অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्‍वामी विवेकानंद आणि युवक

स्‍वामी विवेकानंद आणि युवक

आपल्‍याला गौरवशाली भारत घडवायचा आहे. यासाठी निःस्वार्थी नेत्यांच्या आदशांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे एक माध्यम आहे. संपूर्ण समाजव्यवस्थेचा पायाच आता कोलमडू लागला आपल्यास सांगितला आहे व तो म्हणजे पराविदया आणि अपराविदया यांची सांगड हा होय. विज्ञान, गणित, भाषा या विषयांखेरीज आपल्याला चारित्र्य निर्माण या विषयावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल.

'हे नवयुवका, राष्ट्र बघ तुला साहाय्यार्थ बोलवी

वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...

तुझ्या जीवनी चैतन्यमयी पहाट येवो नवी

वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...

भारताच्या भूमीत जन्मलेले एक अलौकिक व्यक्तिमत्वाचे महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे सा-या जगाचे लक्ष वेधले.

आजच्या आधुनिक युगातही त्यांचे विचार श्रेष्ठतम ठरणारे आहेत. पृथ्वीच्या पाठीवर असा कोणता एक देश असेल की ज्याला 'पुण्यभूमी' हे गोड आणि अन्वर्थक नाव दयावे लागेल, असे एखादे स्थान असेल की, जिथे माणसात कोमलता, शुचिता, दया, दक्षिण्य, क्षमा, प्रकृती सद्गुणांचा इतर कुठल्याहीपेक्षा अधिक विकास झाला, अशी कोणती एखादी भूमी असेल जिला आंतरराष्ट्रीय आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय. आपला भारत जगाला जगभरातील भ्रमंतीत अनुभवास आलेली काही ठाम सत्ये उपचार म्हणून साजरी न करता मुख्यतः त्यांची जीवनप्रणाली, त्यांचे विचार, कार्य यांचे पुनःपुन्हा स्मरण केले पाहिजे. तावून सुलाखून घेतलेल्या अनुभव विश्वाच्या बळावर स्‍वामींनी आपले विचार आत्‍मविश्‍वासपूर्वक मांडले.

विवेकानंदांचा जन्म १८६३ मधला. केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभलेले विवेकानंद समस्त मानवजातीसाठी होते. विज्ञानयुगाची सुरुवात होत असतानाच त्यांनी भविष्यकाळात होणारा धर्म आणि विज्ञान यातील संघर्ष अटळ आहे हे त्यांनी ओळखले होते म्हणूनच पर्यावरण, व्यक्त केलेली मते आजही गांभीर्याने विचार व्हावा अशीच आहेत. विवेकानंदांनी पर्यावरणाचा आदर करा, मात्र मानवी आणि काळाच्या पुढे जाऊन असलेली विचारधारा व्यक्त केली. यंत्रे हवीत पण यंत्रांनी मानवी सर्जनशीलतेला हद्दपार करता कामा नये हे त्यांचे म्हणणे आधुनिक वस्तूंची विपुलता येईल आणि त्यामुळे माणसे आत्मकेंद्रित होतील हे त्यांनी वर्तविलेले भाकीत आज तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे.

भारत देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटली आहेत व आता शतकांकडे वाटचाल सुरू आहे.

ब्रिटिशांच्‍या हातून सत्‍ता भारतीयांच्‍या हाती स्थिरावली आहे, परंतु हे खरे स्वातंत्र्य नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद विक्रमी विश्वविजय संपादन करून १८९७ साली भारतात परतल्यावर त्यांच्या पहिल्यावहिल्या भाषणात मद्रास (आताचे चेन्नई) येथील युवकांसाठी आवाहन केले होते. 'हे, भारतातील युवकांनो, आता उठा! जागे व्हा!!! आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. तेहतीस कोटी देव देवतांची बंदिस्त मंदिरात पूजा प्रार्थना करण्याऐवजी आपली शक्ती व वेळ या विराट अशा भारतमातेस अर्पण करा व या मातेच्या तेहतीस कोटी लेकरांची, 'शिवभावे जीवसेवा' या भावनेतून सेवा करा सुभाषचंद्र बोससारख्या अनेक नेत्यांनी केले व आपल्या प्राणांची मातृभूमीच्या वेदीवर आहुती दिली या संग्रामात त्यांना आपली मातृभूमी सर्वश्रेष्ठ होती. दुर्दैवाने हे स्वातंत्र्य मिळताक्षणीच आम्हाला वाटले की आपले काम संपले व आपण तेथेचे थांबलो आपण पूर्णपणे विसरून गेलो की, स्वातंत्र्य ख-या अर्थाने पूर्णत्वास जाण्यास या स्वातंत्र्याचा लढा वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर चालूच असावा लागतो. देशसेवेच्या समिधा वाहत राहिल्याशिवाय यज्ञातील अग्नी प्रदिप्त असूच शकत नाही. तो विझुन जाईल व आपले तेच घडले.

आज आपण वेगवेगळे संप्रदाय, पंथ, धर्म यामध्ये विभागले गेलो. आपल्याभोवती अनेक विहिरी बांधून आपण या असंख्य विहिरीत राहू लागलो व बाहेरील जनसागराचा, समाजाचा आपल्याला विसर पडला. सनातन अशा हिंदू धर्मात जो मानव धर्म अभिप्रेत आहे त्या विश्वधर्माची आपली पकड हळूहळू ढिली पडत गेली. सगळेच धर्म सत्य असून त्या वेगवेगळ्या मार्गानी आपण अंतिम सत्याकडे म्हणजेच ईश्वराकडे पोचू शकतो, या वेदांतील वचनाचे आपणास विस्मरण घडले. आपण याचे आत्मचिंतन करूया व योग्य आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहे. गरीब लोक उपासमारीने व कर्जाला कंटाळून आजही घरी सुखरूप परतेल याची शाश्वतीही कमी झाली आहे. अनेक युवक,युवती नैराश्येपोटी आत्महत्येस प्रवृत्त झाल्या पिळवणूक, व्यभिचार, युवती-स्त्रियांवर होणारे अत्याचारबलात्कार आपण आपल्यास सोयरसुतक नसल्याप्रमाणे निष्क्रिय राहून किती वेळ सोसणार? दिल्लीच्या प्रकरणाने आज सावधानतेची घंटा वाजली आहे.

तेव्हा 'पुढे चला, सतत पुढे चला!” अगदी अखेरपर्यंत माणसाविषयी सहानुभूती बाळगा. हाच आपला मूलमंत्र असू दया. ईश्वरावर विश्वास असू दया. कोणत्याही कूटनीतीचे काही प्रयोजन नाही कूटनीतीने, कपटाने, चलाखीने काहीही साधत नसते. दु:खितांसाठी तुमचे हृदय कळवळूदया आणि साहाय्यासाठी भगवंताची प्रार्थना करा. तुम्हाला साहाय्य मिळेलच. मी तुमच्यासाठी गरीब, अज्ञानी आणि दलित यांच्याविषयी सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी प्राणपणास लावून प्रयत्न करण्याचा वारसा ठेवून जात आहे. हे जे तीस कोटी भारतवासी दिवसेंदिवस खाली खाली जात आहेत त्यांना वर आणण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी आपले सारे जीवन अर्पण करण्याची तुम्ही प्रतिज्ञा करा. तुम्ही खरोखरच जर माझे संतान असाल तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगायला नको, कशानेही तुमच्या प्रगतीत बाधा यायला नको. तुम्ही सिंहासारखे व्हाल. आपण सा-या भारताला. समस्त जगताला जागृत केले पाहिजे.

'तरी न कधीही कोमेजावी मनातली पालवी,

वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...

देही असावी बलसंपत्ती

आपण सुरुवात कुठून करणार याचे उत्तर आपल्याला

विवेकांनंदांनी तयार ठेवले आहे. आपल्‍याला गौरवशाली भारत घडवायचा आहे. यासाठी नि:स्वार्थी नेत्यांच्या आदशांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे एक माध्यम आहे. संपूर्ण समाजव्यवस्थेचा पायाच आता कोलमडू लागला आहे. यावर एक महत्वाचा उपाय विवेकानंदांनी आपल्यास सांगितला आहे व तो म्हणजे पराविदया आणि अपराविदयाची सांगड ही होय. विज्ञान, गणित, भाषा या विषयांखेरीज आपल्याला चारित्र्य निर्माण या विषयावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. दुर्दैवाने आपण हा विषय वर्गामध्ये पाठ्यपुस्तकातील धड्याच्या माध्यमातून विदयार्थ्यांना देण्याचे काम करतो. याची सुरुवात खरी तर कुटुंबातील वडिलधा-या मंडळींकडून व त्यांच्या कृतीतून झाली पाहिजे व पुढे ती शिक्षकांच्या उक्तीतून आणि वर्तनातून घडली पाहिजे. तरच आजचा युवक योग्य अर्थाने घडेल नष्पक्षा तो बिघडेल.

ख-या अर्थाने प्राचीन संस्कृती आणि वैभवशाली इतिहासाचे लेणे लाभलेले भाग्यवान आपण आहोत. पण आजची युवापिढी ही संगणक युगात जन्माला आलेली ज्ञान न देणे ही चूक आधीच्या पिढ्यांची आहे हे निश्चित! उज्ज्वल भविष्याच्या निर्माणासाठी वर्तमानात भूतकाळाचा अभ्यास करणे महत्वाचे असते. बलवान राष्ट्राच्या उभारणीसाठी ते आवश्यक असते. आजची युवापिढी ही चंगळवादाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. याला कारण, अस्मितेची विस्मृती झालेला समाज! भय, भोग, भ्रम आणि भंपकपणाचा बाजार जोरात चालू आहे. बुद्धभेद करणारे विचारवंत विषाणूंप्रमाणे पसरत चालले आहे. देव देश आणि धर्माबाबतची आस्था कमी होत चालली आहे; किंबहुना या गोष्टींना ठोकरणे म्हणजेच पुरोगामिता असा दुष्ट प्रचार चालू आहे. कोणत्याही मार्गाने धनवान बनावे असा एक कलमी कार्यक्रम दिसतो. त्यासाठी कोणताही विधिनिषेध पाळला जात नाही. श्रमापेक्षा दिखाव्याला प्रतिष्ठा आली आहे. चारित्र्य, राष्ट्रभक्ती, सेवा आणि त्याग या गोष्टी शब्दकोशापुरत्याच मर्यादित होताना दिसत आहेत. हे सर्व आपल्याला नेमके कोठे घेऊन जाणार असा प्रश्न पडतो.

स्वामीजी आपल्या उपदेशात म्हणतात, 'धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखादया दिवसात वा एखादया वर्षातच यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका, मतस्त्र आणि स्वार्थपरायणता या दोन्ही गोष्टी टाळा. यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक राहा. म्हणजे अवघे जग हलवून सोडाल. लक्षात ठेवा की, स्वतःचे व्यक्तिमत्त्व, स्वत:चे जीवन हेच शक्तीचे रहस्य आहे. अन्य काही नाही.

आजच्या पिढीवर हेच संस्कार हवेत. दुर्दैवाने संस्कारक्षम वयात शाळा-महाविदयालयात हे मिळत नाहीत. वाटते. तथापि, शालेय पुस्तकातून जो जातीय द्वेषाचा खोटा इतिहास आजही शिकविला जातो त्याचे काय? स्फूर्ती मिळावी, पराक्रम गाजवावा असे वाटायला लावणारा कोणता भाग शिकवला अथवा सांगितला जातो. स्वत:च्या विचारांनी उत्तरेसुद्धा लिहू न शकणारी पिढी आपणच निर्माण करीत आहोत. मग, स्वतंत्र विचार करण्याचे बाळकडू कसे मिळणार? व्यायामाचे महत्व सांगण्याऐवजी स्नायूवर्धक, उंचीवर्धक आणि बलवर्धक औषधे खाऊ घालून बलवान, समाजाची निर्मिती होते काय?

स्वामीजींनी एका शिष्याला भगवद्गीता वाचण्यापेक्षा बाहेर जाऊन फुटबॉल खेळ असा सल्ला दिला होता, त्याची आठवण होते. याबाबत, स्वामीजी म्हणाले होते, 'बलवान व निरोगी शरीरात सशक्त मन नांदते. अशक्त शरीरात तसे होणे संभव नाही.’ आजची पिढी फुटबॉल, हॉकी, क्रिकेट आदी खेळ खेळून दमते... फक्त हे खेळ ती संगणकावर खेळते आणि दमते, याला काय म्हणावे? स्वामीजी म्हणतात, 'अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे भिऊन केलेल्या अनुकरणाने कधीच प्रगती होणार नाही.

आपल्या पद्धतीने ग्रहण करून आत्मसात करावी. आपले स्वातंत्र्य गमावून आपण दुस-याप्रमाणे होऊ नये. भारतीय जीवनपद्धतीच्या बाहेर जाऊ नका. अन्य समाजाप्रमाणे सर्व भारतीयांनी पोषाख केला, अन्न घेतले व त्यांच्या चालीरिती उचलल्या म्हणजे कल्याण होईल असा विचार क्षणभही मनात आणू नका.? इंग्रजांनी जी शिक्षण व्यवस्था तयार करून दिली तीच आपण अांधळेपणाने राबवीत आहोत. त्यामुळे त्या वेळच्या शिक्षणाबद्दल स्वामीजी जे विचार मांडतात ते आजही लागू असल्याचे दिसते ते सहजपणे सांगतात, 'ज्या शिक्षणामुळे सामान्य जनता जीवनसंग्रामाला लायक होत नाही. ज्या शिक्षणामुळे चारित्र्यबल, परसेवातत्परता आणि सिंहासारखे साहस निर्माण होत नाही त्याला शिक्षण म्हणायचे का? ज्या शिक्षणामुळे माणूस आपल्या पायावर उभा राहू शकतो ते खरे शिक्षण होय. आहेत. ती जन्माला येतात व मरून जातात, अन्य काहीही करीत नाहीत.”

उपनिषद काळात गुरू धर्मचर, सत्‍यवद, मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव' या गोष्टी आपल्या सोडून पैसे कसे मिळवावेत याचे शिक्षण शाळा-कॉलेजातून दिले जाते. चारित्र्यशील नागरिक घडविणे व त्यादृष्टीने पावले राष्ट्र उत्थान.” या विवेकानंदांच्या विचाराकडे आपण प्रवृत्त शोभायात्रा, मिरवणुका, मेळावे व भाषणे यापुरतेच मर्यादित राहून काहीच साध्य होणार नाही तर या गोष्टींतून स्फूर्ती घेऊन विचारांच्या माध्यमातून आचारांच्या स्तरावर आपल्याला उतरावे लागेल व यातून मनुष्य निर्माणाची प्रक्रिया आपल्याला साधता येईल. यासाठीच स्वामीजी सांगतात, 'स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वांत महत्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा... ' स्वतःच स्वतःचे भवितव्य घडवा. 'गतं न शोच्यम्' जे झाले ते होऊन गेले. त्याबद्दल खंत करीत बसूनका. म्हणतात ना की 'वाहिले ते पाणी नि राहिली ती गंगा’ अनंत भावीकाळ तुमच्यापुढे विस्तारलेला आहे आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावयास हवे की तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार नि प्रत्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील आणि हे पण सदा लक्षात असू दया की, तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेली कुकमें ज्याप्रमाणे वाघासारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत, त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तिदायी आशेची गोष्ट आहे, की तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कमें हजारो लाखो देवदूतांच्या शक्तीने तुमचे रक्षण करण्यास सदासर्वदा सज्ज आहेत.

'सामथ्र्य तुझ्या बाहूमधले तूच जगा दाखवी

वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...

प्रयोगशाळा, रणमैदाने

तारुण्याला ही आक्हाने।”

तेव्हा या समर्पक विचारांवर कृती होणे आवश्यक होते, पण स्वातंत्र्योत्तर काळात मागील पानावरून पुढे चालू अशी गत झालेली आहे. आताची युवा पिढी हुशार आणि चौकस आहे. तिला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ते नसल्याने तिच्यासमोर जीवनउद्देशच नाही. सुराज्य निर्माण करणे हे ध्येय या पिढीच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. आजचे स्वराज्य हे क्रांतिवीरांनी सांडलेल्या रत-घामअधूंच्या पायावर उभे आहे हे त्यांना कळायला हवे.

तेव्हा या नवपिढीच्या युवकांसाठी शेवटी एवढेच सांगायचे आहे ...

एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवनसर्वस्व बनवा; सतत तिचाच ध्यास घ्या, स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ दया. इतर कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. - स्वामी विवेकानंद

लेखिका : सृष्‍टी बाबूराव पोवार,  सिंधूदूर्ग

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

अंतिम सुधारित : 2/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate