प्राण्यांमधील उभयलिंगतेची अनेक उदाहरणे आहेत. आदिजीव संघातील पॅरामेशियमामध्ये, आंतरदेहगुही संघामधील, तसेच रंध्री संघातील स्पंजामध्येही उभयलिंगता आढळते. इतर प्राणिवर्गांत व बहुपेशीय प्राण्यांच्या आंतरदेहगुही संघापासून मानवापर्यंत प्रामुख्याने एक बदल असतो, तो म्हणजे विशिष्ट युग्मक निर्माण करणार्या पेशींचे पुंजके शरीराच्या विशिष्ट भागात जननग्रंथी ( अंडाशय वा वृषण) म्हणून असतात. पृथुकृमी संघात उभयलिंगता मोठ्या प्रमाणावर आढळते. यकृतकृमी व पट्टकृमी ही त्यांची उदाहरणे आहेत. वलयी संघात गांडुळे, जळवा इ. उभयलिंगी प्राणी आहेत. संधिपाद संघात बार्नेकलमध्ये उभयलिंगता आढळते. मृदुकाय संघामधील सर्व गोगलगायी उभयलिंगी आहेत. कंटकचर्मी संघात सागरी काकडी व भंगुरतारा या प्राण्यांत उभयलिंगता आढळते.
उभयलिंगता ही जरी इंद्रियातील रासायनिक प्रक्रिया व त्यातील बदल यांमुळे निर्माण झाली असली, तर ती प्रामुख्याने सजीवांच्या टिकाव धरून राहण्याच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेली आहे. कमी विकास पावलेले व अपृष्ठवंशी प्राणी यांमध्ये उभयलिंगता जास्त प्रमाणात आढळते. सरपटणारे (सरीसृप) प्राणी, सस्तन प्राणी व पक्षी अशा विकसित प्राण्यांमध्ये एकलिंगता आढळते. उभयलिंगता ही लिंगरचनेची सुरुवातीची अवस्था असून त्यातूनच एकलिंगता निर्माण झालेली आहे.
मानवात स्त्री-व पुं-जननेंद्रिये असलेली एखादी व्यक्ती आढळते. अशी व्यक्ती सामान्यपणे तृतीय पंथी म्हणून ओळखली जाते. पुं- व स्त्री-संप्रेरकांच्या कमी-अधिक स्त्रवण्यामुळे स्त्री शरीरात पुं-संप्रेरकांच्या अधिक्यामुळे किंवा पुरुष शरीरात स्त्री-संप्रेरकांच्या अधिक्यामुळे अशी स्थिती उद्भवते. तांत्रिक दृष्टया या प्रकाराला उभयलिंगी म्हणता येत नाही.
लेखक - पाटील चंद्रकांत
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/9/2020
वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा प...
हे सजीवांचे एक प्रमुख लक्षण आहे. मर्यादित आयुष्याम...
गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून...
राज्यातील किशोरवयीन मुला मुलींची संख्या (वय वर्ष...