सूर्यमालेतील केंद्रबिंदू. ज्याच्याभोवती सूर्यमालेतील सर्व ग्रहउपग्रह फिरतात तो सूर्य.
सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या नंतरचा पृथ्वीच्या जवळचा दुसरा तारा जवळपास ४ प्रकाशवर्षे अंतरावरील नरतुरंग ह्या तारकासमुहामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जीवनावश्यक ऊर्जा सूर्या पासून मिळते. सूर्यमालेतील सर्वात अत्यावश्यक घटक असलेला सूर्य सर्वच बाबतीत मोठा आहे. याचा व्यास साधारण १३, ९२, ००० हजार कि. मी. एवढा आहे. थोडक्यात पृथ्वीच्या आकाराने तो एवढा मोठा आहे की सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतात.
सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते.
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 10/7/2020