अन्नसुरक्षेच्यादृष्टीने मत्स्य उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. मत्स्य उद्योगामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये सातत्याने संशोधन आणि सुधारणा होत आहेत. गेल्या काही वर्षांत समुद्रातील मत्स्य उत्पादनाच्या बरोबरीने गोड्या पाण्यातील मत्स्य शेती, शेततळ्यातील मत्स्य शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शहरी भागाचा विचार करता शोभिवंत माशांनादेखील चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शोभिवंत माशांच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू झाला आहे. निर्यातीमधील संधी ओळखून केंद्र सरकार आणि राज्य शासने किनारपट्टी भागात मत्स्यप्रक्रिया उद्योग तसेच निर्यातीच्यादृष्टीने सोयीसुविधांची उभारणी केली आहे. त्याचा फायदा मत्स्य उत्पादकांना होत आहे.
जागतिक पातळीवर मत्स्य उद्योगातील संधी लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने मत्स्य उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकामध्ये देशांतर्गत मत्स्य उत्पादनाची आकडेवारी, बाजारपेठ, सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संधीचा आढावा घेतला आहे. याचबरोबरीने मत्स्य उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकातील 44 प्रकरणांमध्ये देण्यात आली आहे. मच्छीमार संस्था, संशोधक आणि विद्यार्थांना या पुस्तकातील माहिती निश्चितच मार्गदर्शक आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसाया...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...