डिजिटल इंडिया ह्या उपक्रमाचे तीन उद्दिष्ट क्षेत्र
डिजिटल इंडिया ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट प्रामुख्याने तीन क्षेत्रांवर केंद्रित आहे
- प्रत्येक नागरिकासाठी मुख्य उपयोगी घटक म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा देऊ करणे
- प्रशासन व मागणीनुसार सेवा
- नागरिकांचे डिजिटल माध्यमाद्वारे सशक्तीकरण
प्रत्येक नागरिकासाठी उपयोगी घटक म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा
- नागरिकांना सेवा देण्यासाठी मुख्य उपयोगी घटक म्हणून अतिवेगवान इंटरनेट उपलब्ध करुन देणे
- जन्मापासून मृत्यूपर्यंत डिजिटल ओळख जी प्रत्येक नागरिकासाठी वैशिष्ट्यपूर्ण, आयुष्यभरासाठी, ऑनलाईन व प्रमाणीकरण करण्यायोग्य असेल
- डिजिटल व आर्थिक क्षेत्रामध्ये नागरिकांचा सहभाग समर्थ करणारे मोबाईल फोन व बँक खाते
- सामाईक सेव केंद्र सहजपणे उपलब्ध होणे
- सार्वजनिक क्लाउडवर वापरण्यायोग्य खाजगी स्पेस
- सुरक्षित व अभेद्य सायबर-स्पेस
प्रशासन व मागणीवर आधारित सेवा
- विविध विभाग किंवा कार्यक्षेत्रांमध्ये अखंडपणे एकत्रित सेवा
- ऑनलाईन व मोबाईल प्लॅटफॉर्मवरुन वास्तविक वेळेत सेवा उपलब्ध होणे
- सर्व नागरिकांचे अधिकार वहनीय असतील व क्लाउडवर उपलब्ध होतील
- व्यवसाय करण्यातील सहजता सुधारण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सुधारित सेवा
- आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात व रोखरहित बनविणे
- निर्णय सहाय्यक यंत्रणा व विकासासाठी भूअवकाशीय माहिती यंत्रणेचा (जीआयएस) उपयोग करुन घेणे
नागरिकांचे डिजिटल माध्यमाद्वारे सशक्तीकरण
- सार्वत्रिक डिजिटल साक्षरता
- सार्वत्रिक उपलब्ध डिजिटल संसाधन
- भारतीय भाषंमध्ये डिजिटल संसाधने/सेवांची उपलब्धता
- सहभागात्मक प्रशासनासाठी सहाय्यक डिजिटल प्लॅटफॉर्म
- नागरिकांना व्यक्तिशः हजर राहून सरकारी दस्तऐवज/प्रमाणपत्रे सादर करावी लागत नाहीत
स्त्रोत -डिजिटल इंडिया
अंतिम सुधारित : 8/23/2019
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.