वेबसाईट : जलसंधारण विभाग
ध्येय
लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्ये जल व मृदसंधारणाच्या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्ट्राची उभारणी करणे
कार्यदृष्टी
- सामाजिक वनीकरणास प्रोत्साहन देणे.
- मर्यादित साधनसंपत्तीच्या प्रभावी शास्त्रीय व्यवस्थापनासाठी पाणलोटनिहाय मृद व जलसंधारणांच्या प्रथांना प्रोत्साहन/चालना देणे.
कार्ये
- 250 हे. च्या आतील लघुपाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती व परिरक्षण करणे.
- लोक सहभागामधून मृद जलसंधारण व वॉटर हार्वेस्टिंगच्या मत्तांची निर्मिती व परिरक्षण करणे.
उदिष्ट
- जलसंधारण विभागाने निश्चित केलेली भौतिक उद्दिष्टे साध्य करणे.
- एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमासाठी चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देणे व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पूर्व तयारी करणे.
- स्थानिक क्षेत्रासाठी पाणी वापर विभागांची निर्मिती व ते क्रियाशील करणे.
- संचालक, मृदसंधारण यांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घ मुदतीची उपाययोजना करणे.
- सामाजिक वनीकरण विभागाची पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे.
- सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्ण करण्यात आलेल्या मत्तांची पडताळणी करणे व माहिती संग्रह करणे.
- मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्ये लोक सहभागास प्रोत्साहन देणे.
- राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीपैकी किमान 85% निधीचा विनियोग 31 मार्चपर्यंत करणे.
- जलसंधारण विभागाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याच्या कार्यपध्दती सुरु करणे.
- मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी ग्राम पंचायतींमार्फत क्षमता निर्धारणासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमाचा वापर करुन घेणे.
जलसंधारण विभागातील विविध योजनांची अद्यावत माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा (२०१५ ).
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/3/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.