इ. स. पू. पंधराव्या शतकातील हे फिनीशियन व्यापारठाणे, नंतर कार्थेजियन व टिंजिस ही रोमन वसाहत होती. मग व्हँडोल, बायझंटिन, व्हिसिगॉथ इत्यादींच्या अमलांनंतर ते आठव्या ते पंधराव्या शतकापर्यंत इस्लामी सत्तांखाली आले. नंतर पोर्तुगीज, स्पॅनिश, पुन्हा पोर्तुगीज व इंग्लिश सत्तांखाली जाऊन १६६५ मध्ये मोरोक्कोच्या सुलतानाकडे आले, ते त्याच्याकडे १९०४ पर्यंत होते. १९०६ च्या अल्जेसिरास अॅक्टनंतर याचे लष्करी महत्त्व ओळखून तँजिअर विभाग १९२३ मध्ये आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली आणला गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन, फ्रान्स, स्पेन व इतर यूरोपीय राष्ट्रांबरोबर रशिया व अमेरिका यांनीही याच्या शासनात भाग घेतला. १९५६ मध्ये मोरोक्को स्वतंत्र झाल्यानंतर तँजिअर त्या राष्ट्रात समाविष्ट झाले.
लिमये, दि. ह.; कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/6/2020
प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बंदर व चोल राजांची राज...
दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध बंदर व औद्योगिक केंद्र.
आयबेरिया : (१) नैऋत्य यूरोपमधील स्पेन व पोर्तुगाल ...
कांडला: गुजरात राज्यातील कच्छ आखातावरील भारताचे नव...