অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.

महाबळेश्वर

समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे. वनखात्यातर्फे पर्यटकांसाठी वनसहलीचे आयोजन करण्यात येते. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. विल्सन पॉईंट व माखरिया पॉईंट, केल्स पाँईंट, एको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट,कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट इ.पॉईंट आहेत. निसर्गाचे विविध रुपे पाहण्यासाठी या ठिकाणी सामान्यापासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत अनेक व्यक्ती येतात. महाबळेश्वरास बालकविनी घिनसर्गदेवतेला पडलेले सुंदर स्वप्नङ असे म्हटले आहे. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. विल्सन पॉईंट जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते.

क्षेत्र महाबळेश्वर

यालाच धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. इ.स. सन १२१५ मध्ये यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. एकतपाच्या तीर्थाटनानंतर इ. स. १६४४ साली समर्थ रामदास स्वामींनी सर्व प्रथम येथे येवून धर्मउपदेश देण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी पहिले मारुतीचे मंदिर बांधले.

नवे महाबळेश्वर



कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्‍यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.

विल्सन पॉईंट


महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते.

गहु गेरवा संशोधन केंद्र



विल्सन पॉईंटच्या जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. या रोगापासूप पिकाचे संरक्षण उपाय शोधले जातात.

बॉम्बे पॉईंट


जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉईंट असल्याने याला बॉम्बे पॉईंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. क्गांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

हत्तीचा माथा



याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्‍यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. तसेच जावलीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावली गाव दिसते.

ऑर्थर सीट व विडो पॉईंट


महाबळेश्वरच्या कड्यावरती असलेला ऑर्थर सीट नावाचा सर्वात प्रेक्षणीय असा पाईंट आहे. ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव देण्यात आले आहे. या कड्यावरुन डाव्या बाजूला सावित्रीच्या खोर्‍याचे खोल कडे दिसतात. तर उजव्या बाजूला जोर खोर्‍याचे घनदाट अरण्य दिसते. सर्वत्र खाली दूरवर पर्वत शिखरे दिसतात. तोरणा, रायगड, कांगारी हे किल्ले दिसतात. शिखरे तरंगणार्‍या ढगांनी झाकलेली दिसतात. ऑर्थर सीटकडे जाताना टायगर स्प्रिग नावाचा झारा लागतोयेथे सर्व ऋतुत पाण्याचा प्रवास वाहतो. सावित्रीनदीचा गुप्त प्रवाह येथे प्रकट होतो. ऑर्थर सीट पासून खाली २०० फुट अंतरावर विडो पॉईंट आहे. येथे दगडांची खिडकीसारखी नैसर्गिक रचना पहावयास मिळते. या खिडकीतून निसर्गाचे अद्भूत दर्शन घडते.

बामणोली



बामणोली हे शिवकालामध्ये प्रशासनाचे छोटे केंद्र होते. सध्या ते निसर्गप्रेमी गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण बनले आहे. जलाशयाच्या काठी असलेल्या या गावाच्या अवती भोवती घनदाट झाडी आहे. हा भाग कोयना अभयारण्यात समाविष्ट आहे.

तापोळा


यालाच महाराष्ट्राचे मिनीकाश्मीर म्हणतात. हे प्रसिध्द आहे ते येथील नौकाविहारासाठी बाजूला असलेली घनदाट झाडी व उंच डोंगर व त्यामध्ये असणारा विस्तीर्ण असा शिवसागर जलाशयाच्या फुगवटयाची शेवटची बाजू होय. या जलाशयाच्या काठावर डोंगर पायथ्याशी अनेक छोटी-छोटी खेडी वसलेली आहेत. त्यामध्ये तापोळयाबरोबर बामणोली, खरसुंडी, पावशेवाडी इ. गावांचा समावेश आहे. या गावांना लाँचेस शिवाय दळणवळणाचा दुसरा मार्ग नाही. तापोळयाला जाण्यासाठी दुतर्फा झाडी असलेला एक पदरी पक्का डांबरी रस्ता आहे. तीव्र उताराचा वळणावळणाचा रस्ता उतरताना गर्द झाडांनी भरलेले डोंगर पाहून मौज वाटते.

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान


महाबळेश्वर पाचगणी रोडवर २.५ कि.मी. अंतरावर वेण्ण नदीचे पाणी साठलयाने निर्माण झालेला वेण्ण तलाव आहे. येथे पर्यटकांना नौका नयन व जलविहाराचा आनंदही घेता येतो. घोड्यावरुन रपेटही मारता येते. या तलावाच्या मागे घनदाट अरण्यही आहे. तर शेजारी रस्त्याला लागूनच प्रतापसिह उद्यान आहे. तेथे अनेक शोभिवंत फुलझाडे आणि वृक्ष आहेत.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://www.zpsatara.gov.in/html/tourism_07.asp

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate