অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांगली जिल्हा - पर्यटन

मिरज

  1. सांगली येथील श्री गणेश मंदीर व कृष्णाकाठी कै. वसंतरावदादांची समाधी.
  2. सांगली येथील आयर्विन पुल व गणेश दुर्ग.
  3. हरिपूर येथील कृष्णा व वारणा नद्यांचा संगम व श्रीसंगमेश्वर देवालय, बागेतील गणपती.
  4. तुंग येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
  5. मिरज येथील रेल्वे जंक्शन, ख्वाँजा शमशुद्दीन मिरासाहब दर्गा.
  6. भोसेजवळ दंडोबा डोंगरावरील दंडेश्वर मंदीर व अभयारण्य.
  7. बेळंकीजवळ श्री सिध्देश्वर मंदीर.

तासगांव

  1. तासगांव येथील श्री गोपूर, गणेश मंदीर.
  2. कवठेएकंद येथे अतिप्राचीन श्री सिध्दराज देवालय, येथे विजया दशमी दिवशी शोभेच्या दारुकामाची आतषबाजी केली जाते.

पलूस

  1. अंकलखोपजवळ श्रीक्षेत्र औदुंबर व दत्त मंदीर.
  2. पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी.
  3. ब्रम्हनाळ येथील कृष्णा व वेरळा संगम व राजयोगी आनंदमूर्ती समाधी.
  4. भिलवडीजवळ (भुवनेश्वरवाडी) येथील भुवनेश्वरी देवीचे अति प्राचीन मंदीर.

वाळवा

  1. बहे येथे श्रीकृष्णेच्या पात्रातील श्री रामलिंग.
  2. नरसिंहपूर येथील भुयारातील श्री नृसिंह मंदीर.
  3. किल्ले मच्छिंद्रगड येथे श्री मच्छिंद्रनाथाचे देवालय.
  4. येडेनिपाणी येथील मल्लीकार्जुन मंदीर.
  5. ऊरण इस्लामपूर येथील संभूआप्पा देवालय.
  6. शिवपुरी येथील सिध्देश्वर देवालय.

कवठेमहांकाळ

  1. कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली मंदीर.
  2. आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय.

शिराळा

  1. शिराळा येथील नागपंचमी उत्सव, श्री गोरखनाथ मंदीर.
  2. चांदोली येथील वारणा धरण व अभयारण्य.
  3. प्रचीतगड,सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय किल्ला.
  4. चांदोली खु. प्रेक्षणीय कंधार डोह धबधबा.
  5. गिरजवडे येथील जोतिर्लिंग देवस्थान.

आटपाडी

  1. आटपाडी येथील खुला तुरुंग (स्वतंत्रपूर)
  2. खरसुंडी येथील श्री सिध्दनाथ मंदीर.
  3. करगणी येथील श्रीराम मंदीर.
  4. वलवण येथील मोराचे थवे.
  5. राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव.
  6. श्री जकाईदेवी (जागृत देवस्थान) मानेवाडी, नेलकरंजी.
  7. भिमाशंकर मंदिर-नेलकरंजी (भिवघाट)

जत

  1. जत येथील श्री यलम्मा देवी मंदीर व श्रीराम मंदीर.
  2. गुड्डापूर येथील दानम्मा मंदीर.
  3. बनाळी येथील बनशंकरी मंदीर.
  4. गिरगांव येथे डोंगरावरील श्रीलक्ष्मी मंदीर.
  5. बिळूर येथील मोठा मठ.
  6. सोर्डी येथील श्री दत्त मंदीर, मलाकसिध्द.
  7. गुडघरी सिध्दनाथ येथे हेमाडपंथी देवालय.

खानापूर

  1. रेणावी येथील श्री रेवणसिध्द मंदीर.
  2. पळशीजवळ श्री शुक्राचार्य मंदीर.
  3. पारे येथील दरगोबा देवस्थान.
  4. वेताळ गुरुदेव, रेवणगांव.

कडेगांव

  1. देवराष्ट्रे येथील कै. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी व सागरेश्वर अभयारण्य.
  2. कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.
  3. सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदीर.

 

माहिती स्रोत: mysangli.com

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate