सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगुळ वाटून ‘तीळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. इंग्रजी महिन्यानुसार सध्या १४ जानेवारीस येते. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
पौष महिन्यात येणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत. हा सण धार्मिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने महत्वाचा असला तरी खंर म्हणजे, संक्रांत हा निसर्गाचा सण आहे. संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे, अर्थात मकर राशीत सुर्याचा प्रवेश होणे याला मकर संक्रमण म्हणतात. संक्रातीच्या दिवसापासून सुर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. सुर्याच्या या गमणास उत्तरायण असे म्हणतात. दिवस मोठा होतो रात्र लहान होते. सुर्यप्रकाश अधिक मिळु लागतो या घटनेचा मानवी जीवनावर परीणाम होतो.
या सणाला धार्मिक महज्ञ्ल्त्;वही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे. या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वहनावर बसुन, वस्त्रालंकाराने सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱया दिशेकडे जात असते असे वर्णन पंचागात दिलेले आहे. संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते. विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात. त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरूनच आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाकप्रचार आलेला आहे या दिवशी सुवासिनी स्त्रिया पाच घट आणि पाच बोळकी आणुन त्यांना चुना व कंुकू लावतात. त्यात गहु, कापुस, हळकंुडे वगैरे घालुन त्याचे वाण देतात या मातीच्या घटानां सुघट किंवा सुगड असे म्हणतात. त्या दिवशी हळदी-कुंकूही केले जाते. तिळगुळाबरोबर एखादी संसार उपयोगी वस्तु सुवासिनींना देतात. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. त्या दिवशी मुंगाच्या डाळीची खिचडी, तिळाच्या भाकरी, लोणी देवाला समर्पण करून नतंर सेवन कराव्यात असे सांगितले आहे.
संक्रांतीच्या सणाला सामाजिक दृष्टयाही विशेषमहत्व आहे. यादिवशी मनातील व्देषभाव नष्ट करून परस्परात प्रेम निर्माण करावयाचे असते. जीवनात गोडी निर्माण करायची असते. तिळातील स्नेह आणि गुळातील गोडी आमच्या जीवनात यावी म्हणून तर आपण तिळगुळ देतो. मित्रमित्रांनी एकमेकांना तिळगुळ द्यावाच, परंतु ज्याच्याशी आपले भांडण झाले असेल त्यालाही तिळगुळ द्यावा. भांडण मिटवुन मैत्रिचा हात पुढे करावा. केवळ हिंदु धर्मातील बांधवांना तिळगुळ न देता अन्य धर्मियांनासुध्दा तो द्यावा. आपला देश विविध धर्म, पंथ यांनी भरलेला आहे. पण तरीही आपण भारतीय आहोत. भारत आपला देश आहे. या निमित्ताने निर्माण झालेली बंधुता, प्रेम हे देशाच्या हिताची ठरेल. माहिती संकलन: प्राची तुंगार
स्त्रोत: बालपण
अंतिम सुधारित : 1/30/2020
पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा प...
गोडवा माणसं एकत्र येण्याचा, गोडवा त्या सणाच्या पाव...