অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झाली विश्वकोशाची परिपूर्ती .....

झाली विश्वकोशाची परिपूर्ती .....

जगातील 'अ' पासून ते 'ज्ञ' पर्यंतच्या विविध संज्ञांची माहिती मराठी माणसाला व्हावी, यासाठी हाती घेण्यात आलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीच्या कामाची 55 वर्षांनी परिपूर्ती झाली आहे. ब्रिटानिका एनसायक्लोपीडियाच्या धर्तीवर मराठीतून ज्ञानाचा खजिना उघडणाऱ्या विश्वकोशाची सुरुवात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनीं केली होती. आता मराठी विश्वकोशाच्या 20 व्या खंडाचा उत्तरार्ध नुकताच प्रकाशित झाला आहे. या खंडाची काही वैशिष्ट्ये :

  • मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत एकूण 19 खंड प्रकाशित झाले आहेत. 20 वा खंड पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात प्रकाशित झाला आहे.
  • विश्वकोशाचे आता अ ते ज्ञ असे 20 खंड आता तयार झाले आहेत.
  • विसाव्या खंडाच्या उत्तरार्धाचे काम सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते आणि त्यानुसार ठरवलेल्या वेळेत हे काम पूर्ण झाले.
  • सध्या मराठी विश्वकोशाच्या वेबसाइटवर विसाव्या खंडाच्या पूर्वार्धापर्यंत 26 हजार पाने उपलब्ध आहेत. या खंडाचा उत्तरार्धही लवकरच विश्वकोशाच्या इतर खंडांप्रमाणेच वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
  • 20 व्या खंडाच्या पूर्वार्धचे प्रकाशन 8 जानेवारी 2015 रोजी झाले. तर 20 व्या खंडाच्या उत्तरार्धाचे प्रकाशन 24 जून 2015 रोजी झाले आहे.
  • 20 व्या खंडाच्या पूर्वार्धात एकूण 690 नोंदी असून 48 चित्रपत्रे आहेत.
  • मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाच्या उत्तरार्धात हर्षवर्धन सम्राट ते ज्ञेयवाद अशा 636 नोंदी आहेत. त्याचबरोबर यामध्ये 18 विविध विषयांवरील चित्रपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मासे, पक्षी यांची चित्रपत्रे आहेत. याशिवाय या खंडात हळदणकरांची चित्रेही समाविष्ट करण्यात आली आहेत.
  • डॉ. विजय भटकर यांनी पुढाकार घेऊन विज्ञान विषयातील उर्वरित नोंदी वाचण्याची जबाबदारी स्वीकारली व हे काम पूर्ण झाले. यासाठी डॉ.सु.र. देशपांडे यांनी मानव्य विभागाच्या संपादनाची जबाबदारी पेलली.
  • मराठी विश्वकोश marathivishwakosh.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाची ग्रंथाला जोड देऊन “जेथे जेथे मराठी तेथे तेथे उभा विश्वकोश तुझ्यासाठी” असेच जणू ज्ञानाचे भांडार खुले केले आहे.
  • ब्रिटानिका एनसायक्लोपीडियाच्या धर्तीवर मराठीतून ज्ञानाचा खजिना उघडणाऱ्या विश्वकोशाची सुरुवात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनीं केली होती. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 1 ते 14 खंड तयार केले. 15 आणि 16 वा खंड तसेच कुमार विश्वकोश परिचय ग्रंथ श्रीयुत मे. पु. रेगे आणि रा. ग. जाधव यांनी तयार केले. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी विश्वकोश वार्षिकी तयार केली. डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली 17, 18, 19 आणि 20 (पूर्वार्ध), (उत्तरार्ध) असे खंड तयार झाले.
  • मराठी विश्वकोशाबरोबरच कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण चार भागात प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यापैकी दोन भाग प्रकाशित झाले आहेत.
  • अंधासाठी बोलका विश्वकोश, कन्यासाठी बोलका कन्याकोश आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे marathivishwakosh.in ही विश्वात पोहोचलेली वेबसाईट ही विद्यमान विश्वकोश मंडळाची उपलब्धी आहे. सीडॅकच्या सहकार्याने विश्वकोश विश्वरुप झाला आहे.


-वर्षा फडके
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate