पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. शाळेने आतापर्यंत सुंदर शाळा, बाल बँक असे वेगवेगळे विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविले आहेत. या शाळेतच सध्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पर्यावरण रक्षणासाठी आणि शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी कुंड्यांतील झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पन्हाळा तालुक्याच्या अत्यंत दुर्गम भागात असलेली बादेवाडी ही जिल्हा परिषदेची शाळा, मात्र, या शाळेतील शिक्षक उपक्रमशील आहेत. ग्रामीण भागातील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना बचतीची सवय लागवी, स्वच्छतेची सवय असावी यासाठी वेगवेगळे उपक्रम या शाळेने काही दिवसांपूर्वी राबविले आहेत. बाल बँक हा या शाळेचा सर्वात गाजलेला उपक्रम होता. वर्षभर आई-वडील आणि नातेवाइकांनी दिलेले पैसे मुले बाल बँकेत साठवतात आणि त्यातून वर्षाच्या सुरुवातील पाठ्यपुस्तके आणि कपडे खरेदी करतात. नोव्हेंबर 2014 पासून शाळेतच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही वाढदिवस साजरे केले जातात. वाढदिवसावर खर्च होणारी रक्कम साठविली जाते. त्यातून सुंदर बाग उपक्रमासाठी नुकतीच कुंड्यांची खरेदी केली आहे. संपूर्ण परिसर सुशोभित करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक गणपती सूर्यवंशी, शिक्षक संजय सराटे, गुलाब बिसेन, सरिता खरपुडे, स्नेहल जगदाळे यांचे सहकार्य लाभले आहे.
वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मुले आणि शिक्षक याबरोबरच पालकांमध्ये एक वेगळे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाल बँकेच्या माध्यमातून लोकांचा आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमच्यामध्ये उत्साह निर्माण झाला त्यातूनच हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आल्याचे आणि तो यशस्वी होणार असा विश्वास बादेवाडी शाळेतील शिक्षक गुलाब बिसेन यांना आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/21/2020
या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आह...
शेती आणि शेती उत्पादनांना कर्ज देणाऱ्या संस्था, ...
शेतकरी क्रेडीट कार्ड (किसान क्रेडीट कार्ड) काय आहे...
आपल्याला आतापर्यंत पैसे, रक्त, आय बँक अशी नावे ऐकल...