अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर किंवा प्रकृती बिघडली तर 'होमिओपथी'च्या शास्त्राप्रमाणे उपचार करता येतात. या शास्त्रामध्ये औषधांचा विचार अगदी वेगळया प्रकारे केला गेला आहे. हानेमान नावाच्या एका विद्वान डॉक्टरने सुमारे दोनशे वर्षापूर्वी या उपचारपध्दतीचा शोध लावला. त्याकाळी तापाकरता,विशेषत: हिवतापाकरता,क्विनाईन हे एक औषध खूप वापरले जाई. हे औषध विषारी असल्याने त्याचे दुष्परिणामही प्रचंड प्रमाणात दिसून येत असत. या उपचारपध्दतीमागील विचार हानेमान यांना फार ठोकळेबाज व ढोबळ वाटला. रुग्ण वेगवेगळी लक्षणे सांगत असताना क्विनाईन आणि इतर पारा, गंधक, इत्यादी तीन-चार औषधांवर काम भागवणे योग्य नाही, असेही त्यांना वाटले. त्यांनी निरोगी अवस्थेत स्वत: क्विनाईनचे डोस घेऊन त्याचा काय परिणाम होतो ते पाहण्याचे ठरविले.
या प्रयोगामुळे झाले असे, की त्यांच्या स्वत:च्या शरीरामध्ये काही लक्षणे उद्भवली. ती लक्षणे त्यांनी नोंदवून ठेवली. त्यांचा अभ्यास करताना त्यांची अशी खात्री पटली, की 'मलेरिया' (हिवताप) झालेला रुग्ण जी लक्षणे सांगतो त्याच्याशी ही लक्षणे अतिशय मिळती-जुळती आहेत. ही घटना अनेक वेळा तपासून पाहिली. त्यांनी स्वत: हे औषध अनेक वेळा वेगवेगळया मात्रेत घेतले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की मात्रा बदलल्याने लक्षणांच्या प्रकारात फारसा फरक पडत नाही. त्या वेळी त्यांच्या असेही लक्षात आले, की कितीही कमी, सूक्ष्मतिसूक्ष्म मात्रा घेतली तरी निरोगी माणसाच्या शरीरामध्ये ठरावीक लक्षणे निर्माण करण्यास ती पुरेशी असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
औषधे वापरण्याच्या बाबतीत महत्त्वाचा नियम म्हणजे धी...
आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था ...
योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म...
डोक्यात कोंडा होणे ही तक्रार खूपदा आढळते. स्त्रिया...