उडणारे मासे : एक्झॉसीटिडी आणि डॅक्टिलॉप्टेरिडी या मत्स्यकुलांतील मासे उडणारे आहेत. यांशिवाय गोड्या पाण्यात राहणारे दक्षिण अमेरिकेतील गॅस्टरोपेलेसिडी कुलातले काही आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात आढळणारे पँटोडोटिडी कुलातले काही मासे उडणारे आहेत.
जलजीवालय : ज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात.
जलमत्कुण : विशिष्ट जलवासी कीटकांना हे नाव देतात. त्यांना नावाडी या नावानेही संबोधितात. त्यांचा समावेश हेमिप्टेरा गणातील नोटोनेक्टिडी व कॉरिक्सिडी कुलांत करतात.
पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या पाच वर्गांपैकी पक्षी वर्गात (एव्हीज वर्गात) सर्व पक्ष्यांचा समावेश होतो.
पक्ष्यांना चक्रीवादळाची चाहूल ते वादळ सुमारे 900 किमी अंतरावर असतानाच लागत असल्याचे अमेरिकी संशोधकांना आढळले आहे.
पार्श्विक रेखा : मासे, उभयचरांचे (जमिनीवर व पाण्यातही राहणाऱ्या प्राण्यांचे) काही गट आणि उभयचरांच्या डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी प्राण्याची क्रियाशील पूर्वावस्था) यांच्यात शरीराच्या बाजूंवर आणि डोक्यावर द्रवाने भरलेल्या त्वचीय नालांचे (वाहक मार्गांचे) एक तंत्र (संस्था) असते.