অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रायगड जिल्हा

जिल्ह्याविषयी

रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. जिल्हयाचा उत्तर -दक्षिण विस्तार १७० कि.मी. असून पूर्व - पश्चिम विस्तार ७० कि.मी. इतका आहे. अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला आहे.

रायगड जिल्हयाला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी हया भूमिला स्पर्श केलेला आहे. हया अतुलनीय जिल्हयात अजिक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे. जवळ-जवळ १० छोटे मोठे किल्ले असलेल्या हया रायगड जिल्हयाचे विभाजन १५ तालुक्यांमध्ये केलेले आहे.
“दक्षिण काशी“ म्हणून संबोधले जाणारे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे. सी. डी. देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांसारख्या थोर पुरुषांनी रायगडात जन्म घेतला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला आहे. या प्रकारे रायगडाला सामाजिक पाश्र्वभूमी देखील लाभली आहे.

औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग, पनवेल, महाड, उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे. रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने भारताच्या कानाकोपर्‍यातून उदरनिर्वाहासाठी येथे जनता स्थित झाली आहे.

रायगड जिल्हयाला जवळ-जवळ १० कि.मी.चा सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी सतत असते. रायगड जिल्हयात मासेमारीमुळे मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. शिवाय पर्यटनामुळे येथील अनेक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

दृष्टिक्षेपात रायगड जिल्हा

स्थान १७.५१ ते १९.८० अक्षांश , ७२.५१ ते ७३.४० रेखांश
क्षेत्रफळ ७१४८ चौ. कि. मी.
विस्तार पूर्व - पश्चिम : २५.५० किमी
दक्षिण - उत्तर : १६० किमी
लोकसंख्या 
(सन २००१ च्या जनगणने नुसार) 
एकुण लोकसंख्या : २२,०७,९२९ 
ग्रामीण लोकसंख्या : १६,७३,०९४ 
शहरी लोकसंख्या : ५,३४,८३५
लोकसंख्या प्रमाण : अनुसुचीत जाती ५३,६६७ (२.४ टक्के) , अनुसुचीत जमाती २,६९,१२४ (१२.४ टक्के)
लोकसंख्येची घनता : ३०८ प्रति चौ. कि.मी. 
साक्षरतेचे प्रमाण : ७७ टक्के (पुरुषः ८६.१ टक्के, स्त्रीयाः ६७.७ टक्के)
तालुके 
(१५) - अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळे, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरुड, म्हसाळा, रोहा, सुधागड (पाली), श्रीवर्धन.
पंचायत समिती (१५) - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड-पाली, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगांव, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, म्हसळा
औद्योगीक क्षेत्रे
पेण, महाड, पाली, तळे, थळवायशेत, रसायनी, खोपोली, रोहा, नागोठणे, महाड
किल्ले
अलिबाग, कर्नाळा, खांदेरी*उंदेरी, रेवदंडा, कोर्लई, जंजिरा, रायगड, घेरा सुधागड, सरसगड, सुरगड, लिंगाणा.
ऐतिहासिक ठिकाणे
रायगड, अलिबाग, महाड, मुरुड जंजिरा
धार्मिक ठिकाणे
कनकेश्वर, महाड, पाली, जांभुळपाडा, शिवथरघळ, हरिहरेश्वर, उध्दर.
ग्रामपंचायती / गावे ८२१ / १९०८
नगर परिषद ११
नद्या
उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड, गंधार
हवामान
उष्ण व दमट, अधिकतम तापमान *४०.४ डी. से. न्युनतम तापमान *१६.१ डी. से.
पर्जंन्यमान
३८८ से. मी.
लेण्या
घारापुरी, तळे, कुडा, अंबिवली, कोंडाणे, खडसांबळे, ठाणाले, पाले, कोल, रामधरण

 

 

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : https://www.zpraigad.maharashtra.gov.in/html/raigad_district.asp

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate