অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

परिचय

महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (मप्रनिमं) विविध विधिविधानांचे, मुख्यत्वे जल (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1974, हवा (प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981, जल (उपकर) अधिनियम, 1977 या सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या अंतर्गत काही तरतूदींचे व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 1998, हानिकारक टाकावू पदार्थ (एमएन्डएच) नियम 2000, महापालिका टाकावू घन पदार्थ नियम, 2000 ईत्यादी सारख्या नियमांचे  कार्यान्वयन करीत आहे.  महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची काही महत्वाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत:
  • प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.
  • प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तीचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
  • सांड पाणी किंवा व्यापारी सांड पाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.
  • प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.
  • योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.
  • स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची घटना

महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, 1969, च्या तरतुदीनुसार 7 सप्टेंबर 1970 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली.  केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 च्या तरतुदींनुसार दिनांक 1.6.1981 रोजी महाराष्ट्रामध्ये जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार करण्यात आले.

हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 महाराष्ट्रामध्ये 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक 2.5.1983 रोजी घोषित करण्यात आली.  संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक 6.11.1996 पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.  हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.

जल (पीएन्डसीपी) अधिनियम 1974 च्या कलम 4 व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 च्या कलम 5 च्या तरतुदीमध्ये सांगीतल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मंडळाच्या http://www.mpcb.gov.in/marathisite/mpcbmarathi/index.htm या वेबसाईटला भेट द्या

स्त्रोत : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate