट्स पेक्षा जास्त अ जीवनसत्व घेऊ नये.
आयोडिनयुक्त मिठाचाच वापर करावा. आहारात पुरेशा प्रमाणात आयोडिन न खाणार्या स्त्रियांना गर्भपाताचा किंवा  पंगुत्व असलेले मूल जन्माला येण्याचा धोका असतो. आहारात पुरेसे आयोडिन नसल्याचे प्रमुख लक्षण म्हणजे गॉयटर हा रोग ज्या मध्येर गळयाच्याे समोरच्यां बाजूस सूज येते
ऍनिमिया, मलेरिया किंवा हुकवर्म (अंकुशकृमी) ह्या रोगांची शंका असल्यास गर्भवतींनी आरोग्सेवकाचा सल्ला घ्यावा.

महत्वपूर्ण संदेश : विषारी तसेच प्रदूषक पदार्थ, धूम्रपान, मादक द्रव्ये, दारू इ. चे सेवन विशेषत: गर्भवतींना व बालकांना अतिशय हानिकारक असते.


गर्भवतींनी धूम्रपान केल्यास, धुराने भरलेल्या जागेमध्ये वावरल्यास, दारू किंवा  मादक द्रव्यांचे सेवन केल्यास ती स्वतःच्या तब्येतीचे मोठे नुकसान करून घेतेच शिवाय गर्भावरही वाईट परिणाम होतो. तज्ञ आरोग्यसेवकाने शिफारस केल्याखेरीज व नितांत गरज असल्याखेरीज गर्भधारणेच्या काळात स्त्रीोने कोणती ही औषधे घेऊ नयेत.
गर्भवती धूम्रपान करीत असल्यास जन्माला येणारे मूल कमी वजनाचे असू शकते शिवाय त्यास जन्मतःच खोकला, कफ, न्यूमोनिया इ. सारखे श्वसनसंस्थेचे विकार ही असू शकतात.
मुलाची शारीरिक वाढ तसेच मानसिक विकास चांगल्या रीतीने होण्यासाठी त्यांचे व गर्भवतींचे मुख्यतः तंबाखूच्या व चुलीमधून निघणार्या धुरापासून संरक्षण केले पाहिजे. तसेच कीटकनाशके व इतर विषारी पदार्थांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे. काही प्रकारचे रंग, वाहनाचा धूर, पाण्याच्या पाइपांमधून निघणारे शिसे हे हानिकारक प्रदूषकदेखील टाळणे गरजेचे आ

महत्वपूर्ण संदेश : अनेक समुदायांमध्ये स्त्रिया व बालकांचा होत असलेला शारीरिक छळ सार्वजनिक गंभीर आरोग्य- संमस्यां आहे. गर्भधारणेच्या काळात असा छळ झाल्यास ते स्त्रीबरोबरच गर्भास ही हानिकारक असते.


गर्भवतीचा छळ झाल्यास, तिच्याबरोबरच गर्भाचे देखील गंभीर नुकसान होते. अशा छळामुळे काही स्त्रियांना पुन्हा गर्भ राहणे ही कठिण असते. स्त्रीबच्या कुटुंबियांना ह्या गोष्टीची जाणीव असणे व त्यांनी तिला छळकर्त्याण पासून संरक्षण देणे अत्यावश्यक आहे.

महत्वपूर्ण संदेश : शिकलेल्या, निरोगी तसेच लहानपणी व कैशोर्यावस्थेात व्यवस्थित आहार मिळालेल्या मुलींना गर्भधारणा व अपत्यजन्माच्याल दरम्यान कमी त्रास होतो.


लिहितावाचता येणारी स्त्री स्वतःचे तसेच इतर कुटुंबियांचे आरोग्य उत्तम रीतीने सांभाळू शकते. किमान सातवी शिकलेल्या मुली किशोर वयात गर्भवती होण्याची शक्यता कमी असते. अशिक्षित स्त्रियांच्या तुलनेने शिकलेल्या स्त्रिया लग्ने उशीरा करतात.
लहान व तरूण वयात पोषक आहार मिळाल्याने गर्भारपण व प्रसूतीच्याउ वेळी त्रास कमी होतो. पोषक आहारामध्ये धान्ये, कडधान्ये, हिरव्या/केशरी/पिवळ्या पालेभाज्या व फळांचा समावेश होतो. शक्य असेल तेव्हां, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, कोंबडी, मटण, मासेदेखील खावे.
मुलींच्या किंवा स्त्रियांच्या जननेंद्रियांस जखम असल्यास त्यामधून योनिमार्ग किंवा  मूत्रमार्गाचा संसर्ग उद्भवून मरणदेखील ओढवू शकते तर प्रसूतीच्याम वेळी समस्या निर्माण होऊन मानसिक संतुलन ही बिघडण्याचा संभव असतो.

महत्वपूर्ण संदेश : आरोग्यसेवा, विशेषतः गर्भधारणा व अपत्यजन्माच्या  वेळी, मिळणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.

अशी आरोग्यसेवा देणार्या व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित व स्त्रियांना आदरपूर्ण वागणूक देणार्या असाव्या.
गर्भारपण व प्रसूतीच्या  दरम्यान व प्रसूतीनंतरदेखील स्त्रियांना चांगली आरोग्यसेवा व व्यावसायिक स्तरावरील सल्ला मिळाल्यास ह्या क्रियांमधील अनेक धोके टाळता येतात.

डॉक्टर, नर्स किंवा  सुइणीसारख्या कुशल व्यक्तींची मदत मिळण्याचा तसेच गरजेनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत प्रसूतीतज्ञाचे सहाय्य मिळण्याचा सर्व स्त्रियांना अधिकार आहे.

चांगली आरोग्यसेवा मिळाल्यामुळे स्त्रियांना माहिती व समुपदेशनाचा लाभ होऊन स्वतःच्या आरोग्याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेणे शक्य होते. ही आरोग्यसेवा स्त्रियांना सहजपणे मिळायला हवी तसेच त्यांच्यावर खर्चाचे दडपण येता कामा नये. सेवा पुरवणार्यांकडे गुणवत्तापूर्ण सेवा देण्यापचे पुरेसे कौशल्य असले पाहिजे. सर्व स्त्रियांना त्यांच्याकडून आदराची वागणूक मिळायला हवी तसेच त्यांनी सांस्कृतिक नीतिनियमांचे पालन करून स्त्रियांचा गोपनीयतेचा हक्क अबाधित राहील हे पहायला हवे.

 

स्त्रोत : UNICEF

अंतिम सुधारित : 6/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate