पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपये नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या सबंध देशभर आर्थिक व्यवहारावर परिणाम होण्यास सुरूवात झाली असे वाटत असले तरी भारत देशाची अर्थव्यवस्था चलनातून ‘कॅशलेस कडे’ मार्गक्रमण करत असल्याचे दिसत आहे. रोख रक्कम सोडून विना रोखीचे व्यवहार वाढण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे.
देशातील मोठ मोठे व्यापारी व्यावसायिक पोस मशीन, इंटरनेट बँकीग आदिचा वापर काही वर्षापासून अंशत: करत होते. परंतू बाजारपेठेत 80 ते 90 टक्के व्यवहार हा रोखीने होत होता. त्यातल्या त्यात किरकोळ व्यापारी व व्यावसायिक यांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार हा रोखीनेच असे.
परंतू 8 नोव्हेंबर 2016 नंतर लहान विक्रते व्यावसायिक यांच्या व्यवसायांसमोर नोटाबंदीच्या निर्णयाने संकट उभे राहून व्यवसाय मंद गतीने होऊ लागला. त्यामुळे अनेक लहान लहान व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारासाठी पोस मशिन, पे-टीएम, SBI बडी इंटरनेट बॅकींग या अद्ययावत बॅकींगशी संबंधीत प्रणालींचा वापर सुरू करुन आपल्या व्यवसायाला गतीमान करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशेलस अर्थव्यवस्था संकल्पनेचा पाया अधिक मजबूत करण्यास हातभार लावत आहेत.
कॅशलेस व्यवहार स्वीकृतीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लातूर शहरातील गीताई ऑटोमाबाईसेल्सचे बालाजी मधुकर नागरगोजे होय. श्री.नागरगोजे यांचे लातूर शहरात दुचाकी दुरूस्तीचा एक छोटा व्यवसाय असून स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कडून व्यवसायासाठी कर्ज घेऊन हा व्यवसाय थाटलेला आहे.
येथे येणाऱ्या वाहनांचा दुरूस्ती खर्च 100, 200, 300, ते एक हजार रूपयांपर्यंतचा असतो. नोटाबंदीनंतर बाजारातच चलनाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे श्री. नागरगोजे यांच्या व्यवसायावर ही त्याचा फटका बसण्यास सुरूवात झाली. त्यामुळे श्री.नागरगोजे यांनी हैद्राबाद बँकेकडून pos मशीन घेऊन ग्राहकांकडून त्यांचे कार्ड स्वाईप करून दुरूस्तीच्या कामाची रक्कम कॅशलेस पध्दतीने स्वीकारण्यास प्रारंभ केला. ….आणि नोटाबंदीनंतर रोडवलेला त्यांचा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागला. श्री. नागरगोजे यांनी बँकींग क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू करून नोटाबंदीवर कॅशलेसला स्वीकृती देऊन एक चांगला पर्याय तर काढलाच पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करून कॅशलेस महाराष्ट्र, कॅशलेस भारत कडे जाण्याचा एक भक्कम पाया घालण्यात खऱ्या अर्थाने हातभार लावला आहे.
स्वाईप मशीनचा वापर लहान व्यावसायिक श्री.नागरगोजे यांनी सुरू केल्यानंतर ग्राहकांची वर्दळ ही त्यांच्या गीताई ऑटोमोबाईल्स मध्ये वाढली असून अनेक ग्राहक कॅशलेस व्यवहाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. नागरगोजे यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या त्यांच्या लहान व्यवसायाने चांगली उभारी घेऊन ‘कॅशलेस’ ला स्वीकृती दिली. त्यांच्यासारखेच इतर लहान विक्रते, व्यावसायिक यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून स्वाईप मशीनचा वापर करावा आणि आपला व्यवसाय अधिक जोमाने करावा, असे आवाहन नागरगोजे यांनी आपल्या अनुभवातून केले आहे.
माहिती संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/10/2020
अर्थ-व्यवस्थेतील वित्तीय व्यवहार व वास्तव क्षेत्रे...
MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण...
सुव्यवस्थित व कार्यक्षम प्रशासनासाठी निर्माण केले...
डिजिटल देयकेचा प्रचार आणि प्रसारासाठी वापरण्यात आल...