मॅक्रोब्रॅकीयम रोझनबर्गी या कोळंबीला जंबो कोळंबी, महाझिंगा, पोचा, खटवी इत्यादी विविध नावांनी ओळखतात. या जातीच्या बीजाच्या कॅरापेसवर (डोक्यावरील कवचावर) आडवे तीन ते सहा पट्टे असतात. रोस्ट्रम लांब व पुढच्या बाजूला वर झुकलेले असते. त्याच्या वरच्या बाजूस 10 ते 11 आणि खालच्या बाजूस आठ ते नऊ दात असतात. डेंग्यांवर निळसर झाक असते.
1) इतर सर्व जातींच्या कोळंबीपेक्षा जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर साधारणपणे 70-100 ग्रॅमपर्यंत वाढतो, तर मादी 35 ते 70 ग्रॅमपर्यंत वाढते. काही नगात विशेषतः नर कोळंबीमध्ये वाढीचा वेग दुप्पट असतो. अशी कोळंबी सात ते आठ महिन्यांत 100 ते 120 ग्रॅम वजनाची होते.
2) ही कोळंबी अत्यंत चविष्ट आहे, त्यामुळे या कोळंबीला देशात तसेच परदेशात प्रचंड मागणी आहे, दरही भरपूर मिळतो.
3) या कोळंबीचे अन्न म्हणजे पाण्यातील कीटक, कृमी, वनस्पती, बी-बियाणे, छोटे कवचधारी प्राणी, मासळीचे विसर्जित पदार्थ इ. ही कोळंबी सर्वभक्षी आहे.
4) कृत्रिम खाद्याबरोबरच कोळंबीला कणी, कोंडा, पेंड, मासे, खाटीकखान्यातले टाकाऊ मांस, धान्यकण इ. पूरक खाद्य देता येते.
5) कटला, रोहू, गवत्या इ. प्लवंगभक्षी माशांबरोबर हिचे संवर्धन करता येते. हे मासे पाण्याच्या वरच्या थरात राहतात, तर कोळंबी तळाशी वास्तव्य करते.
7) ही कोळंबी गोड्या पाण्यात तसेच पाच क्षारतेपर्यंतच्या मचूळ पाण्यात वाढते. तसेच 18 ते 34 अंश सें. या दरम्यान तापमान असले तरीही जगते.
8) जंबो कोळंबी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद...
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...