অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधार कार्डने व्यवहार करा

परिचय

  • बँक प्रतिनिधी किंवा मायक्रो-एटीएम च्या माध्यमातून व्यवहार करण्याची सुविधा आधार प्रणित प्रणालीद्वारे मिळते.
  • AEPS चा लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड बँकेच्या खात्याशी सलंग्न असायला हवे
  • या प्रणाली मार्फत व्यवहार करताना आपल्याला कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.

प्रणाली मार्फत मिळणाऱ्या सेवा

  • खात्यावरील रकमेची चौकशी
  • रक्कम काढणे
  • रक्कम भरणे
  • आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे

आधार प्रणित प्रणालीमध्ये व्यवहार कसा कराल

  • आपल्या नजीकच्या Micro-ATM किंवा बँक प्रतिनिधीला भेट द्या
  • आपल्या बँकेचे नाव आणि १२ अंकी आधार कार्ड नंबर सांगा
  • जो व्यवहार करायचा तो निवड जसे - खात्यावरील रकमेची चौकशी करणे, रक्कम काढणे, रक्कम भरणे किंवा आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे
  • स्कॅनर वर आपले फिंगर प्रिंट स्कॅन करा
  • व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला व्यवहाराची पावती मिळेल.

 

कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा पाहण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जागृतता कार्यक्रमाच्या (अवेअरनेस प्रोग्रॅमच्या) फेसबुक पेजला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र डिजिधन अवेअरनेस प्रोग्रॅम

स्त्रोत- http://www.digidhan.info/#

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate