অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रकृतीदोष आणि त्रिदोष

प्रकृतीदोष आणि त्रिदोष

शरीर हे त्रिदोषयुक्त (तीन तत्वे) आहे. काही व्यक्तीत हे त्रिदोष - कफ, वात, पित्त समस्थितीत असतात. बहुतेक जणांमध्ये एक ना एक दोष जास्त असतो. दोष-प्रकृती कशी ओळखायची ते आपण आधी थोडक्यात समजावून घेऊ या.

वातदोष

वातदोषाधिक्याच्या व्यक्ती ह्या नेहमी सडपातळतडतडयालगेच कामाला लागणा-या,पण कामात सातत्य नसणा-या असतात. त्यांची भूक कमीजास्त होतेपण अन्न कितीही घेतले तरी वजन वाढत नाही. मळाला कोरडे खडे होण्याची प्रवृत्ती असते. काही ना काही आजारपण वारंवार असते. गरम अन्न आवडते पण पंखा व गारठा नकोसा वाटतोथंडीत लोकरीचे कपडे लागतातच अशी प्रवृत्ती असते. या व्यक्तींच्या शरीरावरील शिरा (निला) उठून दिसतात. त्यांची त्वचा रखरखीत कोरडी दिसते. पावसाळयात वारंवार आजारपण आढळते. शरीरातील मांसल भाग कडकडीत असतो.

पित्तदोष

पित्तदोषाधिक्याच्या व्यक्तींना उकाडा सहन होत नाही. त्वचा इतरांच्या मानाने थोडी गरम असते. मांसल भाग इतर प्रकृतीच्या मानाने मऊ लागतो. नेहमी भरपूर भूकझटपट पचन होत. भुकेच्या काळात पुरेसे खाणे न मिळाल्यास कासावीस होणे दिसून येते. मात्र ऑक्टोबरमध्ये आजारी पडण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तीस भराभर नवीन कल्पना सुचतातरागही जास्त असतो. अशा व्यक्तींना मलमूत्रविसर्जनासंबंधी किंवा अपचनाचे आजार सहसा होत नाहीत.

कफदोष

कफदोषाधिक्याच्या व्यक्ती नेहमी गुटगुटीतशांत-संथ,  मोजके खाणा-याउष्णताप्रिय,इतरांच्या मानाने निरोगीन दमता काम करणा-यागाढ झोपणा-याव्यायामप्रिय अशा असतात.

वरीलप्रमाणे एकेक दोषाधिक्य असलेल्या व्यक्तींप्रमाणे दोन-दोन दोषाधिक्यांचे मिश्रण असलेल्या प्रकृतीच्या व्यक्तींही आढळतात हे लक्षात ठेवले पाहिजे.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate