महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका देवी आहे.
रेणुका मातेच्या तांदळयाची का पूजा केली जातो? याबाबत अनेक पुराण कथा आहेत. त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले.
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे मागणी केली, मात्र ती फेटाळली. तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रयर्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला ठार केले आणि कामधेनू हिरावून नेली. त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आला. हा प्रकार पाहून त्याने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.
पित्या्चे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी हवी, म्हणून तिच्या शोधार्थ कावडीच्याञ एका पारडयात जमदग्नीतचे पार्थिव आणि दुस-या पारडयात माता रेणुकेला बसवून रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडाला आला. तेथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमि दाखविली. येथेच पित्यावर अंत्यसंस्का्र कर, असे सांगितले.
परशुरामाने बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्का्र केले. त्या वेळी माता रेणुका सती गेली. सती गेलेल्यान मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन,तुझी आई जमिनीतून वर येईल. फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको,असे सांगण्या त आले. परंतु परशुरामची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळास्वारुपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय.
माहूर गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स. 1546 मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर अंकित केला आहे. हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे.
हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्यात प्रवेशव्दासर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.
दक्षिणाभिमुख चांदीने मडविलेल्यात प्रवेशव्दारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश करतो. रेणुकेच्या विविध पुजा-अर्चनेने व पुजाऱ्याच्या गाभाऱ्यातील मंत्र विधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते.तद्वतच तेला तुपाच्या नंदादीपामुळे वातावरण प्रसन्न होते.जेंव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेला रेणुकेच्या तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते.
तेंव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल आपले चित्त केंद्रीत करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनैन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमुर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबुल आहे. हजारो सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तवेधक - भेदक नजर सरळ आपल्या –हदया मध्ये जाते.
शिवाय सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची मूर्ती आहेत.खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ,पांडवतीर्थ,औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ,रामतीर्थ इ.आहेत.
देवी महात्म्यात नवरात्राचे अनन्य साधारण महत्व आहे. हा नवरात्र उत्सव म्हणजेच आदीशक्तीच्या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंग्रामाचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्ट राक्षसां सोबत घणघोर युध्द करुन,आपला पराक्रम दाखविला तो हा कालखंड. महिषासूर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्द करुन त्याचा वध केला. तो हा कालखंड अश्विन शुध्द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली. असा हा कालखंड हयाच कालखंडास "शारदीय नवरात्र" असेही म्हणतात.शारदीय नवरात्रोत्सव रेणुकेच्या गडावर अतिशय शुचिर्भूत वातावरणात, नि:सिम श्रध्देने साजरा केला जातो.
अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरुन त्यावर विवीध पाच प्रकारचे धान्य टाकल्या जाते. त्या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवल्या जाते व त्या कुंडाच्या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्पहार अर्पण केल्या जातो व प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्या जातात. त्याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्हणजे दहिभात, पूरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्थापनेपासून चार दिवसा पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्या जातात.
नवरात्रातील पंचमीस/ललितापंचमीस देवीचे मुखकमल अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक दिसते. हया दिवशी देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती केल्या जाते व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो व सुर्यास्तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्या जाते. रात्रो जागरण,गोंधळ व गायक कलवंताच्या हजेरीमधून उदो उदो केला जातो. नवरात्रातील सप्तमीस जवळील महाकालीच्या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली जाते व महाकालीस महावस्त्र अर्पंण केल्या जातात.
अष्टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पूजा विधि झाल्यानंतर गुप्त अजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरूवात होते. सप्तशतीचे पारायण केल्या जाते. होमामध्ये औंदूबर, खैर, पिंपळ, वटवृक्ष, आघाडा या समिधा टाकल्या जातात. दहीभात, धान्य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमामध्ये अर्पण केल्या जातात. या पूर्वी नवग्रहाची पूजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरूवात होते.
नवमीस दिवसभर अष्टमी प्रमाणेच पूजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केल्या जातो व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पूजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते. दशमीस म्हणजे दस-यास देवीचे मुख्य ध्वज उतरवून त्या पवित्र खांबास पंचामृताने स्नान घालून शेंदुर,हळद,कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते व त्या व त्या देवी ध्वजपताक्यास नविन वस्त्र चढविल्या जाते. पायसाचा नैवेद्य दाखऊन महाआरती केल्या जाते व नंतर गडावरील सर्वच देवी-देवतांजवळ पताका चढविल्या जातो. नंतर रेणुकेचा पुत्र परशुरामाची पालखी सजवून त्या मध्ये परशुरामाची मुर्ती ठेवल्या जाते. त्या पालखीची मिरवणूक काढून ती पालखी सीमोल्लंघना करीता वरदायीच्या पहाडावर जाते. ही परशुरामाची पालखी जेव्हा रेणुका गडावर प्रवेश करते. तेव्हा रेणुकेच्या व्दारा समोर पालखी समोर अजाबळी दिला जातो व रेणुकेस आपटा रुपी वृक्षाची पाने अर्पण केली जातात व महानैवेद्य दाखविल्या जातो. नवरात्रीच्या पूण्य काळात देवीच्या विविध रुपाच्या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्ये रेणुकेच्या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.
अश्विन शुक्लपक्ष म्हणजेच कोजागरी पौर्णिमा गडावर मोठया उत्साहात साजरी होते. त्यात दिवशी देवीची संपूर्ण पुजा केली जाते व रात्री भजन, किर्तन आयोजित केल्या जाते. पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून हा नैवेद्या देवीस दाखविला जातो व महाआरती केल्या जाते आणि उपस्थित सर्व भाविकास हा मधुर प्रसाद वितरीत केल्या जातो.
श्रावण शुध्द त्रयोदशीस सकाळीच रेणुकेची पंचामृताने स्नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते. हया दिवशी संपूर्ण अलंकार चढविल्या जातात. पितांबर नेसविल्या जातो. भाळी मळवट भरुन शृंगारीत केल्या जाते व पुरण-पोळीचा नैवैद्य दाखवून, मुखी तांबुल भरविला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो. श्रावण समाप्तीस ‘ परंजण ’ असे म्हणतात. विशेष म्हणजे हया संपूर्ण श्रावणमासा मध्ये देवीची सेवा करणारे पुजारी अनुष्ठान करतात व हया कलावधीत सप्तशतीचे पठन नियमीत चालू असते.
दिपावलीस संपूर्ण दिप प्रज्वलित करून रेणूकेचे मंदीर प्रकाशमय केल्या जाते. संपूर्ण भक्ती ने पुजा अर्चने नंतर मंदिराच्या सभा मंडपात लक्ष्मी पुजन केल्या् जाते.
ह्या शाकंभरी नवरात्राचे महत्व असे आहे की, जेव्हा भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्याशिवाय जीवमात्रांना जगणे अशक्य झाले. तेव्हा ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची अराधना केली. तेव्हा प्रसन्न होऊन देवीने तिच्या शरीरा पासून वनस्पती म्हणजे शाक निर्माण केली. ही वनस्पती विश्वातील जीवजंतूना दुष्काळात अन्न म्ह्णून पुरवून त्यांना जगवीले. देवीने उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने देवीस शाकंभरी म्हणून ओळखू लागले. असा शाकंभरी नवरात्रोत्स व दुर्गाष्टमी ह्या दिवशी प्रारंभ होतो. नित्य नियमाने संपूर्ण पुजा अर्चना झाल्या नंतर दही भाताचा नैवेद्या व पुरण पोळीचा नैवेद्या दाखवून आरती केली जाते. हा उत्सव पंधरा दिवस चालतो. शुध्दू अष्टजमीस काळ भैरव जयंती होते. एकवीस वडयाची माळ घालून विधीवत पुजा केल्या जाते. व शुध्द नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. ह्या दिवसी दुध घोटून त्या चा नैवेद्य दाखवीला जातो व प्रसाद वितरीत केला जातो.
मार्गशिष चंपाषष्ठीला गडावर खंडोबाचे पुजन केल्या जाते.बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत व पातीचा कांदा असा नैवेद्य ह्या दिवशी खंडोबास भरविला जातो.
पौष शुक्लं म्हणजे मकर संक्रांत ह्या दिवशी तिळ गुळाचा नैवेद्य दाखविला जातो.
संपूर्ण पुजा विधी झाल्या नंतर गडाच्या उत्तरेस होलीका पुजन केले जाते. तेव्हा देवीस पातळ,खण, नारळ, बांगडया पुष्प हार अर्पण करून पुजा केली जाते व होळी पेटवीली जाते. नंतर मातृतिर्थ, वनदेवी , आणि विष्णूकवी मठ येथे ही होळी पेटविली जाते. यासह विविध सण व उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात. ह्या शिवाय प्रत्ये्क दिवशी गडावरील पुजारी देवीची नित्ये नियमाने सेवा करतात. प्रत्येक दिवशी भल्या पहाटे रेणुकेच्या मुखकमलावर शेंदुर लावल्या जातो व पंचामृतादिने स्नान घालून हळद कुंकू भाळी लावल्या जाते. मंत्र पठण व सप्ताशतीचे पाठ केल्या जातात. नंतर महावस्त्र अर्पण करून पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केल्या जातो व मुखी तांबुल भरवील्या जातो. महाआरती केल्याच नंतर गडावरील सर्वच देव देवतांची पुजा केली जाते. नित्य नियमाने संपूर्ण देवस्थानची व्यवस्था पाहणारे व पुजा विधी करणारे पुजारी हे येणाऱ्या भक्तगणांची सेवाही मोठया श्रद्धेने करतात.
वरील सर्व सण उत्सवाचे अवलोकन केल्यास आपणास सहज लक्षात येते की, ही देवी सर्व सामान्यांची अराध्य देवता आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी भारतवर्षा मध्ये सिंधू संस्कृती ही प्रसिध्द व प्रगत होती हे आपणास ज्ञात आहे. ह्या सिंधु संस्कृ्ती मध्ये राहणा-या प्रत्येकांची अशी धारणा व विश्वास होता की, आपली उत्पत्ती आई-वडीला पासून झाली असल्याने ह्या जगाची उत्पती ती आई-वडीलांन पासून झालेली आहे. विश्वा्चे कोणी आई-वडील आहेत असे समजून हीच वडीलांची व आईचे प्रतिके अनुक्रमे शिवलिंग व जगन्माता होय. ह्या विश्लेषणा वरून लिंगपुजा व देवीची उपासना आर्याच्यां आधीही सिंधु संस्कृतीत चालत आलेली आहे व रेणुकेस मातंगी हे ही नाव आहे. विष्णु रूपी परशुरामाची माता, शिवरूपी जमदन्गींची कांता ही रेणुका असल्यामुळे श्री रेणुका शाक्त व वैष्णव ह्या दोन्ही पंथांना पुजनीय आहे.
नाथ संपद्राय-पंथ, दत्तसंप्रदाय,शाक्त संप्रदाय, आनंदसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी(भागवत), सूफी संप्रदाय, समाजाच्या धारणेसाठी अतिरिक्त अहभावनेने धर्म संप्रदायाचे निर्माण झालेले मतभेद समाप्त करून सर्वधर्म संप्रदाय समन्वयाना श्री क्षेत्र माहूर येथील प्रयत्न भारतात इतरत्र आढळत नाही. अशी संप्रदाय समन्वयाची देणगी माहूरच्या भूमीचे धर्मोशाक्तांनी दिली.
हे संग्रहालय माहूर शहरातच स्थित असून येथे आदिवासी बंजारा सांस्कृतिक ठेवा जपून ठेवला आहे. पुरातन पाणी, नाणी, शस्त, प्राण्यांचे सांगाडे, विविध प्राचीन दगडी व विविध धातूच्या मूर्त्या व हस्तशिल्पे येथे जतन करून ठेवल्या आहेत.
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 3/21/2020
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संच...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...