पक्ष्यांना चक्रीवादळाची चाहूल ते वादळ सुमारे 900 किमी अंतरावर असतानाच लागत असल्याचे अमेरिकी संशोधकांना आढळले आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये या संदर्भातील पुरावे मिळाले आहेत.
काही पशू, पक्षी आणि प्राण्याच्या संवेदना अधिक तीक्ष्ण असतात. त्यांना निसर्गात होणाऱ्या बदलांची चाहूल खूप आधी लागते. संशोधनामध्ये भूकंपाची चाहूल कुत्र्यांना प्रत्यक्ष भूभागाला धक्का बसण्यापूर्वी पाच मिनिटे आधी होते. अमेरिकी पैदास केंद्रामध्ये पक्ष्यांच्या स्थलांतरासंदर्भात अभ्यास करण्यात येत होता. त्या वेळी पक्ष्यांच्या वर्तनविषयक नोंदी ठेवण्यात येत होत्या. त्या वेळी पक्ष्यांना महाभयानक वादळांमुळे सुमारे 900 किलोमीटर अंतरावरून आपली दिशा बदलल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधक डेव्हिड अँडरसन यांनी सांगितले की, पक्ष्यांच्या अचानक बदललेल्या दिशेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी आम्ही बॅरोमीटरच्या साह्याने दाब, वाऱ्याचा वेग वेगवेगळ्या उंचीवर मोजले. मात्र, त्यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. वादळापासून जमिनीतून वाहणाऱ्या इन्फ्रासाउंडची मोजणी आम्ही केली नाही.
सोनेरी पंखांचा वार्बल हा पक्षी कॅनडाच्या आग्नेय आणि मध्य भागामध्ये प्रजोत्पादन करतो. अशा सुमारे 70 टक्के प्रजाती विस्कॉन्सिन, मिन्निसोटा आणि मनिटोबा भागामध्ये पुनरुत्पादनासाठी येतात. या पक्ष्यांनी 2013 मध्ये टेनिसी पर्वताचा पुनरुत्पादनाचा भाग अचानक सोडला. त्यांनी सुमारे 2500 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास झालेला असताना, अचानक क्यूबाच्या दिशेने 1500 किलोमीटर उडत प्रवास केला. या वेळी वादळ 900 किलोमीटर अंतरावर होते. केवळ पाच ते सहा दिवसांमध्ये त्यांनी मोठा वेढा मारून वादळाला चुकवले. याबाबतचे निष्कर्ष "जर्नल करंट बायोलॉजी'मध्ये मांडण्यात आले आहेत.
या आधी झालेल्या संशोधनामध्ये कबुतरांमध्ये इन्फ्रासाउंड जाणून त्यानुसार दिशा ठरविण्याचे तंत्र अवगत असल्याचे दिसून आले होते. इन्फ्रारेड साउंड या लहरी 0.5 हर्टझ ते 18 हर्टझ असून, मानवी श्रवणक्षमतेपेक्षा खूप खाली असतात. मात्र, सर्वच पक्ष्यांच्या मेंदूमध्ये या लहरी जाणून घेण्याची क्षमता असेल काय, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. मात्र, या संशोधनामुळे पक्ष्यांच्या क्षमतेविषयीची ग्राह्यता वाढण्यास मदत होईल.
वातावरणातील बदलामुळे वादळाची तीव्रता आणि वारंवारीताही वेगाने वाढत आहे. या वादळापासून बचावण्यासाठी पक्ष्यांकडे काही एक क्षमता असल्याचे दिसून आले आहे. अत्यंत कमी कालावधीच्या सूचनेनंतर पक्ष्यांनी आपला प्रवासाचा मार्ग बदलला, ही त्यांच्या निर्णयक्षमतेचीही चुणूक ठरणार आहे.
- डेव्हिड अँडरसन, संशोधक, मिन्निसोटा विद्यापीठ.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची- चित्रपट-परिच...
आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापास...
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकड...
स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या...