साधारणपणे एक वर्ष जरी आपण आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण करीत असाल तर आपणास सर्व तार्यांची जागा स्थिरच जाणवेल परंतु ग्रहांची जागा बदललेली असेल. खरेतर विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट गतिमान आहे. म्हणजे तिची हालचाल चालू आहे, परंतु वर्षभरानंतर देखिल जे तारे आपल्या जागी स्थिर जाणवतात ते तारे स्थिरच आहेत असे नाही. त्यांना देखिल गती आहे आणि ते एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सरकत आहेत. परंतु ते स्थिर का जाणवतात ह्याचे आपण एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही ट्रेन मधून प्रवास करीत आहात, तेव्हा आपण जर ट्रेनच्या बाहेरील जवळच्या झाडांकडे पाहिल्यास आपणास ती झाडे भराभर मागे जाताना दिसतील व आपण दूरच्या झाडांकडे पाहिल्यास आपणास ती झाडे हळूहळू मागे जात असल्याचे दिसते. त्याच प्रमाणे ग्रह हे जवळ असल्यामुळे त्यांची बदललेली जागा आपणास सहज लक्षात येते परंतु इतर तारे आपणापासून फार दूर असल्यामुळे त्यांची बदललेली जागा चटकन आपल्या लक्षात येत नाही. आपल्या जवळ अतिशक्तीशाली दूरदर्शक ( टेलेस्कोप ) असेल तरच आपणास त्यांच्या जागेमध्ये झालेला बदल जाणवेल.
वर्षभरात आपणास जाणवेल की सर्व तारे पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात धृव तारा हा असा एक तारा आपणास जाणवेल की ज्याने वर्षभरात आपली जागा स्थिर ठेवली आहे. पृथ्वीचा अक्ष थोडासा कललेला आहे हे आपणास माहीत आहे. पृथ्वीच्या अक्षाच्या मध्या पासून एक काल्पनिक सरळ रेषा काढल्यास त्या रेषेवरच धृव तार्याचे स्थान आहे. म्हणून वर्षभरात आपणास इतर तारे पृथ्वीभोवती गोलाकार फिरल्याचे जाणवतात, परंतु धृव तारा स्थिर जाणवतो. हेच जर उदाहरणामध्ये सांगायचे झाल्यास आपण प्रयोग करून पाहूया आपण एका अशा खोलीमध्ये उभे राहा जेथे आपल्या डोक्याच्या अगदी वरच्या बाजूस एक दिवा असेल. आता दिव्याकडे वर पाहून त्याच स्थितीमध्ये स्वतःभोवती एक चक्कर मारा. नंतर बाजूला असलेल्या दुसर्या एखाद्या दिव्याकडे पाहून स्वतःभोवती एक चक्कर मारा आपणास जाणवेल की त्या दूरवरच्या दुसर्या दिव्याने आपल्या भोवती एक चक्कर मारलेली असेल परंतु आपल्या डोक्यावरील दिव्याचे स्थान आपणास स्थिर असल्याचे जाणवेल. त्याच प्रमाणे ध्रुवतारा पृथ्वीच्या डोक्याच्या वरच्या बाजूस असल्याने तो आपणास एका जागी स्थिर जाणवतो.
तार्यांचा अभ्यास अधिक सुलभ व्हावा यासाठी तार्यांचे निरनिराळ्याप्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यामधील सर्व प्रथम प्रकार म्हणजे तार्याचा दृश्यमान प्रकार. फार पूर्वीपासून तार्याच्या प्रकाशाद्वारे त्याचे वर्गीकरण करण्याची पद्धत मानली गेली आहे. ह्यामध्ये एखादा तारा किती प्रखर प्रकाशमान आणि दुसरा एखादा तारा किती अंधुक ह्याद्वारे त्या तार्याला क्रमांक दिला जातो. ह्या प्रकाराला तार्याची 'प्रत' असे म्हटले जाते. समजा सर्वसाधारण प्रकाशित तार्याची प्रत जर '१' मानली तर त्या नंतर येणार्या परंतु थोड्याशा अंधुक तार्याची प्रत '२' असेल. त्यानंतर ३, ४, ५, ६,..... अशाप्रकारे त्याचे वर्गीकरण केले जाते तर जो तारा '१' प्रत असलेल्या तार्यापेक्षा अधिक तेजस्वी ( प्रखर ) असेल त्या तार्याचे वर्गीकरण 'ऋण' हे चिन्ह वापरले जाते, म्हणजे -१, -२, -३, -४, -५. ऋण प्रतीमध्ये ज्या तार्याची ऋण प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. साधारणपणे नुसत्या डोळ्यांनी आपण जेमतेम '६' प्रत असलेल्या तार्यांपर्यंतच पाहू शकतो. ज्यांची प्रत ७ व त्यापेक्षा जास्त आहे त्या तार्यांना आपण दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/21/2023
नकाश्याद्वारे आपणास त्या ठराविक जागेमध्ये एखादी गो...
अवकाश निरीक्षणाची नोंद करण्यासाठी आवश्यक गोष्टी.
या विभागात अवकाश विज्ञान या विषयाची माहिती देण्यात...
रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त...