डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना शासननिर्णय क्र. युटीए - १०७८/डी-२५ दिनांक २२ डिसेंबर १९७८ अन्वये मुंबई इथे करण्यात आली. या विचारपीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करण्यात आले. हि संस्था मुंबईहून सन १९८७ पुणे इथे स्थलांतरित करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २००८ रोजी शासनाने या संस्थेला स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत
.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), ही कटिबद्ध आहे.
स्रोत : बार्टी वेबसाईट
अंतिम सुधारित : 7/19/2020
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात...
डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार सामान्य जनत...
आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळ...
एखाद्या गावाचा इतिहास पूर्णपणे पुसला गेला असला तरी...