(१)उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांत कोणत्याही युरोपीय राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन करू नयेत. (२) सद्य:स्थितीत यूरोपीय राष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या अमेरिकेतील वसाहतींमध्ये अमेरिकेच्या संयुक्त स्थानांनी पूर्वी हस्तक्षेप केलेला नाही व पुढेही ती करणार नाही. (३) यूरोपीय राष्ट्रांनी अमेरिका खंडांतील देशांवर ताबा मिळवून त्यांवर आपली राज्यपद्धती लादण्याचा प्रयत्न केला, तर तो अमेरिकेच्या शांतता व सुरक्षिततेस धोका आहे, असे समजण्यात येईल आणि (४) यूरोपिय राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींत अमेरिका हस्तक्षेप करणार नाही, तसेच अमेरिकन देशांच्या अंतर्गत बाबींत यूरोपीय देशांना ढवळाढवळ करू दिली जाणार नाही. मन्रो सिद्धांतामुळे जवळजवळ शंभर वर्षे अमेरिकन अलिप्ततावादी परराष्ट्रधोरण स्वीकारले आणि ते लॅटिन अमेरिकेतील देशांत बाह्या हस्तक्षेपास विरोध करून त्यांच्यावर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. मन्रो सिद्धांतमध्ये अमेरिकन जनतेला प्रिय असणार्या स्वातंत्र्य, राष्ट्रवाद इ. तत्वांचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्यास देशात लोकप्रियता व मान्यता लाभली.
संदर्भ: 1. Dexter Perkins, A History of Monroe Doctrine, London, 1955.
2. Perkins, Bradford & Others, England and The United States: 1812-23, Cambridge (California), 1965.
लेखक - चौसाळकर अशोक
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/27/2020
१९०५ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनने प्रकाशाच्या वेगासं...
इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक ...
सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या. मंगलोर य...
फ्रेंच गणितज्ञ. गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत