অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

युआयडीएआय - आधार तंत्रज्ञान

युआयडीएआय - आधार तंत्रज्ञान

  1. युआयडीएआय नमुन्याची वैशिष्ट्ये
  2. गरिबांना अनुकूल दृष्टीकोन
  3. निवासींची योग्य पडताळणीसह नावनोंदणी
  4. भागीदारी नमुना
  5. युआयडीएआय निबंधकांसाठी लवचिक नमुन्यावर भर देईल
  6. नक्कल राहणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रक्रिया
  7. ऑनलाईन प्रमाणीकरण
  8. डाटा पारदर्शकता
  9. तंत्रज्ञान युआयडीएआय यंत्रणा सुरक्षित करेल
  10. युआयडीएआय
  11. निबंधक
  12. नावनोंदणी संस्था
  13. परिचयकर्ता
  14. निवासी
  15. प्रमाणकर्ता
  16. जैवसांख्यिकीय उपाय (सोल्यूशन)
  17. युआयडीएआय यंत्रणेमध्ये वापरलेले जैवसांख्यिकीय उपाय घटक पुढीलप्रमाणे आहेत
  18. युआयडी यंत्रणेच्या जैवसांख्यिकीय घटकांच्या गरजा
  19. निबंधक यंत्रणा
  20. टपाल विभाग सामग्री व सुविधा सेवा देईल. याचे दोन भाग आहेत
  21. संपर्क केंद्र
  22. युबीसीसी व संशोधन
  23. मोहिम
  24. उद्दिष्टे
  25. धोरण

युआयडीएआय नमुन्याची वैशिष्ट्ये

आधार केवळ ओळख देईल

युआयडीएआयचे अधिकार क्षेत्र केवळ विशिष्ट ओळख क्रमांक (आधार) देण्यापुरतेच मर्यादित असेल, जो व्यक्तिच्या जनसांख्यिकीय व जैवसांख्यिकीय माहितीशी निगडित असेल. आधार केवळ ओळख पटवण्याची खात्री देईल, हक्क, लाभ किंवा अधिकारांची नाही.

गरिबांना अनुकूल दृष्टीकोन

युआयडीएआयची सर्व निवासींची नावनोंदणी व्हावी अशी दूरदृष्टी आहे, यामध्ये भारतातील गरीब व उपेक्षित वर्गांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्राधिकरणाची पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार शाश्वती योजना (नरेगा), राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (आरएसबीवाय), व सार्वजनिक वितरण यंत्रणा (पीडीएस) अशा निबंधकांशी भागीदारी करण्याची योजना आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने गरीब व उपेक्षित लोक युआयडी यंत्रणेंतर्गत येतील. युआयडीच्या प्रमाणीकरणाच्या पद्धतीमुळे गरिबांना सेवा देण्यातही सुधारणा होईल.

निवासींची योग्य पडताळणीसह नावनोंदणी

भारतामध्ये ओळख दर्शवणारे सध्याचे डाटाबेस फसव्या व नकली/बनावट लाभार्थींच्या समस्येने ग्रासलेले आहेत. युआयडीएआय डाटाबेसमध्ये याचा प्रवेश होऊ नये यासाठी, निवासींच्या जनसांख्यिकीय व जैवसांख्यिकीय माहितीची व्यवस्थित पडताळणी करुन मग त्यांची डाटाबेसमध्ये नावनोंदणी करण्याची प्राधिकरणाची योजना आहे. याद्वारे गोळा करण्यात आलेला डाटा उपक्रमाच्या सुरुवातीपासूनच स्वच्छ असल्याची खात्री केली जाईल.

मात्र ब-याचशा गरीब व उपेक्षित लोकांकडे ओळख दर्शवणारे दस्तऐवज नसतात व युआयडी हे त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले पहिलेच प्रमाणीकरण असेल. प्राधिकरण याची खात्री करेल की तुमच्या निवासीस जाणून घ्या (केवायआर) मानके गरिबांची नावनोंदणी करण्यामध्ये अडथळा ठरणार नाहीत, व ते डाटाच्या प्रामाणिकपणाबाबत कोणतीही तडजोड न करता अशा लोकांचा समावेश केला जाईल यासाठी योग्य प्रक्रिया तयार करेल.

भागीदारी नमुना

युआयडीएआयचा भारतात सध्या असलेल्या सरकारी व खाजगी पायाभूत सुविधांचा लाभ घेण्याचा दृष्टीकोन आहे. युआयडीएआय हे नियामक प्राधिकरण असेल जे केंद्रीय ओळख क्रमांक (आयडी) संग्रहाचे (सीआयडीआर) व्यवस्थापन करेल, आधार देईल, नागरिकांच्या माहितीत सुधारणा करेल व आवश्यकतेनुसार निवासींची ओळख प्रमाणित करेल.

त्याशिवाय, प्राधिकरण केंद्रीय व राज्य सरकारचे विभाग व खाजगी संस्थांशी भागीदारी करेल, जे युआयडीएआयचे ‘भागीदार’ असतील. निबंधक आधारसाठीच्या अर्जांवर प्रक्रिया करतील व निवासींच्या माहितीची नक्कल नष्ट करण्यासाठी (डी-ड्युप्लिकेट) सीआयडीआरशी संपर्क साधतील व आधार घेतील. हे प्राधिकरण ओळखीच्या प्रमाणीकरणासाठी सेवा पुरवठादारांशी भागीदारी करेल.

युआयडीएआय निबंधकांसाठी लवचिक नमुन्यावर भर देईल

निबंधक त्यांच्या कार्ड देणे, मूल्य निश्चित करणे, केवायआर पडताळणीचा विस्तार, विशिष्ट गरजांसाठी निवासींची जनसांख्यिकीय माहिती गोळा करणे व प्रमाणीकरण या प्रक्रियांमध्ये बरीच लवचिकता असेल याची खात्री करतील. युआयडीएआय निबंधकांना विशिष्ट जनसांख्यिक व जैवसांख्यिक माहिती गोळा करताना व मूलभूत केवायआर कार्ये पार पाडताना, समानता राखता यावी यासाठी मापदंड देईल. प्राधिकरणाने स्थापित केलेल्या केवायआर व जैवसांख्यिक समित्या हे मापदंड निश्चित करतील.

नक्कल राहणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रक्रिया

निबंधक अर्जदाराच्या माहितीची नक्कल असल्यास ती नष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी डाटा सीआयडीआरला पाठवतात. सीआयडीआर, डाटाबेसमध्ये नक्कल कमीत-कमी व्हावी/नष्ट व्हावी यासाठी प्रत्येक नव्या नावनोंदणीसाठी महत्वाच्या जनसांख्यिकीय क्षेत्रांवर व जैवसांख्यिकीवर शोध घेईल.

युआयडीएआयचा फायदा असा आहे की त्याची रचना स्वतःहून स्वच्छता करणा-या यंत्रणेच्या दृष्टीने करण्यात आली आहे. भारतामधील सध्या वेगवेगळे डाटाबेस उपलब्ध आहेत त्यामध्ये व्यक्तिंनी वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळी माहिती दिली असण्याची शक्यता आहे. मात्र युआयडीएआय यंत्रणेमध्ये नक्कल नष्ट करण्याच्या प्रक्रियेमुळे (डी ड्युप्लिकेशन) निवासींना डाटाबेसमध्ये राहण्याची केवळ एक संधी मिळते, त्यामुळे व्यक्तिंना अचूक डाटाच (माहिती) द्यावा लागतो. विविध लाभ व अधिकार आधारशी जोडल्यानंतर हा लाभ अधिक प्रभावी होईल.

ऑनलाईन प्रमाणीकरण

हे प्राधिकरण ऑनलाईन प्रमाणीकरणाचा एक सशक्त प्रकार उपलब्ध करुन देईल, ज्यामध्ये संस्था निवासीच्या जनसांख्यिकीय व जैवसांख्यिकीय माहितीची केंद्रीय डाटाबेसमध्ये संग्रहित केलेल्या माहितीशी तुलना करु शकतात. प्राधिकरण निबंधक व संस्थांना आधार प्रमाणीकरण प्रक्रियेचा स्वीकार करण्यासाठी पाठिंबा देतील, व त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा व प्रक्रिया निश्चित करण्यासाठी मदत करतील.

युआयडीएआय निवासींचा डाटा देणार नाही: प्राधिकरणाचा दृष्टीकोन निवासींच्या गोळा केलेल्या माहिती संदर्भात ‘गोपनीयता व हेतू’ यांचा समतोल साधण्याचा आहे. संस्थांना नावनोंदणी केलेल्या निवासींची माहिती संग्रहित करण्याचा अधिकार असेल तर त्या तसे करु शकतात, मात्र त्यांना आधार डाटाबेसमधील माहिती उपलब्ध होणार नाही. युआयडीएआय ओळखीचे प्रमाणीकरण करण्याच्या सर्व विनंत्यांचे उत्तर ‘होय’ किंवा ‘नाही’ असे देईल. प्राधिकरण निबंधकांशी त्यांनी गोळा केलेल्या व संग्रहित केलेल्या माहितीच्या गोपनीयतेची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी करारही करेल.

डाटा पारदर्शकता

प्राधिकरण गोळा करण्यात आलेला सर्व डाटा लोकांना आरटीआय (माहितीचा अधिकार) अंतर्गत उपलब्ध करुन देईल. मात्र कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तिला वैयक्तिक ओळख माहिती (पीआयआय) उपलब्ध होणार नाही.

तंत्रज्ञान युआयडीएआय यंत्रणा सुरक्षित करेल

युआयडीएआयच्या पायाभूत सुविधेमध्ये तंत्रज्ञान यंत्रणांची भूमिका महत्वाची असेल. आधार डाटाबेस केंद्रीय सर्वरवर साठवला जाईल. निवासींची नावनोंदणी संगणकीकृत असेल, व निबंधक आणि सीआयडीआर यांच्यादरम्यान नेटवर्कद्वारे माहितीची देवाणघेवाण होईल. निवासींचे प्रमाणीकरण ऑनलाईन होईल. प्राधिकरण माहितीच्या संरक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी एक यंत्रणा तयार करेल.

संस्था व भूमिका

युआयडीएआय

युआयडीएआय

  • प्राधिकरण आधार (क्रमांक) देईल व नावनोंदणी व प्रमाणीकरणासाठी मापदंड निश्चित करेल, ज्यांचे सार्वत्रिक पालन केले जाईल. सुरुवातीला, युआयडीएआय आधार उपयोजनाची (ऍप्लिकेशन) सेवा पुरवठादारांच्या मदतीने रचना करेल, विकसित करेल व ठरवेल.
  • त्यानंतर या संपूर्ण संचालनाचा विस्तार केला जाईल व ते बाह्य सेवा पुरवठादाराद्वारे चालवले जाईल.
  • युआयडीएआयच्या जबाबदा-यांमध्ये उत्पादने व सेवा देण्याशिवाय निबंधकांची नियुक्ती करणे, नावनोंदणी संस्थांना मान्यता देणे व परिचयकर्त्यांची यादी देणे यांचाही समावेश होतो.
  • ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी, युआयडीएआय आधार प्रमाणीकरणावर आधारित सेवा तयार करण्यास मदत करेल.
  • निबंधक

    या युआयडीएआच्या सेवा (नावनोंदणीसारख्या) त्यांच्या घटकांना देण्यासाठी, युआयडीएआयच्या वतीने काम करणा-या, सार्वजनिक व खाजगी संस्था असतात ज्या सध्या निवासींना सेवा देत आहेत. निबंधकांच्या उदाहरणांमध्ये राज्य सरकारे, केंद्र सरकारची मंत्रालये व विभाग, इतर आर्थिक संस्था, दूरसंचार कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. निबंधक युआयडीएआयच्या सेवा सर्व निवासींना देऊ शकतात, मात्र त्यांनी तसे करणे आवश्यक नसते. निबंधक निवासींकडून घराचा पुरावा, ओळखीचा पुरावा यासारखे दस्तऐवज गोळा करु शकतात.

    निबंधकांनी असे दस्तऐवज साठवून ठेवणे व नंतर तपासणी/लेखापरीक्षणासाठी ते उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. निबंधकांना विशेषतः युआयडीएआयने गोळा केलेला काही डाटा मिळू शकतो व उपलब्ध होऊ शकतो, उदा. जनसांख्यिकीय डाटा व निवासीचे छायाचित्र. निबंधक त्यांच्या यंत्रणेमध्ये आधार साठवू शकतात, तसेच निवासीने दिलेल्या साहित्यावर (उदाहरणार्थ कार्ड किंवा एखादे पत्र) छापू शकतात.

    काही निबंधक बोटांचे ठसे, व डोळ्यांच्या बाहुलीची प्रतिमा यासारखा जैवसांख्यिक डाटा, ऑफलाईन प्रमाणीकरण करण्यासाठी स्मार्ट कार्डवर सुरक्षित पद्धतीने साठवू शकतात. हा डाटा कदाचित त्यांच्या सर्वरवर साठवला जाणार नाही किंवा ऑनलाईन प्रमाणीकरणासाठी वापरला जाणार नाही.

    समाजाच्या उपेक्षित वर्गासाठी नोंदणीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी, निबंधक परिचयकर्त्यांची यादी देऊ शकतात जे निवासींचा परिचय देतील, अशा प्रकारे केवायआर दस्तऐवजांद्वारे आवश्यक असलेले काही पुरावे लागणार नाहीत.

    परिचयकर्त्यांची ही यादी प्रत्येक निबंधकानुसार असेल. निबंधक हे प्रमाणकर्तेही असतात व युआयडीएआय यंत्रणेमध्ये आधीच नावनोंदणी झालेल्या निवासीसाठी तपशीलाची खात्री पटविण्यासाठी प्रमाणीकरण इंटरफेसचा (आंतरपृष्ठ) वापर करतात.

    उप-निबंधक

    हे विशिष्ट निबंधकांतर्गत असणारे विभाग किंवा संस्था असतात. राज्यसरकारचे ग्रामीण विकास व पंचायती राज (आरडीपीआर) यासारखे संलग्न विभाग राज्य सरकारचे निबंधक असतील.

    नावनोंदणी संस्था

    • निबंधक या संस्थेशी करार करतात, मात्र त्यांना त्यांच्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी, युआयडीएआयने प्रमाणित करणे आवश्यक असते.
    • नावनोंदणी संस्था क्षेत्रावरील नावनोंदणी स्थानकांसाठी परिचालक व निरीक्षक पुरवते, व जास्तीत जास्त निवासींची नावनोंदणी व्हावी यासाठी अनुकूल परिस्थितीही निर्माण करते.
    • नावनोंदणी संस्थांनी नावनोंदणी मोहिमेच्या आधी जनसांख्यिकीय माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यांनी निवासींना व युआयडीएआयला नावनोंदणीच्या नियोजित वेळापत्रकाची सूचना आगाऊ देणे आवश्यक आहे.
    • युआयडीएआय निबंधकांच्या मदतीसाठी नावनोंदणी संस्थांचा यादीत समावेश करु शकतील.
    • मात्र, निबंधक, त्याशिवायही इतर नावनोंदणी संस्थांची निवड करण्यास मोकळे आहेत.

    परिचयकर्ता

    परिचयकर्ता ही युआयडीएआय किंवा निबंधकाने नावनोंदणीसाठी व्यक्तिंचा परिचय करुन देण्यासाठी अधिकृत केलेली प्रसिद्ध व्यक्ती असते. ही यंत्रणा विशेषतः, प्रसिद्ध करण्यात आलेल्या केवायआर नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलेला ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा यासारखे पुरेसे दस्तऐवज नसलेल्या उपेक्षित व वंचित वर्गातील निवासींपर्यंत युआयडीएआय यंत्रणेला पोहोचता यावे म्हणून तयार करण्यात आली.

    म्हणून, एक परिचयकर्ता असे आश्वासन देतो की आधारसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही खरोखरच निवासी आहे, व त्याच्या/तिच्या सर्वोत्तम वैयक्तिक माहितीप्रमाणे ते जे म्हणतात ते आहेत.

    निबंधक परिचयकर्त्यांची नावे व आधार असलेली यादी देऊ शकतात. विविध निबंधकांसाठी, या यादीमध्ये अधिकारी (निवडलेले, राजपत्रित व इतर), शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी शिक्षिका, इत्यादींचा समावेश आहे. युआयडीएआय उपेक्षित वर्गातील लोकांचा अधिक समावेश व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व इतर नागरी समाज संस्थांची मदत घेऊ शकते.

    समाजाच्या उपेक्षित वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आलेले नावनोंदणी योजना, सशक्त, विश्वसनीय परिचयकर्त्यांच्या जाळ्यावर अवलंबून असेल- जी काळाच्या पुढचा विचार करुन तयार केली पाहिजे.

    निवासी

    भारतातील ज्या निवासीला आधार मिळवायचा आहे, त्याने केवायआर नियमांची पूर्तता करणारे दस्तऐवज देणे किंवा नियुक्त परिचयकर्त्याने त्याची ओळख करुन देणे अपेक्षित आहे. निवासीची व्याख्या, एक सर्वसामान्य व्यक्ती जी नेहमी भारतात निवास करते अशी करण्यात आली आहे.

    निवासींनी प्रामाणिकपणे माहिती देणे व केवायआर नियमांची पूर्तता करणारे दस्तऐवज देणे, किंवा परिचयकर्त्यांनी त्यांचा परिचय करुन देणे अपेक्षित आहे. त्याशिवाय त्यांनी युआयडीएआयला जैवसांख्यिकीय माहिती देणे अपेक्षित आहे. ते नावनोंदणी संस्थेमधील अनुभव सहज असेल व त्यांच्या विविध समस्यांचे वेगाने निराकरण केले जाईल अशी अपेक्षा करु शकतात.

    निवासींना त्यांचा डाटा उपलब्ध होऊ शकतो, व ते त्यांचे प्रमाणीकरण कधी करण्यात आले होते (ठराविक कालावधीसाठी) हे शोधू शकतात. त्यांना इतर निवासींचा डाटा उपलब्ध होण्यावर युआयडीआय प्रतिबंध घालेल.

    प्रमाणकर्ता

    प्रमाणकर्ता ही संस्था निवासीचे प्रमाणीकरण करण्यासाठी युआयडीएआय यंत्रणेचा वापर करते. प्रमाणकर्ते निवासीच्या आधारशिवाय जनसांख्यिकीय डाटा आणि/किंवा जैवसांख्यिकीय डाटा वापरु शकतात. प्रमाणकर्त्याने त्याला/तिला व्यवहारासाठी आवश्यक असलेली खात्री देणारा प्रमाणीकरणाचा योग्य प्रकार वापरला पाहिजे. प्रमाणकर्त्यांनी युआयडीएआयकडे नोंदणी करणे आवश्यक आहे व अंदाजे कसा वापर असेल हे सांगणे (प्रामुख्याने तरतूद करण्यासाठी) आवश्यक आहे.

    प्रमाणकर्ता प्रमाणीकरण साधन बसविण्यात आले आहे अशा विविध ठिकाणी असू शकतो. युआयडीएआय प्रमाणकर्त्यांना ठराविक सेवा पातळ्यांसाठी पावतीद्वारे शुल्क आकारु शकते. पावतीद्वारे शुल्क आकारण्याच्या संबंधांसाठी अतिरिक्त डाटा आवश्यक आहे.

    प्रमाणकर्त्यांची संख्या युआयडीएआयच्या यंत्रणेची स्थिती कशी आहे हे दर्शवते, कारण विविध क्षेत्रातील प्रमाणकर्ते निवासींसाठी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध असल्याचे सूचित करतात. युआयडीएआय सेवा सुविधा (सर्विस प्लॅटफॉर्म) व मापदंड तयार करण्यासाठी पुढाकार घेईल, ज्यामुळे प्रमाणकर्त्यांचा सहजपणे समावेश करता येईल.

    सीआयडीआरमध्ये वापरल्या जाणा-या उपयोजनांचा (ऍप्लिकेशनचा) आढावा

    सीआयडीआरद्वारे वापरल्या जाणा-या उपयोजनांचे (ऍप्लिकेशनचे) ढोबळपणे मुख्य उपयोजन (ऍप्लिकेशन) व सहाय्यक उपयोजन (ऍप्लिकेशन) असे वर्गीकरण करता येते. मुख्य वर्गवारीमध्ये नावनोंदणी व प्रमाणीकरण उपयोजन (ऍप्लिकेशन) सेवांचा समावेश होतो. तर सहाय्यक वर्गवारीमध्ये प्रशासन, विश्लेषण, सूचनेसाठी आवश्यक असलेल्या उपयोजना (ऍप्लिकेशन), सामग्री व सुविधा (लॉजिस्टिक्स) पुरवणा-यांसाठी फसवणूक शोधणारा इंटरफेस (आंतरपृष्ठ), संपर्क केंद्र व पोर्टलचा समावेश आहे.

    नावनोंदणी उपयोजन (ऍप्लिकेशन) ग्राहकाची आधार देण्यासाठी नावनोंदणी करण्याची विनंती पूर्ण करते. हे उपयोजन पत्त्याचे सामान्यीकरण (नियमांनुसार रचना), तृतीय पक्षाद्वारे नक्कल हटवणे (डी-ड्युप्लिकेशन), व आधार निर्मिती अशा उपयंत्रणांचे एकत्रीकरण करुन नावनोंदणीच्या कामाच्या ओघाचा समन्वय साधते.

    ज्या नावनोंदणी विनंती स्वयंचलित पद्धतीने पूर्ण करता येत नाहीत त्यासाठी मॅन्यूअल एक्सेप्शन वर्कफ्लो (मानवी अपवाद कामाचा ओघ) आवश्यक आहे. मूलभूत अक्षर छपाई व पोहोचवण्याचे उपयोगी कार्य (फंक्शनॅलिटी) सामान्य कामाच्या ओघातील सेवेच्या अपवादासाठी उपलब्ध आहेत.

    प्रमाणीकरण उपयोजन (ऍप्लिकेशन) ओळख प्रमाणीकरण सेवा देते. हे उपयोजन विविध प्रकारच्या प्रमाणीकरण विनंत्यांना सहाय्य करते, उदाहरणार्थ जनसांख्यिकीय, जैवसांख्यिकीय, सामान्य किंवा प्रगत प्रमाणीकरण. सादर करण्यात आलेला आधार निवासीच्या नोंदीशी १:१ जुळवून पाहण्यासाठी वापरला जातो. दिलेली माहिती जैवसांख्यिकीय डाटाबेसमध्ये सापडलेल्या निवांसींच्या माहितीशी जुळवून पाहिली जाते.

    फसवणूक शोध उपयोजन (ऍप्लिकेशन) फसवी ओळख शोधण्यासाठी व कमी करण्यासाठी बसवले जाते. उदाहरणार्थ, या उपयोजनाला (ऍप्लिकेशनला) फसवणुकीच्या पुढील परिस्थिती हाताळाव्या लागतात: दिशाभूल करणारी माहिती, एकाच निवासीद्वारे अनेक नोंदणी, अस्तित्वात नसलेल्या निवासींसाठी नोंदणी, किंवा दुस-या व्यक्तिच्या नावे नोंदणी.

    प्रशासकीय उपयोजन (ऍप्लिकेशन) वापरकर्ता व्यवस्थापन, भूमिका व उपलब्धता नियंत्रण, व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलन व स्थिती कळवणे इत्यादी कामे पार पाडते. यामुळे अंतर्गत व बाह्य संस्थांदरम्यान विश्वसनीय नेटवर्क निर्माण होईल याची खात्री केली जाते. बाह्य संस्था या निबंधक, उप-निबंधक, नावनोंदणी संस्था, क्षेत्रीय (फिल्ड) संस्था, परिचयकर्ता व प्रमाणीकरणाचे ग्राहक असू शकतात. उदाहरणार्थ, हे उपयोजन जे निबंधक किंवा परिचयकर्ते व्यवस्थित दस्तऐवज उपलब्ध नसलेल्या व्यक्तिंची ओळख सिद्ध करण्यासाठी आश्वासन देतात, अशा वापरकर्ता खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक आहे. अंतर्गत संस्था यंत्रणा प्रशासक (सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर्स), ग्राहक सेवा प्रतिनिधी किंवा जैवसांख्यिक व फसवणूक शोध प्रतिनिधी असू शकतात. हे उपयोजन (ऍप्लिकेशन) इतर उपयोजनांच्या (ऍप्लिकेशनची) स्थितीचा आढावा घेईल, व बंद पडणे किंवा उशीर होणे इत्यादी प्रकार थांबवण्यासाठी यंत्रणा देईल.

    विश्लेषण व सूचना उपयोजन (ऍप्लिकेशन) जनता तसेच भागीदारांना नावनोंदणी तसेच प्रमाणीकरणाची सांख्यिकी पुरवते. ते सांख्यिकी दृश्य स्वरुपात सादर करण्यास मदत करते व ती प्रादेशिक पातळीपर्यंत पोहोचण्याची परवानगी देते. या उपयोजनासाठी केवळ एकत्र केलेली माहिती उपलब्ध होते, त्यामुळे व्यक्तिची ओळख पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते.

    माहिती पोर्टल (संकेतस्थळ) अंतर्गत वापरकर्ते, भागीदार व जनतेला प्रशासकीय व माहिती उपलब्ध करुन देते. सीआयडीआरमध्ये वरील उपयोजनाशिवाय (ऍप्लिकेशन), सामग्री व सुविधा पुरविणा-यांसाठी इंटरफेस (आंतरपृष्ठ) उपयोजन व संपर्क केंद्रही आहेत.

    संपर्क केंद्र आंतरपृष्ठ उपयोजन (इंटरफेस ऍप्लिकेशन) चौकशी व स्थिती सुधारणा हे उपयोगी कार्य करते. सामग्री व सुविधा (लॉजिस्टिक्स) आंतरपृष्ठ उपयोजन पत्र छापणे व ते पोहचवणे यासाठी सामग्री व सुविधा पुरवठादारांशी संवाद साधते. त्याचा उपयोग, कच्चा डाटा पाठवण्यासाठी व घेण्यासाठी, आधार डाटा पत्र छपाईकरिता पाठविण्यासाठी, आतील व बाहेरील दिशेने होणा-या संवादाच्या स्थितीविषयी वेळोवेळी ताजी माहिती पाठवण्यासाठी व घेण्यासाठी, केला जातो.

    जैवसांख्यिकीय उपाय (सोल्यूशन)

    जैवसांख्यिकीय उपाय पुरवठादार (बीएसपी) युआयडीएआय यंत्रणेचे जैवसांख्यिकीय घटकांची रचना, पुरवठा, स्थापना, मांडणी, सुरुवात, देखभाल व मदत करतील. सीआयडीआरमध्ये, एकाचवेळी तीन बीएसपी काम करु शकतात. दोन जैवसांख्यिकीय घटक युआयडीएआय यंत्रणेमध्ये वापरले जातात. हे जैवसांख्यिकीय घटक पुढीलप्रमाणे आहेत:

    • स्वयंचलित जैवसांख्यिकीय अभिज्ञापन उपयंत्रणा (एबीआयएस): एबीआयएस, नावनोंदणी सर्वरमध्ये नक्कल हटवण्यासाठी बहुपद्धतीय जैवसांख्यिकीय उपायाचा (मल्टी मोडल बायोमेट्रिक डी-ड्युप्लिकेशन सोल्यूशन) भाग म्हणून वापरली जाईल. सुरुवातीच्या आवृत्तीमध्ये, एबीआयएस प्रमाणीकरण सर्वरमध्ये पडताळणीसाठीही वापरली जाईल.
    • एबीआयएस नक्कल हटवण्यासाठी स्वतःचा मालकीहक्क असलेले बोटांचे ठसे व डोळ्याच्या बाहुल्यांच्या प्रतिमांचा (व विक्रेत्याच्या निर्णयानुसार चेह-याच्या नमुन्यांचा) डाटाबेस ठेवेल, व तिला पडताळणीसाठीच्या विनंत्यांना, बोटांचे ठसे आणि/किंवा डोळ्याच्या बाहुल्यांच्या प्रतिमांसह, तसेच आयएसओ/आयईसी १९७९४-२:२००५ स्वरुपातील बोटांच्या ठशांच्या तपशीलांच्या फाइलसह प्रतिसाद देता आला पाहिजे.
    • विक्रेते भविष्यातील पडताळणी ग्राहकांमध्ये आंतरसक्रियतेला (इंटरऑपरेबिलीटी) चालना देण्यास आयएसओ/आयईसी १९७९४-२:२००५ अंतर्गत अधिक नेमके तपशील देण्यासाठी युआयडीएआयसोबत काम करतील.
    • बहुपद्धतीय सॉफ्टवेअर विकास संच (एसकेडी): एसकेडी नावनोंदणी ग्राहक, मानवी तपासणी (नक्कल शोधण्यासाठी), प्रमाणीकरण सर्वर (नंतरच्या आवृत्तींसाठी) व विश्लेषण भागासाठी (मोड्यूल) वापरले जातील. एसकेडीमध्ये सिग्नल (संकेत) शोधणे, दर्जा विश्लेषण, प्रतिमा निवड, प्रतिमा एकत्रिकरण, वर्गीकरण, प्रतिमा पूर्व-प्रक्रिया, बोटांचे ठसे, डोळ्याची बाहुली व चेह-याची ठेवण यासाठी वैशिष्ट्ये काढून घेणे व तुलनात्मक गुणसंख्या तयार करणे यांचा समावेश असू शकतो.

    युआयडीएआय यंत्रणेमध्ये वापरलेले जैवसांख्यिकीय उपाय घटक पुढीलप्रमाणे आहेत

    • नावनोंदणी सर्वरमधील बहुपद्धतीय नक्कल हटवणे (मल्टीमोडल डी-ड्युप्लिकेशन)
    • प्रमाणीकरण सर्वरमधील पडताळणी उपयंत्रणा
    • नावनोंदणी ग्राहक
    • मानवी तपासणी व उपवाद हाताळणे
    • जैवसांख्यिकीय उप-यंत्रणा निरीक्षण व विश्लेषण.

    दोन जैवसांख्यिकीय घटकांची एकूण कार्ये, वरील पाच क्षेत्रांच्या कार्यात्मक गरजांचे वर्णन व पालन करतात.

    युआयडी यंत्रणेच्या जैवसांख्यिकीय घटकांच्या गरजा

    क) नावनोंदणी सर्वरमध्ये बहुपद्धतीय जैवसांख्यिक नक्कल हटवणे (बायोमेट्रिक डी-ड्युप्लिकेशन) नक्कल हटवण्याचे काम अतिशय मोठे आहे याचा विचार करता, युआयडी नावनोंदणी सर्वर पुढील बाबी वापरेल:

    • बहुपद्धतीय नक्कल हटवणे. नक्कल हटवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती उदाहरणार्थ बोटांचे ठसे व डोळ्यांची बाहुली वापरली जाईल. जर विक्रेत्याला नक्कल हटवण्यासाठी चेह-याचे छायाचित्र वापरण्याची इच्छा असेल तर ते दिले जाईल. काही जनसांख्यिकीय माहितीही दिली जाते, मात्र युआयडीएआय त्याच्या अचूकतेची कोणतीही खात्री देत नाही.
    • नक्कल हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान गाळण्यासाठी जनसांख्यिकीय माहिती वापरली जाणार नाही, मात्र युआयडीएआय कार्यक्रमाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये संभाव्यपणे वापर करण्यासाठी ही क्षमता राखून ठेवली जाईल.
    • प्रत्येक बहुपद्धतीय नक्कल हटवण्याच्या विनंतीमध्ये अनुक्रमांकासह (संदर्भ ओळख क्रमांक) बहुपद्धतीय जैवसांख्यिक व जनसांख्यिकीय डाटाचा समावेश असेल. नावनोंदणीमध्ये एक किंवा अधिक नक्कल असल्याचे आढळल्यास, एबीआयआस या नकलींचा संदर्भ ओळख क्रमांक व ज्या मोजलेल्या तुलनात्मक गुणसंख्येवर नक्कल शोध आधारित होता, ते परत पाठवेल.
    • सापडलेल्या प्रत्येक नकलीसोबत परत पाठवलेली मोजलेली एकत्रित गुणसंख्या [०, १००] या श्रेणीतील असेल, यामध्ये ० म्हणजे काहीच समानता नाही असे दर्शवले जाते व १०० म्हणजे सर्वाधिक समानता असल्याचे दर्शवले जाते.
    • अनेक- विक्रेते: एकापेक्षा अधिक विक्रेत्यांकडील संपूर्ण बहुपद्धतीय उपाय वापरले जातील. आधार उपयोजन (ऍप्लिकेशन) नक्कल हटवण्याच्या विशिष्ट विनंतीचा मार्ग निश्चित करतील. ते नक्कल हटविण्याची विशिष्ट विनंती एकापेक्षा अधिक जैवसांख्यिक उपायांकडे (सोल्यूशन) पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते. त्याने जर नक्कल-हटवण्याची विनंती एकापेक्षा अधिक उपयोजनांकडे पाठवली, तर नक्कल हटवण्याच्या विनंतीचा अंतिम निकाल निश्चित करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.
    • युआयडीएआय एबीआयएस एपीआय, युआयडीएआय उपयोजन (ऍप्लिकेशन) व एबीआयएस यांच्यादरम्यानचा परस्पर संवाद कसा असेल हे स्पष्ट करतात.
    • युआयडीएआय उपयोजनात समाविष्ट मिडलवेअर (सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनला ऑपरेटिंग यंत्रणेव्यतिरिक्त सेवा देणारे सॉफ्टवेअर) (एएसडीएमएसएद्वारे विकसित केले जात आहे) विक्रेत्यास स्वातंत्र्य व मानकीकरण देण्यासाठी आहे. मिडलवेअरची महत्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
      • मार्ग निश्चित करणे व मध्यस्थी.
      • खात्रीशीर पोहोच
      • दोष सहन करणे व भार संतुलित करणे
      • मुक्त स्रोत रॅबिट एमक्यू वापरुन मुक्त मानक आधारित संदेशवहन (एएमक्यूपी)
      • युआयडीएआय उपयोजनांच्या विश्लेषण व यंत्रणा निरीक्षण भागांशी (मोड्यूल) पारदर्शक जोडणी (कनेक्टिव्हीटी)
      • वेब २.० आधारित युआयडीएआय एबीआयएस एपीआय व सीबीईएफएफ डाटा स्वरुप मानकाचे सहाय्य
      • एबीआयएस घटकांचे एकत्रिकरण व विलगीकरण

    (ख) प्रमाणीकरण सर्वरची पडताळणी उपयंत्रणा

    युआयडीएआय सर्वरच्या पहिल्या आवृत्तीमध्ये, जैवसांख्यिक पडताळणी भाग (मोड्यूल), प्रमाणीकरण सर्वरच्या अंतर्गतच पडताळणी करुन देतो. या सोल्यूशमध्ये (उपायामध्ये) नावनोंदणी करण्यात आलेल्या संदर्भांची, मालकी हक्क डाटा नसतानाही, मिळालेल्या आयएसओ/आयईसी १९७९४-२ नुसार बोटांचे ठसे, डोळ्यांची बाहुली किंवा चेह-याच्या प्रतिमा किंवा आयएसओ/आयईसी १९७९४-२ नुसार बोटांच्या ठशांच्या तपशीलांच्या संचाशी, १:१ तुलना करुन पडताळणी करण्याची क्षमता हवी.

    युआयडीएआय सर्वरच्या पहिल्या आवृत्तीमध्ये, जैवसांख्यिक पडताळणी भाग (मोड्यूल), प्रमाणीकरण सर्वरच्या अंतर्गतच पडताळणी करुन देतो. या सोल्यूशमध्ये (उपायामध्ये) नावनोंदणी करण्यात आलेल्या संदर्भांची, मालकी हक्क डाटा नसतानाही, मिळालेल्या आयएसओ/आयईसी १९७९४-२ नुसार बोटांचे ठसे, डोळ्यांची बाहुली किंवा चेह-याच्या प्रतिमा किंवा आयएसओ/आयईसी १९७९४-२ नुसार बोटांच्या ठशांच्या तपशीलांच्या संचाशी, १:१ तुलना करुन पडताळणी करण्याची क्षमता हवी.

    भागीदार पोर्टल (संकेत स्थळ)

    युआयडीएआय प्रकल्प भागीदारी नमुन्यावर आधारित आहे ज्यामध्ये निबंधक व त्यांच्या विविध ठिकाणी असलेल्या संबंधित नावनोंदणी संस्थांचा समावेश होतो. त्यामध्ये इतर व्यक्ती किंवा संस्थांचाही समावेश होतो उदाहरणार्थ साधन पुरवठादार, प्रशिक्षत, पत्र पोहोचवणा-या संस्था, नावनोंदणीपूर्वी पडताळणी करणारे इत्यादी, जे १.२ अब्ज निवासींची नावनोंदणी करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. भागीदार पोर्टल (संकेतस्थळ) भागीदार समुदायाच्या गरजा पूर्ण करेल.

    ही पोर्टल त्यांना एकूण सांख्यिकी देईल ज्यामध्ये त्यांचा समावेश होतो, तसेच त्यांना वैयक्तिक प्रकरणेही पाहू देईल.

    या वापरकर्त्यांना पुढील गोष्टींचा मागोवा घेता येईल:

    • प्रशासन व वापरकर्ता व्यवस्थापन – वापरकर्ता नोंदी तयार करणे / नष्ट करणे
    • नावनोंदणीपूर्व सांख्यिकी एकत्रित करणे – क्रमांक, विलंब, वैधीकरण समस्या. (निबंधक, उप-निबंधक, व नावनोंदणी संस्थांसाठी)
    • एकत्रित नावनोंदणी सांख्यिकी – क्रमांक, विलंब, मंजूरी, फेटाळण्याची कारणे (निबंधक, उप-निबंधक व नावनोंदणी संस्थांसाठी)
    • एकत्रित प्रमाणीकरण सांख्यिकी – क्रमांक, विलंब, यश / अपयश (प्रमाणीकरण ग्राहकांसाठी)
    • T प्रत्येक निवासीची नावनोंदणीपूर्व, नावनोंदणी झाल्यानंतरची, व ते समाविष्ट असलेल्या प्रमाणीकरणाची माहिती शोधणे.
    सार्वजनिक पोर्टल (संकेत स्थळ)

    युआयडीएआय राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प असल्याने त्याला सतत विविध रचना, ताज्या घडामोडी, अंमलबजावणी व संचालनाचे विविध पैलू जनतेला सांगणे आवश्यक आहे. निवासींच्या नावनोंदणी व प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान तक्रारी व समस्यांची दखल घेण्यासाठी तकार निवारण यंत्रणेचाही सार्वजनिक पोर्टलमध्ये (संकेतस्थळ) समावेश करणे आवश्यक आहे. युआयडीएआय माहिती पोर्टल (संकेतस्थळ) वरील सर्व गरजा पूर्ण करेल. या पोर्टलद्वारे सर्व वापरकर्त्यांना युआयडीएआय यंत्रणेविषयी माहिती मिळेल व त्यांना प्रदेशनिहाय कामगिरी इत्यादी पाहता येईल. ती वापरकर्त्यांना वैयक्तिक प्रकरणे शोधू देणार नाही. मात्र विशिष्ट प्रश्नांसंदर्भात तसेच तक्रार निवारणासाठी युआयडीएआयशी कसा संपर्क करायची याची पद्धत दिली जाईल.

    सर्व वापरकर्त्यांना पुढील बाबी पाहता येतील:

    • निबंधकांची यादी, नावनोंदणी संस्था इत्यादी.
    • ठराविक वेळेपर्यंत (दिवस, महिना, वर्ष) व प्रदेशात (देश, राज्य, जिल्हा, शहर) देण्यात आलेले युआयडी क्रमांक
    • संस्थेचे उपक्रम व कामगिरीचे मोजमाप – एकूण निबंधकांची संख्या, युआयडीएआय देण्यातील विलंब, तक्रारींची संख्या इत्यादींची एकत्रित पातळी
    • प्रमाणीकरणाच्या विनंती – संख्या, विलंब, यश /अपयश.
    • युआयडीएआयकडे करण्यात आलेल्या तक्रार निवारणाच्या विनंती व प्रतिसाद.
    डाटा पोर्टल (संकेतस्थळ)

    आम्हाला सर्व प्रकाशित करण्यायोग्य सार्वजनिक माहिती “डाटा पोर्टलद्वारे” (संकेतस्थळ) द्यायची आहे, जिथे सर्व डाटा यंत्राद्वारे वाचण्यायोग्य स्वरुपात दिला जाईल. ही पोर्टल तृतीय पक्ष विकासकांना या डाटावर आधारित वेब २.० उपयोजना (ऍप्लिकेशन्स) विकसित करण्याची परवानगी देते.

    निबंधक यंत्रणा

    निबंधकांकडे आधार यंत्रणेशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या आयटी (माहिती तंत्रज्ञान) पायाभूत सुविधा असतील. त्यांच्या उपयोगी कामांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:

    • नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान ताजी माहिती मिळवणे
    • एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर जनसांख्यिकीय डाटा अपलोड करणे
    • प्रमाणीकरण वापरकर्ता संस्था(एयूए) म्हणून काम करणे

    आपण आधी पाहिल्यापमाणे नावनोंदणी डाटाची एक प्रत नावनोंदणी स्थानकापासून ते निबंधकांच्या यंत्रणेकडे जाते. सीआयडीआरही दिलेला आधार निबंधक यंत्रणेला कळवतो.

    निबंधक यंत्रणेकडे डाटा पाठवताना तो गोपनीय राहावा यासाठी, निबंधकांनी दिलेली सार्वजनिक की (खूणओळ) वापरुन डाटाचे सांकेतिकरण (एन्क्रिप्टेड) केले जाईल. त्यासाठी निबंधकांना त्यांची <खाजगी की, सार्वजनिक की > ही जोडी सुरक्षितपणे ठेवावी लागते व त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतात. एकमेकांशी संपर्क करणा-या निबंधक यंत्रणा अधिक कडक केल्या पाहिजेत.

    युआयडीएआय अंमलबजावणीमध्ये मदत व्हावी यासाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना देऊ शकते मात्र मालकी नेहमी निबंधकांकडेच असेल. युआयडीएआय निबंधक यंत्रणांना सीआयडीआरशी संवाद साधण्यासाठीचे इंटरफेस (आंतरपृष्ठ) निश्चित करेल. त्यामध्ये कोणत्याही संदर्भविभागाचा (लायब्ररी) समावेश केला जाणार नाही. निबंधकही त्यांच्या नावनोंदणी डाटाची एक प्रत ठेवतात, त्यामुळे त्यांना तो डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी लागते. आधार प्रमाणीकरणाचा वापर पीडीएस, नरेगा किंवा खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारच्या उपयोजनामध्ये करता यावा यासाठी, युआयडीएआय एपीआयचा संदर्भविभाग देईल, ज्याचा वापर करुन नवीन उपयोजन (ऍप्लिकेशन) विकसित केले जाऊ शकते व बसवता येऊ शकते.

    सामग्री व सुविधा (लॉजिस्टिक्स)

    टपाल विभाग सामग्री व सुविधा सेवा देईल. याचे दोन भाग आहेत

    (i) येणा-या सामग्री व सुविधा – कच्च्या नावनोंदणी प्रतिमा + प्रादेशिक कार्यालयाच्या नेटवर्कद्वारे किंवा सुविधा केंद्राद्वारे चुंबकीय माध्यमामध्ये डाटा घेणे. येणा-या सर्व डाटावर सीआयडीआर डीएमझेड उपयोजनाद्वारे (ऍप्लिकेशन) प्रक्रिया केली जाते.

    (ii) बाहेर जाणा-या सामग्री व सुविधा – अर्जदारांना युआयडीएआय देणे व स्थितीविषयी ताजी माहिती मिळवणे

    सामग्री-सुविधा पुरवठादारांच्या जबाबदा-यांमध्ये पुढील समाविष्ट आहेत:

    • नावनोंदणी संस्थांना नावनोंदणी डाटा/साहित्य यादी, आरओ/डाटा केंद्राला पाठवण्यासाठी सामग्री-सुविधा पायाभूत सुविधा देणे
    • छापण्यासाठी पायाभूत सुविधा व सीआयडीआरशी जोडणी (कनेक्टिव्हीटी) देणे. छापण्यासाठीच्या पायाभूत सुविधेमध्ये आधार देण्यासाठीचे पत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळते जे छापून नावनोंदणी केलेल्या निवासींना टपालाद्वारे पाठवले जाते.
    • नावनोंदणी केलेल्या निवासींना टपालाद्वारे आधार पत्र पाठवणे
    • नावनोंदणी व आधार निर्मितीची स्थितीचा मागोवा घेण्यासाठी ऑनलाईन मागोवा व मागोवा यंत्रणा देणे
    • कॉल सेंटर पुरवठादारास नावनोंदणीच्या स्थितीचा मागोवा घेण्यास मदत करणे
    सुरक्षा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान

    प्रमाणीकरण वापरकर्ता संस्था

    संपर्क केंद्र

    संपर्क केंद्रामुळे नावनोंदणीच्या प्रक्रियेदरम्यान व नावनोंदणी नंतरच्या टप्प्यांसाठी युआयडीएआयशी भागीदारी करणारे निवासी व इतर संस्थांना संपर्क करण्यासाठी एकच केंद्रीय ठिकाण मिळते. संपर्क केंद्र निवासी, निबंधक, नावनोंदणी संस्था व निवासी सेवा संस्थांना विविध भाषांमध्ये सेवा देईल. संपर्क केंद्राचे सेवा पुरवठादार प्रतिनिधींसह संपर्क केंद्र स्थापित करतील, संचालित करतील व त्याची देखभाल करतील. संपर्क केंद्रासाठीच्या सेवा पुरवठादारांनी पुढील गोष्टी करणे अपेक्षित असेल:

      • परस्पर संवादाचे प्रमाण जेवढे आहे त्या वेगाने संचालन करणे
      • युआयडीएआयला विश्लेषणात्मक सहाय्य करणे
      • कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास मदत करणे
      • सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रश्न सोडवणे व सेवा देण्याची जबाबदारी घेणे
      • भागधारकांशी झालेल्या विविध परस्पर संवादाचे विश्लेषण करणे, प्रक्रियेचे नमुने शोधणे व विकसित करणे

    संपर्क केंद्रासाठीच्या आरपीएफमध्ये संपर्क केंद्रासाठीच्या आवश्यकता तपशीलाने देण्यात आल्या आहेत. कृपया युआयडीएआयच्या संकेतस्थळावर हा दस्तऐवज पाहा. युआयडीएआयने संपर्क केंद्र उभारण्यासाठी व चालवण्यासाठी सेवा पुरवाठादार म्हणून इंटेलिनेटची निवड केली आहे. संपर्क केंद्राची रचना आकृतीद्वारे खाली दाखवण्यात आली आहे:

    युबीसीसी व संशोधन

    प्रस्तावना भारत सरकारने युआयडीएआयची स्थापना केली आहे, तिला देशातील सर्व निवासींना विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आधारसाठी आवश्यक असलेली एक महत्वाची बाब म्हणजे सेवा अधिक परिणामकारकपणे देता यावी यासाठी ओळख दर्शविणा-या माहितीची (आयडेंटीटी) नक्कल कमीत कमी असावी यासाठी प्रयत्न करणे/नष्ट करणे. आधार वैशिष्ट्यपूर्ण असावा याची खात्री करण्यासाठी प्राथमिक यंत्रणा म्हणून जैवसांख्यिकीय वैशिष्ट्यांची निवड करण्यात आली आहे.

    कोणत्याही देशाने आतापर्यंत युआयडीएआयच्या या उपक्रमाऐवढी मोठी व अचूक राष्ट्रीय नोंदणी उभारण्याचे काम हाती घेतलेले नाही. भारतातील काम करणा-या लोकसंख्येचे स्वरुप व विविधता यामुळे, जैवसांख्यिक वैशिष्ट्यांद्वारे एकमात्रता (वैशिष्टपूर्णता) मिळवण्याचे आव्हान अधिक कठीण आहे. दूरसंचारसारख्या इतर तांत्रिक क्षेत्रांमध्ये, आपल्याकडे प्रगत देशांसारखा अनुभव नाही ज्याचा लाभ युआयडीएआयच्या जैवसांख्यिकीय यंत्रणांची रचना करण्यासाठी होऊ शकेल. उदाहरणार्थ, जगातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जैवसांख्यिकीय डाटाबेस भारताच्या गरजांच्या प्रचंड आकारमानाच्या तुलनेत लहानच आहे.

    म्हणूनच युआयडीएआय जैवसांख्यिक सक्षमता केंद्र (बायमेट्रिक्स सेंटर ऑफ कम्पिटंस-युबीसीसी) तयार करणे आवश्यक आहे जे युआयडीएआयच्या वैशिष्टपूर्ण आव्हानांवर लक्ष केंद्रित करेल.

    मोहिम

    जैवसांख्यिकी यंत्रणा तयार करणे ज्यामुळे भारताला राष्ट्रीय नोंदणीमध्ये वैशिष्टपूर्णता मिळवता येईल. अशी यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये भारतीय परिस्थितीसाठी योग्य जैवसांख्यिक तंत्रज्ञानाचा शोध लावला जाईल.

    उद्दिष्टे

    पुढील ठळक उद्दिष्टांद्वारे युबीसीसीची मोहीम पूर्ण होऊ शकेल:

      • विनिर्दिष्ट तपशील: युबीसीसी प्राथमिक जैवसांख्यिकी यंत्रणा स्पष्ट करेल व नियमित कालावधीने नवीन तंत्रज्ञान व सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्यासाठी त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करेल.
      • वैशिष्ट्ये निश्चित करणे: युबीसीसी तंत्रज्ञान, साधने, गणनविधी (अल्गोरिदम) व प्रक्रियांचे मूल्यांकन करेल व वैशिष्ट्ये निश्चित करेल म्हणजे कोणत्या विनिर्दिष्ट तपशीलांमध्ये कधी सुधारणा करायची किंवा त्यात वाढ करायची याचे मूल्यमापन करता येईल.
      • नाविन्यपूर्णता: युबीसीसी, युआयडीएआयची उद्दिष्टे पूर्ण व्हावीत यासाठी अद्ययावत जैवसांख्यिकीचा आग्रह धरेल.
      • सहाय्य: सीआयडीआर इतर विभागांना युआयडीएआय अनुरुप जैवसांख्यिक यंत्रणा बसविण्यासाठी राष्ट्रीय स्रोत असेल.

    धोरण

    युबीसीसी आपली उद्दिष्टे पुढील चार-कलमी धोरणाने पूर्ण करेल:

      • गुणवत्ता: ते जागतिक दर्जाच्या जैवसांख्यिक गुणवत्तेस आमंत्रित करेल व त्यांची नियुक्ती करेल. युबीसीसीचा भर संख्येपेक्षाही दर्जावर असेल व असामान्य वैज्ञानिक व अभियंत्यांचा एक लहान गट तयार करेल.
      • सहकार्य: ते इतर तांत्रिक विभागांना, शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय तज्ञ व आंतरराष्ट्रीय संस्थांना ज्ञान गोळा करण्यासाठी व त्याची एकमेकांना देवाणघेवाण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये अनुदान व “प्रायोजित संशोधनाद्वारे” संयुक्त संशोधन, शोध व विश्लेषणाला चालना देईल.
      • वेगाने स्वीकार: ते संदर्भ पायाभूत सुविधा, प्रतिकृती तयार करेल व या संकल्पनेतील समस्या जाणून घेण्यासाठी ते प्रायोगिक तत्वावर वापरुन बघेल (प्रूफ ऑफ कन्सेप्ट), ज्यामुळे युआयडीएआय यंत्रणा सुरुवातीच्या विकासाच्या काळात तसेच नंतर ती वापरली जाताना, तंत्रज्ञान वेगाने स्वीकारण्यास मदत होईल.
      • अशा प्रकारे ते सध्या काम करत असलेल्या युआयडीएआय यंत्रणेतील कर्मचा-यांसोबत काम करुन मूलभूत पातळीवर काम करत राहील.
      • जैवसांख्यिक प्रयोगशाळा: ते एक अद्ययावत प्रयोगशाळा तयार करेल व त्याची देखभाल करेल जो एक स्वतंत्र संशोधन व अभियांत्रिकी विभाग असेल.

     

    स्त्रोत : आधार महाराष्ट्र शासन

    अंतिम सुधारित : 11/11/2019



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate