অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्थापत्य अभियांत्रिकीमधील करिअरच्या संधी

स्थापत्य अभियांत्रिकीमधील करिअरच्या संधी

कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील पायाभूत सुविधा किती चांगल्या दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने देशातील पायाभूत सुविधा जसे की दळणवळण, जलसिंचन व बांधकाम क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून प्रगत करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी पावलेसुद्धा उचलेली आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थापत्य अभियांत्रीकी (सिव्हील इंजिनिअरींग) पदवी हा बारावी सायन्सनंतर चार वर्षाचा कोर्स आहे. देशात विविध आय.आय. टी., प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात याचे शिक्षण घेता येते.

या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रथमत: या कोर्सचे शिक्षण घेत असतांना ज्या काही गोष्टी आपण शिकत असतो त्या सगळ्या गोष्टी सहजतेने बाहेरील जगात पाहता येतात जसे की इमारत बांधकाम, रस्ते, पूल इत्यादी. दुसरे म्हणजे या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या शहरातच जावे लागते अशी आवश्यकता नाही. छोट्या गावात या संधी उपलब्ध होऊ शकतात. तिसरे म्हणजे या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत जसे की, शासकीय, निमशासकीय व खाजगी नोकरी तसेच व्यवसायाच्या सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. चौथे म्हणजे राज्य व केंद्र शासन यांच्या विविध खात्यात सिव्हील इंजिनिअर म्हणून सरळ भरतीद्वारे उच्च पदावर नेमणूक होऊ शकते याचे उदारहण म्हणजे केंद्र शासनाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा व राज्य शासनच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी परीक्षा. पाचवे म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बरेच उद्योगधंदे असे आहे की ज्यामध्ये फारशी स्वतःची गुंतवणूक लागत नाही जसे की पर्यावरण, स्ट्रक्टरल, जिओटेक्निकल किंवा जल क्षेत्रात तज्‍ज्ञ म्हणुन कार्यरत आहात.

स्थापत्य अभियांत्रीकी पदवी नंतर विविध क्षेत्रात नौकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागात जसे की पी.डब्ल्यु.डी, ईरिगेशन, एम.जे.पी, झे.पी., महानगरपालिका, टाऊन प्लानिंग इत्यादी, केंद्र शासनच्या विविध विभागात जसे की पोस्ट, रेल्वे, सी.डब्लू.सी., डिफेन्स, नी.री., सी.पी.ब्लू.डी इत्यादी, निम्न शासकीय विविध विभागात जसे की एन.टी.पी.सी., बि.एच.ई. एल., ओ.एन.जी.सी., ई.एस.आर.ओ., एच.पी.सी.एल., एस.ए.आय.एल., एम.आय.डी.सी. इत्यादी व खाजगी विविध क्षेत्रात जसे की रोड, ब्रिज, एव्हीगेशन, टॉवर, डॅम कन्स्ट्रक्शन इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.

या व्यतिरिक्त व्यवसायासाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. प्रथमत: शासकीय किंवा खाजगी बांधकाम ठेकेदार, दुसरे म्हणजे पर्यावरण, स्ट्रक्टरल, परिवहन, जिओटेक्निकल किंवा जल क्षेत्रात तज्‍ज्ञ इत्यादीमध्ये प्राविण्य व अनुभवाची आवश्यकता आहे. तिसरे म्हणजे स्ट्रक्टरल ऑडिटर म्हणून ईमारती, पाण्याच्या टाक्या, पूल व धरणे यामध्ये कामे करू शकता. चौथे म्हणजे सध्या प्रत्येक नगरपालिकेत किंव्हा महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन व त्याची प्रक्रिया हा प्रश्न ऐरणीवर आहे. यामध्येही बऱ्याच संधी आहेत. पाचवे म्हणजे जंतू विरहीत व शुद्ध पिण्याचे पाणी याला मोठी मागणी आहे.

तेव्हा आपण शहरामध्ये बँकेच्या ए.टी.एम. सारखे छोटे जलशुद्धीकरणाचे मशीन लावून स्वस्त दरात पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. सहावे म्हणजे नगरपालिका किंव्हा महानगरपालिका अंतर्गत विविध मालमत्तेचे सर्वेक्षण करून त्याचे कर निर्धारीत करून देण्याचा व्यवसाय करू शकतो. सातवे म्हणजे इमारतीचे प्लॅन, एलीव्हेन, थ्री डायमेंशन पिक्चर, स्ट्रक्टरल डिझाइन व घराचे मटेरीयल सहीत बांधकामाचा व्यवसाय करू शकतो. इंटेरीअर डिझाइनर म्हणुन बऱ्याच व्यवसायचा वाव आहे. प्रॉपर्टी व्हॅल्युअर म्हणुन विविध बँकेत व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहे. मुलींना सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये चांगल्या संधी असून बऱ्याच मुली विविध शासकीय खात्यात उचस्थ पदावर स्थापत्य अभियंता म्हणुन कार्यरत आहेत. 

लेखक - प्रा.डॉ.संदीप ताटेवार,अमरावती

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate