অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

वेबसाईट : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची स्थापना करण्यात आली.  राज्यातील पाणी पुरवठा व मलनि:सारण क्षेत्रातील योजनांसंदर्भात संकल्पनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत तसेच आर्थिक नियोजन आणि योजनांची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती या सर्व बाबींमध्ये संपूर्णत: मजीप्राचा एकात्मिक सहभाग होता.  सन 1997 मध्ये उपरोक्त अधिनियमांत सुधारणा करण्यात येऊन 'महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाचे' 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' असे नामकरण करण्यात आले. तथापि, 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्तीनुसार शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्याचे संपूर्ण अधिकार शासनाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल केले. बव्हंशी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कल योजना स्वत: राबविण्याकडे असल्याने मजीप्राला मिळणारा महसूल कमी झाला आहे. मजीप्राच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

स्त्रोत : महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate