चिरंतन प्रेमाचे प्रतिक ताज महल,
सौंदर्याचे प्रतिक ताज महल,
मानवनिर्मित सर्वश्रेष्ठ कलाकृती ताज महल,
जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महल,
प्रेमात पडल्यावर असे काहीबाही विचार मनात येतात. काही वर्षांपुर्वी जेव्हा मी हिच्या प्रेमात पडलो होतो (डोक्यावर, असे लोक सांगतात. मला नीटसे आठवत नाही) तेव्हा मलाही असे काहिसे वाटायचे. त्यामुळे राजस्थानच्या ट्रिप वरुन परत येता येता ताज महल पहायचे ठरविले.
ताज महल यमुनेच्या तिरावर स्थित आहे. ताज महाल मोगल सम्राट शहाजहांन ने त्याच्या आवडत्या राणी मुमताझ महल ची आठवण म्हणून बांधला. (मी का ही बडबड करतो आहे. सर्वांना माहित आहे हे) ह्याचे बांधकाम १६३२ ला सुरू झाले आणी १६५३ ला पुर्ण झाले. हा पुर्णपणे संगमरवरात बनला असुन ह्यासाठी लागणारा दगड राजस्थानातुन आणण्यात आला होता.
टिप १ : शुक्रवारी ताज महल बंद असतो. दिल्लीतील कार वाले ही माहीती तुम्हाला सांगत नाहीत कारण त्यांचे भाडे बुडते.
टिप २ : ताज महल बघुन बाहेर आल्यावर खुप जणांना ताज महल ची प्रतिकृती घेण्याचा मोह अनावर होतो. ईथे जर का तुम्ही दुकानात शिरुन भाव करायला सुरुवात केलीत आणी जर का तुम्ही मागत असलेला भाव दुकानदाराला पटला नाही तर त्याच दुकानदाराचा एखादा लहान मुलगा तुम्हाला मागुन येऊन धक्का मारतो आणी ती प्रतिकृती तुमच्या हातुन खाली पडुन फुटते आणी झक मारत त्याची दुकानदार मागेल ती किंमत तुम्हाला द्यावी लागते. त्यामुळे"खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना" अशी तुमची गत होते. तेव्हा सावधान.
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 8/21/2020
उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे १९२७ साली स्थापन...