वेबसाईट : भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय
महाराष्ट्र राज्याच्या वैभवातील एक महत्वाचा घटक म्हणजे खनिजे होत. राज्याचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. असून राज्याचा बराचसा भूप्रदेश लाव्हा रसामुळे तयार झालेल्या डेक्कन ट्रॅप खडक समूहाने व्यापला असून त्यात आर्थिक दृष्टया किफायतशीर ठरणारी बॉक्साईट, अगेट व थोडया प्रमाणात चुनखडी इत्यादी खनिजे आढळतात. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य महत्वाच्या औद्योगिक खनिजांनी संपन्न आहे. या खनिजात कोळसा, लोहखनिज, म्ॉगनिज, चुनखडी, सिलीका वाळू, कायनाईट, सिलीमनाईट, क्रोमाईट, इलमेनाईट, डोलोमाईट इत्यादींचा अंतर्भाव होतो. या शिवाय राज्यात तांबे, टंगस्टन, जस्त, सोपस्टोन, क्वार्टझ, अगेट, क्ले, बेराईट, ग्रॅफाईट फ्लोराईट इत्यादी खनिजे आढळून येतात. महराष्ट्र शासनाचे उद्योग विभागांतर्गत असलेल्या भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे राज्यातील निरनिराळे खनिजांचा शोध घेण्याचे कार्य बरेच वर्षापासून अव्याहतपणे सुरू असून त्याचे फलस्वरूप उपरोक्त खनिजांचे विपुल साठे सिध्द करणेत आलेले आहेत.
(1) भूवौज्ञानीय सर्वेक्षण, आवेधनाद्वारे खनिज समन्वेषण (संवर्धन आणि क्षेत्रिय अन्वेषण) आणि खनिज संशोधन व विकास;
(2) खनिज प्रशासन (विनियमन कार्ये) राज्यात खनिज शोधण्याचे व त्याचे साठे निकश्चत करण्याचे कार्ये संचालनालयाद्वारे खनिज समन्वेषण कार्यक्रमांतर्गत करण्यात येते.
संचालनालयाने राज्यात असलेल्या खनिज संपत्तीबाबत गोळा केलेली माहिती ही विशेषत: खनिजावर आधारित उद्योगधंदयांची योजना तयार करण्यासाठी तसेच राज्यात खनिजाचे उचित समुपयोजन करण्याकरिता उपयोगी पडते. या संचालनालयाचे मुख्यालय नागपूर येथे कस्थत असून विविध खनिजांचे पूर्वेक्षण व सर्वेक्षण कार्य नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, औरंगाबाद या प्रादेशिक कार्यालयाद्वारे करण्यात येते. तसेच या संचालनालया अंतर्गत खनिजांचे रासायनिक विश्लेषणाकरिता नागपूर येथे रासायनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेली असून नागपूर येथे खडकांचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्रस्तरप्रयोगशाळाही उपलब्ध आहे.
खनिज समन्वेशषण कार्यासाठी या संचालनालयाजवळ एकूण 20 आवेधन यंत्रे व आवश्यक साधन सामुग्री आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी हे पद असून या पदावर संचालनालयाचे अधिकारी नियुक्त करण्यात येत असून हे अधिकारी संबंधीत जिल्हाधिकारी यांना खनिज प्रशासनाचे कामात मदत करतात. संचालनालयाने समन्वेषणाद्वारे मोठया प्रमाणावर कोळसा, चुनखडी बॉक्साईट, सिलीका वाळू, लोहखनिज, कायनाईट, सिलीमनाई, फ्लोराईट, बेराईट, क्रोमाईट इत्यादी खनिजासाठी अव्याहत संशोधन कार्य केले आहे.
या संचालनालयाने केलेल्या पूर्वेक्षण कामाचे आधारे मोठया प्रमाणावर राज्यात खनिजावर आधारित उद्योगधंदे व प्रकल्प उभरण्यात आले आहेत व काही प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संचालनालयाने आतपर्यंत निरनिराळे खनिजाकरिता जवळ जवळ 316 पूर्वेक्षण / सर्वेक्षण याोजनांचे भूवौज्ञानीय अहवाल तयार केलेले आहेत.
थोडक्यात, राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/29/2020
दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच र...
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंम...
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे...
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता ...