बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ५ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.
लोणार, शेगाव, सैलानी दर्गा, जिजामाता जन्म ठिकाण हे या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण ९२८/१००० आहे. तसेच शिक्षणाची शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.
कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत
जिल्ह्याचे ठिकाण |
बुलढाणा |
भौगोलिक सीमा | अक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव. |
क्षेत्रफळ | ९,६४० चौ कि मी |
पाउस | जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून |
हवामान | उष्ण व कोरद उन्हाळा आणि थंड हिवाळा |
लोकसंख्या | २५,८८,०३९ |
लोकसंख्या घनत्व | २६८ प्रती चौ कि मी |
लिंग प्रमाण | ९२८ स्त्री प्रती १००० पुरुष |
शिक्षणाचे प्रमाण | ८२.०९% |
पर्यटन स्थळे | १. लोणार सरोवर २. वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण, सिंदखेड राजा ३. स्वामी विवेकानंद आश्रम ४. संत गजानन महाराज देवस्थान, शेगाव ५. सैलानी बाबा दर्गाह, चिखली ६. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती, नांदुरा 7. प्रसिद्ध बालगी मंदिर, मेहकर |
रेल्वे स्थानक | जिल्ह्याच्या ठिकाण पासून मलकापूर (५० किमी), नांदुरा (४५ किमी), शेगाव (७० किमी) |
राष्ट्रीय महामार्ग | राष्ट्रीय महामार्ग न ६ (खामगाव, नांदुरा, मलकापूर) |
जवळील विमानतळ | औरंगाबाद १५० किमी |
राज्य परिवहन महामंडळ आगार | बुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद. |
महसूल उपविभाग | बुलढाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद. प्रमुख - उपविभागीय अधिकारी |
महसूल तालुके |
बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर. प्रमुख - तहसीलदार |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 6/15/2020
पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्ह...
रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी ल...
पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे यामध्ये दिली आहेत.
दिग्रस मधील घंटी बाबाची यात्रा व वणी येथील श्री रं...