नव्याने तयार झलेल्या पाटबंधारे विभागांचे तलावाचे मासेमारी हक्क मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर, जलाशयाचे सरासरी जलक्षेत्राचे प्रमाणात शासन निर्णय क्रमांक मत्स्यवि २४१०/५२७/प्र.क्र.१०४/१०/पदुम-१३ दिनांक १८/९/२०१० मधील मार्गदर्शक सुचनांनुसार पहिली दोन वर्ष १०० %, तिस-या वर्षी ७५ %, चवथ्या वर्षी ५० % व पाचव्या वर्षी २५ % इष्टतम मत्स्यबीज संचयन खालिल अटी व शर्तीचे आधिन शासनामार्फत केले जाते.
पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे. पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे धोरण खालिल आदेशांनुसार निश्चित करण्यात आले आहे.
शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. मत्स्यवि-११९९/२०/प्र.क्र.८/पदुम-१३, दि. १५.१०.२००१ नुसार जलाशयांमध्ये मत्स्यबीज संचयन करण्याचे सुधारीत धोरण खालिल प्रमाणे आहे -
जलविस्तार हेक्टर | इष्टतम संचयन |
० ते २० | ५००० प्रति हेक्टर. |
२०.०१ ते ६० | १.० लक्ष + २० हे. पुढील क्षेत्रासाठी २,००० प्रति हेक्टर. |
६०.०१ ते ३०० | १.८ लक्ष + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी १,००० प्रति हेक्टर. |
३००.०१ ते १३०० | ४.२ लक्ष + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. |
१३००.०१ ते ५००० | ९.२ लक्ष + १३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. |
५०००.०१ पेक्षा जास्त | २७.७ लक्ष + ५००० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. |
माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020
मेंढी व शेळीसाठी पैदास धोरण याबाबतची माहिती येथे द...
पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय वि...
भारतातील शेतमालाच्या किंमती निश्चित करण्यासाठी कें...
देशी जनावरांसाठीचे पैदास धोरण याविषयीची माहिती येथ...