कॅशलेस व्यवहार प्रक्रियेतील सर्वांगीण सुरक्षिततेसाठी काही सूचना
प्रस्तावना
संपूर्ण प्रक्रियेतील सर्वांगीण सुरक्षिततेसाठी काही सूचना (अवश्य कराव्यात, आणि कटाक्षाने टाळाव्यात अश्या काही बाबी)
बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. आता तर रोकडरहित अर्थव्यवस्था राबवायची आहे, म्हणजे सर्वच व्यवहार मोबाईलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून करणा-याची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार. म्हणजेच, बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल जाणार. अश्या विविध पद्धतीने आपण लुबाडले जाऊ नये, आणि या फसव्या जाळ्यापासून स्वतःला दूर ठेवता यावे, याचे मार्गदर्शन करणारा हा पाठ आहे.
सर्वसाधारण
- तुमच्या बँक खात्यातील प्रत्येक व्यवहाराची सूचना एस.एम.एस. द्वारे नियमितपणे मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल
- तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक जोडून घ्या, म्हणजे बँकेच्या "के.वाय.सी.” नियमांची पूर्तता होईल आणि आपली विशिष्ठ ओळखही निर्माण होईल.
- तुमच्या विविध काडचे ‘पिन’ क्रमांक कोणासही सांगू नका, किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने उघड करू नका.
- केवळ विश्वासार्ह व खात्रीच्या व्यापा-यांकडेच खरेदी, किंवा अन्य आर्थिक व्यवहार करा.
- तुम्ही ए.टी.एम. मध्ये कोणताही व्यवहार करत असताना कोणी त्रयस्थ व्यक्ती तुमच्यावर लक्ष ठेऊन तर नाही ना, किंवा तुमच्यावर पाळत ठेवून तर नाही ना, याकडे लक्ष द्या आणि तशी खात्री करूनच व्यवहार करा.
- कोणताही रोकडरहित व्यवहार करत असताना काही अडचणी आल्यास त्याच्या निराकरणाकरिता तत्स्थळी उपस्थितांपैकी कोणत्याही त्रयस्थ, अनोळखी, किंवा संशयास्पद व्यक्तीचे सहाय्य किंवा मार्गदर्शन घेऊ नका. त्यातून फसवणूक किंवा लुबाडणूक होण्याच्या शक्यता दाट असते.
- एटीएम मशिन किंवा कार्डद्वारे पैसे अदा करण्याच्या ठिकाणी मशिनन स्कीमर लावण्यात येतात. हे स्कीमर जिथे कार्ड स्वाइप करण्यात येते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे लावण्यात येते, की तो एटीएम मशिनचाच एक भाग असल्यासारखे दिसते. जेव्हा तुम्ही मशिनमध्ये कार्ड टाकता किंवा स्वाइप करता त्यावेळी हा स्कीमर तुमच्या कार्डमधील माहिती मिळवते.
- एटीएम मशीनच्या बटणांना खळ किंवा डिंक लावून ती बटणे काम करणार नाहीत याची व्यवस्था करण्यात येते. एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड मशनिमध्ये टाकल्यानंतर बटणे दाबल्यास ती दाबली जात नाहीत. अशावेळी भामटे तुमच्याजवळ येऊन तुम्ही कोणती बटणे दाबताय हे पाहतात. तुम्हाला मदत करण्याचा किंवा तुमची समस्या ऐकण्याचा बहाणा करत पिन नंबर जाणून घेतात. तसेच, तुमचे कार्ड अडकून असल्यास तुम्ही गेल्यानंतर पिन नंबर वापरून पैसे काढून घेतात.
- “पॉइंट ऑफ सेल" (दुकानात पैसे देण्याच्या) काऊंटरवर कार्ड वापरून पेमेंट करण्याची वेळ आल्यास काडांचा पिन टाइप करताना काळजी घ्या. विक्रेत्याला कधीही पिन देऊ नका किंवा सांगू नका. त्याचप्रमाणे तुमच्या काडांवर कुठेही पिन लिहून ठेवू नका किंवा कार्ड ठेवत असलेल्या कव्हरमध्ये पिन लिहून ठेऊ नका.
- आपल्या खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासा. खात्यात एखादा गैरव्यवहार झाल्यास त्याची माहिती ब-याच दिवसांनंतर बँकेला ग्राहकाकडून दिली जाते. याचे कारण म्हणजे, खात्याचे पासबुक किंवा स्टेटमेंट पाहिल्यावरच ही बाब ग्राहकांच्या लक्षात येते. यासाठी तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा.
आपला मोबाईल
- आपल्या आवश्यकतेप्रमाणे नामांकित कंपनीचा, आधुनिक प्रणाली असणारा (शक्यतो अद्ययावत अँड्रॉईड प्रणाली असलेला) मोबाईल वापरणे इष्ट राहील.
- अश्या मोबाईलचा वेग अधिक असतो, तसेच प्रक्रिया करण्याची क्षमता आणि माहिती साठवण्याची क्षमता पुरेशी असते.
- आपला जो मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असेल, तो क्रमांक शक्यतोवर बदलू नका.
- एकाहून अधिक सिम कार्ड वापरात असल्यास, त्यातील बँक खात्याला जोडलेला क्रमांक प्राथमिक ("प्रायमरी") ठेवा. बँकेचे सर्व संदेश याच क्रमांकावर येणार आहेत, हे लक्षात ठेवा.
- त्यामध्ये कोणतीही अनावश्यक अॅप इन्स्टॉल करू नका. तसे केल्याने आपल्या मोबाईलचा वेग तर कमी होतोच, पण त्याशिवाय त्यामध्ये व्हायरसेस आणि अन्य अनावश्यक घटक शिरकाव करण्याची शक्यता निर्माण होते.
- मोबाईलद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना त्यासमयी नको असलेली अॅपस् शक्यतो बंद करा. तसे केल्याने मोबाईलमधील प्रक्रियांचा वेग वाढतो आणि आपले व्यवहार यशस्वीपणे पूर्ण करणे सोपे जाते.
- मोबाईलचा वापर करताना आपण काही मूलभूत खबरादारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती (म्हणजे खाते क्रमांक, डेबिट आणि केडीट कार्ड पीन) मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका.
- तुम्ही बँकिंग अॅप युज करत असाल तर तुमच्या अॅपचा युजर नेम आणि पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेऊ नका. चुकीच्या हातात मोबाईल गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो.
- आजकाल अनेक सार्वजनिक ठिकाणी विनामुल्य वाय-फाय सेवा उपलब्ध असते, जसे की रेल्वे स्टेशन्स, विमानतळ, मॉल्स, सिनेमा थियेटर्स, इत्यादी. अश्या पब्लिक वाय-फायचा वापर मोबाईल बॅकिंगसाठी टाळा. तसेच खात्यासंदर्भातील सूचना टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवू नका. तसेच सेफ मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा.
- अधिकृत अॅप्सचा वापर करा. अनधिकृत, अप्रमाणित, किंवा बनावट अॅपच्या वापरामुळे आपल्या मोबाइलमध्ये क्हायरस किवा मालवेअरचा धोका असती.
- योग्य अॅपचा वापर केला नाही तर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमला मालवेअरचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊललोड करताना सावधनता बाळगा.
- बँकेची भासतील, अशी बनावट अॅपस् तयार करण्यात येतात आणि त्या माध्यमातून बँकेविषयी तसेच तुमची महत्वपूर्ण माहिती मिळवून पैसे काढून घेण्यात येतात.
- अनोळखी कॉलपासून सावधान. जेव्हा तुम्हांला एखाद्या अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आला तर त्यावर पुन्हा कॉल करताना सावधानता बाळगा. यामुळेही तुम्हांला मालवेअरचा धोका वाढतो. अशा कॉलसाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. तसेच फोन सुरू असताना तुमचा डेटा ट्रान्सफरही होऊ शकतो.
- ई-मेलपासून सावध रहा: तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करा, असे सांगणारे ई-मेल तुम्हाला आली, तर अशी कोणतीही माहिती त्यावर देऊ नका. असा ई-मेल हा फिशिंग मेल असू शकतो. याचा परिणाम ओळख चोरीत (म्हणजे तुमची गोपनीय माहिती चोरण्यात) होऊ शकतो.
- सोशल मीडियाच वापर करताना सावधान. सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अशा लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला एखाद्या अनसेफ साइटवर रिडायरेक्ट करेल. तसेच अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी तुम्हांला बँकेच्या साइटवर घेऊन जात असेल. ती बनावटी वेबसाइट असू शकते. तसेच टेक्स मेसेज किंवा इमेल करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
मोबाईल हरवल्यास
- मोबाईल हरवल्यास काही गोष्टी तातडीने करणं गरजेचे आहे. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
- सर्वात आधी कॉल करा: तुमचा जो कोणता फोन हरवला आहे त्यावर आधी (दुस-या एखाद्या मोबाईलमधून) एक कॉल करा. कॉल लागत नसल्यास त्यावर एक मॅसेज करा. तुमचा हरवलेला फोन कोण्या भल्या व्यक्तीकडे असेल तर तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता असते.
- पासवर्ड बदला: तुमचा फोन हरवल्यास जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर डेस्कटॉपवरुन तुमचे पासवर्ड बदला. सोशल मीडिया अकाऊंट, ईमेल आयडी किंवा अगदी ई_बॅक सेवेचे पासवर्ड बदला.
- अंड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर: हे फीचर तुमच्या फोनचे लोकेशन शोधून काढण्यात मदत करू शकते. यामुळे तुमचा हरवलेला फोन लॉकही केला जाऊ शकतो.
- कार्ड ब्लॉक करा: तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करुन तुमचे सिम कार्ड ब्लॉक करुन टाका. यामुळे तुमच्या सिमकार्डचा कोणी दुरुपयोग करणार नाही.
- पोलिसांना माहिती द्या: पोलिसांना तुमचा फोन हरवल्याची माहिती द्या. तुमचा फोन सापडल्यास ते तुम्हाला सांगू शकतील.
अंतिम सुधारित : 8/4/2023
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.